Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    प्रकरण ६३ वें - ध्यानात बाळगावयाच्या कांही गोष्टी

    आपल्या शिष्यांना दिलेल्या शिक्षणाचा फायदा त्याच्या अनुयायांना आणि प्रत्येक पिढीला मिळाली जावा म्हणून उद्धारकाने तें दिलेले होतें. युगाच्या समाप्तीच्या आसपास जे जिवंत असणार तें त्याच्या नजरेपुढे होतें म्हणून तो म्हणाला : “तुम्ही स्वत:कडे लक्ष द्या.” पवित्र आत्म्याची जी कृपादाने आहेत, ती प्रत्येकाने आपणाकरीता आपल्या हृदयात ठेवावीत हें आपले काम आहे. CChMara 371.1

    मोठ्या आणीबाणीचा प्रसंग अगदी आम्हासमोर आहे.. कसोट्यांचा व मोहांना तोंड देण्याकरीता आणि कर्तव्ये पार पाडण्याकरीता ह्या विश्वासाची गरज पडेल, वैभवाने आम्ही विजयशील होऊ वाट पाहणारा, प्रार्थना करणारा व विश्वास ठेवणारा अशा एकालाही शत्रुच्यान मोहजालात धरीता यावयाचे नाही. CChMara 371.2

    बंधूजनहो, ज्या तुम्हांला देवाच्या वचनांतील सत्यें खुली करून दाखविली आहेत त्या तुमचा ह्या जगाच्या इतिहासातील समाप्तीच्या प्रसंगात काय भाग आहे ? गांभीर्यपूर्ण अशी जी ही सत्ये आहेत. त्यांविषयी तुम्ही जागृत आहा काय? स्वर्गात आणि पृथ्वीवर तयारींचे जे महान् कार्य चालूं आहे. त्याची तुम्हांला जाणीव आहे का? ज्यांना प्रकाशप्राप्ती झालेली आहे व ज्यांना संदेश वचने वाचण्याची व ऐकून घेण्याची संधि मिळालेली आहे. त्या सर्वांनी त्यात काय लिहीलेले आहे याकडे लक्ष द्यावे “कारण काळ हाताशी आहे. आमच्या जगांत हरएक लाचारीचे उगमस्तान असलेल्या पापाशी आता कोणीही खेळत बसू नये. सुस्तीत आणि मुर्खपणाच्या बेपरवाईत अधिक काळ राहूं नका, अनिश्चिपपणावर तुम्ही आपल्या आत्म्याचे भवितव्य ठेवू नको आपण सर्वतोपरी प्रभुचे आहों हें जाणून घ्या. सरळ अंत:करणांनी आणि कंपित ओठांनी विचारपूस करावी कीं “त्याच्यापुढे कोण टिकेल?” या अखेरच्या मौल्यवान प्रयोगकाळी तुम्ही आपल्या शीलसंवर्धनाच्या कामी उत्तमोत्तम साधनांचा उपयोग करीत आहांत काय ? प्रत्येक कलंकापासून आपले आत्मे तुम्ही परिशुद्ध करीत आहा काय? तुम्ही प्रकाशाप्रमाणे जगत आहा काय ? आपल्या विश्वासानुरूप तुमचे व्यवहार आहेत काय ? CChMara 371.3

    अपूर्ण व औपचारिक विश्वसधारी असणे शक्य आहे तरी अपूर्णतेमुळे सार्वकालिक जीवनाला तुम्हीं मुकावे असेच आढळून येईल. पवित्रशास्त्रामधील कांही आज्ञा पाळून ख्रिस्त अशी समजूत होऊ देणे शक्य आहे. तरी ख्रिस्ती शीलाला आवश्य लागणारी पात्रता अगी नसल्यामुळे नाशच होऊन जाईल. परमेश्वराने तुम्हांला दिलेल्या इषाच्यांची जर निष्काळजी करण्यांत आली अगर तत्संबंधी बेपरवाई दर्शविली आणि जर पाप मनीं बाळगून तुम्ही गय केली तर तुम्ही आपल्या आत्म्याच्या भविष्यावर शिक्कामोर्तब केला असें होईल. तागडीत तुम्हांला तोलण्यात येऊन तुम्ही उणे भरणार आहां, कृपा शांति व क्षमाशीलता कायमची काढून घेण्यात येईल; येशू जवळून निघून जाईल व तुमच्या प्रार्थनाच्या व विनवण्यांच्या क्षेत्रात तो पुन: केव्हाही येणार नाही. दया आसपास आहे व तारणारा मध्यस्थी करीत आहे तोवरच आपण सार्वकालिकतेसाठी भरपूर परिश्रम करूं यां.CChMara 371.4

    सैतान कांही झोपलेला नसतो. सदेश शस्त्रातील सत्यवचन निरर्थक करण्यासाठी तो अगदी जागृत असतो शास्त्रात स्पष्ट सांगितलेल्या देवाच्या निश्चत इच्छाच्याविरूद्ध सैतान चातुर्याने व फसव्या सामर्थ्याने काम करीत असतो. सत्याच्या ठिकाणी कावेबाज वितडवाद निर्माण करून सैतानाने वर्षाची वर्षे मानवी ताबा घेतलेला आहे ह्या संकटाच्या काळांत देवाचे भय बाळगून धर्माने काम करणारे दाविदाच्या शब्दांत त्याच्या नामाचे गौरव करतील. “परमेश्वराने आपला हस्तपराक्रम दाखविण्याचा समय आला आहे. कारण त्यांनी शास्त्राचे अतिक्रमण केले आहे.” स्तोत्र ११९:१२६. CChMara 372.1

    पृथ्वीवरील अवांतर हरएक जमातीपेक्षा आम्हांला सत्याचे ज्ञान आगाऊ देण्यांत आलेले आहे असा आमच्या समाजाचा बाणा आहे म्हणूनच आमच्या समाजाचा बाणा आहे. म्हणूनच आमच्या विश्वासाला सुसंगत असें आमचे जीवनचरित्र आणि आमचा स्वभावधर्म असावयास पाहिजे. असा काळ आलेला आहे. कमी न्यायत्वाने लोकांच्या मौल्यवान् पेढ्या स्वर्गीय कोठारासाठी बांधिल्या जातील आणि निदणाप्रमाणे दुष्टाच्या पेढ्या अखेरच्या महान् दिवसाच्या अग्नासाठी एकत्रित केल्या जातील. परंतु “हगाम येईपर्यंत गह व निदण सगतीच वाढत राहतील.”CChMara 372.2

    आपल्या चरित्रातील कर्तव्य पार पाडीत असताना धार्मिकांचा अखेर पर्यंत अधम्र्यांशी संबंध येईल. प्रकाशाची मुलें अध:काराच्या मुलात विखुरलेली आहेत. अशासाठी कीं त्यामध्ये काय तफावत आहे हें सर्वांच्या पाहण्यात यावे. याप्रमाणे देवाच्या मुलांनी ज्याने त्यास अध:कारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण त्यांनी प्रसिद्ध करावे.” अंत:करणात चमचमणारी देव प्रीती, जीवन-चारित्र्यात दिसून येणारी ख्रिस्ताची सुसंगतवत्ति ही जगांतील मानवापुढे स्वर्गीय प्रकाशाप्रमाणे दिसून यावी, हें अशासाठी कीं त्यांनी तो प्रकाश पाहून घ्यावा व त्याची उत्कृष्ठता त्यांना आवडावी. दुष्ट लोक व दुष्ट दृत यांना विरोध केल्याशिवाय कोणालाही देवाची सेवा करिता यावयाची नाही. ख्रिस्ताच्या लोकांशी मिळू इच्छिणाच्या प्रत्येकावर दुष्ट आत्मे पाळत ठेवीत राहतील कारण जे कोणी सैतानाच्या हातातून निसटले असतील त्यांना परत हस्तगत करण्याची सैतानाची इच्छा असतें. खंबीर कपटपाशावर विश्वास ठेवण्यासाठी वाईट लोक स्वत:ला वाहून घेतात व आशा प्रकारे त्यांचा नाश होतो. हें लोक खरेपणाचा बहाणा करितील तरी तें फसवेगिरीच व तीही शक्य नसेल तर जे खात्रीपूर्वक निवडलेले आहेत. अशांचीच तें फसवणूक करतील.CChMara 372.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents