Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    ख्रिस्तागमन लांबणीवर पडले अशा विचारांतील धोका

    “आपला धनी येण्यास विलंब लागेल” असें मनात म्हणणारा दुष्ट सेवक ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहणारा होता. तो “सेवक’ बाह्यात्कारीकरित्या देवाच्या सेवेसाठी वाहीलेला होता तरी अंतर्यामी तो सैतानाचा होता. CChMara 373.3

    निंदकाप्रमाणे तो सत्याचा उघड उघड धिक्कार करीत नाही. परंतु आपल्या विचाराने जीवनचरित्र तो असें प्रगट करून दाखवितो कीं प्रभुचे आगमन लांबणीवर पडलेले आहे. अविनाशी हितकर गोष्टींविषयी त्याची तर्कमय भावना त्याला बेपरवाई बनविते. जगिक नीति त्याला मान्य असतें व जगाच्या चालीरीतींना व व्यवहाराला तो मिळून जातो. जगिक अहंकार व महत्वाकांक्षा यांचा जोर असतो. आपल्या बंधुगुणांनी आपल्याहून वरिष्ट होऊ नये म्हणून त्याच्या कार्याविषयी व हेतुविषयी तो तिरस्कारयुक्त बोलत राहतो. अशा रीतीने तो आपल्या सहसेवकांवर हल्ला करतो.CChMara 373.4

    देवाच्या लोकांपासून अशा प्रकारे फटकून राहून तो अधिकाधिक देवनंदकाच्या सहवासात जातो. “दारूड्यासह” तो खातपीत असलेला आढळतो व जगिक भावनेच्या लोकांशी तो समरस होऊन जातो. अशा रीतिने तो ऐहिक सुरक्षितेत गुंगलेला व विस्मरण, बेपरवाई आणि सुस्ती यांच्या आहारी गेलेला असतो.CChMara 373.5