Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    म्हटला जाणारा नवीन प्रकाश पुष्कळांची फसगत करील

    पृथ्वीवर जो सर्वसाधारण नाश यावयाचा आहे त्यांत देवाच्या अवशिष्ट लोकांना गुंतवून टाकावे हीं सैतानाची आशा आहे. ख्रिस्ताचे आगमन जसजसे समीप येत राहील तसतसे त्याना उलथून टाकण्यासाठी तो अधिक निश्चत व निर्णायक प्रयत्न करील. पुरातन महत्वाच्या गोष्टींवरील विश्वास अस्थिर करावा म्हणून पुरूष व स्त्रिया पुढे येऊन म्हणतील कीं आम्हांला नवीन प्रकाश अगर नवीन प्रगटीकरण झालेले आहे. त्यांचे सिद्धांत देवाच्या वचनांतील कसोटीला उतरणार नाहीत, तरीही पण आत्म्यांची फसगत केली जाईल. CChMara 373.6

    खोट्यानाट्या बातम्यांचा उठाव होईल आणि कित्येकजण ह्या जाळ्यात अडकून जातील. या वायफळ बातमीवर तें विश्वास ठेवतील व अधिक म्हणजे तेच त्यांचा फैलाव करतील व अशा प्रकारे कडीला कडी जुळवून ती थेट फसवेगिरीचा अधिपति याजपर्यंत पोचविण्यात येईल असली ही मनोभावना देवापासून आलेल्या संदेशांना नेहमीच उघड उघड विरोध करणार नाही. परंतु बळकट झालेला अविश्वास पुष्कळ तहेने व्यक्त केला जातो. प्रत्येक खोट्या बातमीने अविश्वासाचे पोषक होऊन तो सबळ होत जातो आणि अशा मार्गाने अनेक आत्म्यांना अयोग्य मार्गाचे शिक्षण देण्यांत येते. CChMara 374.1

    अन्यायाच्या प्रत्येक स्वरूपाविषयी आमच्याने सावधगिरी राखता यावयाची नाहीं कारण मानवांना सत्यापासून निवृत्त करण्यासाठी सैतान एकसारखा यत्न करीत असतो.CChMara 374.2