Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    शंका व भय न जुमानता देवाच्या लोकांनी प्रगत होणे

    जे आपले लोक साप्रतांच्या सत्यावर विश्वास ठेवीत आहेत अशांना प्रभु आज कार्यभाग देत आहे. फार महत्वाचे निर्णय घेण्याची त्याची योजना आहे. ही तरतूद करीत असताना तोच उद्देश त्याच्यासमोर आहे. तो आपल्या लोकांस म्हणत आहे कीं “पुढे चला.” अद्यापि मार्ग खुला झालेला नाही, हें खरे आहे, परंतु विश्वासाच्या सामर्थ्याने व धैर्य धरून जेव्हां तें मार्ग चालूं लागतील, तेव्हां परमेशवर त्यांच्यापुढील मार्ग त्याच्या नजरेसमोर अगदी स्पष्ट करील. ज्याप्रमाणे पुरातन काळचे इस्त्रायल लोक आपल्या अडचणीविषयी कुरकुर करीत असत व देवाने आपल्या विशेष कार्यासाठी पुढे जाण्यासाठी पुढारी उभारलेले होतें अशांनी तें लोक तक्रार करीत असत, त्याच प्रकारचे कुरकुरे लोक नेहमीच आढळून येतात. त्यांची कसोटी पाहण्यासाठी देव त्यांना पेंच-प्रसंगात आणीत आहे व त्याच्या समर्थ हस्ताशिवाय तें मुक्त होऊ शकत नाहीत हें त्यांना कळून येत नाही. ख्रिस्ती जीवन संकटानी घेरलेले व कर्तव्य-कर्म पार पाडणे दुरापास्त झालेली दिसतील असें प्रसंग येत असतात नाशच पुढे येत आहे आणि दास्य बंधन अगर मरण पाठीस लागलेले आहे. असेच चित्र कल्पनासृष्टीत नजरेपुढे येते. तरी सर्व प्रकारच्या निराशांच्या वातावरणांतून परमेश्वराची वाणी स्पष्ट सांगते कीं, “पुढे चला.” परिणाम कसाहि होवो व काळोखातून आमच्या दृष्टीला पार पलीकडे कांही दिसत नसले आणि जरी थंडीने आमची पावलें गारठून गेलेली असली तरी आम्हांला ही आज्ञा मानावयाची आहे.CChMara 375.4

    भंगलेल्या व पूर्ण मन नसलेल्या जीवनात संशय व अंधार असलेला तुम्हांस दिसून येईल. धर्मातील समाधान अगर जग देते ती शांति तुम्हांला गोड वाटत नाही. अगदी थोडेथोडकेच करून सैतानाच्या आराम खुर्चीचा आश्रय करूं नका, तर ऊठा आणि उच्चतम योग्यता साध्य करण्याची तुम्हांला मिळालेली सवलत तिच्यावर दृष्टी लावा. ख्रिस्तासाठी सर्व कांही सोडून देणे ही एक तुमची धन्य संधिच होय. दुसर्‍याच्या जीवन-चरित्रांचे अनुकरण करून खुजट होऊ नका. तुम्हांपुढे एकच अव्वल दर्जाचा व अचूक असा कित्ता आहे येशूचेच अनुकरण करणे सुरक्षितपणाचे आहे. जर दुसरे कोणी आत्मिक सुस्तीत रेंगाळत असतील तर त्याची सोबत सोडून देण्याचा व ख्रिस्ती शिलाची भारदस्ती वाढविण्यासाठी पुढे पुढे कूच करण्याचा निर्धार करा. स्वर्गप्राप्तीला योग्य असा स्वभाव बनवा. आपल्या ठिकाणी निद्रीस्त पडू नका आपल्या स्वत:च्या आत्म्याचे निष्ठेने व खरेपणाने संगोपन करा.CChMara 376.1