Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    शब्वाथ शाळा

    शब्बाथ शाळेच्या कामाचा हेतु आत्मे मिळविण्याचा असावा. कामाची पद्धत अचूक असेल, सर्व सोयी भरपूर असतील; पण मुलें व तरुण यांना ख़िस्ताकडे आणले नाहीं तर शाळा अयशस्वी झाली असें होणार; कारण आत्मे ख़िस्ताकडे ओढले जाणार नाहीत तर तें अधिक अधिक प्रमाणांत नामधारी धर्माच्या परिणामाखाली जाऊ लागतात ज्यांना मदतीची गरज आहे ज्याच्या अंत:करणावर ठोठावत असतां शिक्षकाने सहकार्य करावे. जर विद्यार्थी आत्म्याच्या विनवणीला अनुकूल असतील व अंत:करणाचे द्वार उघडून येशूला आत येऊ देतील तर त्यांना असा समज देईल कीं, तें दैवी गोष्टी जाणू शकतील. शिक्षकांचे काम सोपे आहे, पण तें जर येशूच्या वृत्तीने केले तर तें देवाच्या आत्म्याच्याद्वारे कार्यक्षम व भरदार होईल.CChMara 49.3

    आईबापांनो, तुम्ही आपल्या मुलाबरोबर शब्बाथ शाळेच्या धड्याचा अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ प्रत्येक दिवशी राखून ठेवा. गरज पडेल तर भेटी. घेण्याचे सोडून द्या पण पवित्र इतिहासाचे मौल्यवान् धडे शिकविण्याची वेळ गमावू नका. या अभ्यासापासून आईबापांना व मुलांनाही फायदा होईल. धड्याला लागू असणारा पवित्र शास्त्राचा भाग पाठ करावा, आपले काम म्हणून नव्हें. पण संधि म्हणून करावा. पहिल्यानें कदाचित् पाठांतर कठीण जाईल तरी पुन: पुन: पाठ केल्याने सोपे होईल मग कांही वेळाने सत्याचीं मौल्यवान वचने या प्रकारे साठवून तुम्हांला संतोष वाटेल. या संवयीने धार्मिक वाढीला मोठी मदत होईल.CChMara 49.4

    कुटुंबांत शास्त्राचा अभ्यास करण्याच्या पद्धती वापरा. जगिक प्रकारचे सर्व कांही सोडून द्या. अनावश्यक शिवणकाम व खाण्यास निरुपयोगी गोष्टी सोडून द्या पण तुमच्या आत्म्याचें पोषण जीवनी भाकरीवर होऊ द्या. एक तास किंवा अर्धा तासपर्यंत आनंदाने व खेळीमेळीने देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यास वाहन दिल्याने जो चांगला परिणाम दिसून येतो त्याची किंमत करणे अशक्य आहे. दिलेल्या विषयाविषयी वेगवेगळ्या परिस्थितीत जे सर्व सांगितलें आहे तें एकत्र करून पवित्र शास्त्राला स्वत:चे प्रदर्शन करूं द्या. तुमचे घरगुती वर्ग पाहुणे आलें म्हणून मोडू नका. जर तें अभ्यासाच्या वेळी आलें तर त्याना त्यात भाग घेण्यास आमंत्रण द्या. त्यावरून त्यांना दिसूं द्या कीं, देवाच्या वचनाचे ज्ञान संपादन करणे हें जगक फायद्यापेक्षा व मजेपेक्षा फार महत्त्वाचे आहे.CChMara 49.5

    मला सांगण्यास दु:ख वाटतें कीं, कांही शब्बाथ शाळेत धड्याच्या पुस्तकातून धडा वाचून दाखविण्याची रीत पडली आहे असें नसावे. असें असण्याची आवश्यकता नाही. कारणाशिवाय वाईट रीतीने घालविण्यात येणारा वेळ पवित्रशास्त्राच्या अभ्यासला देण्यांत आला तर तसे घडणार नाहीं. शाळेच्या अभ्यासापेक्षा शिक्षकांनी व विद्याथ्याँनी शब्बाथ शाळेच्या धड्याचा अभ्यास कमी प्रमाणात करण्याचे कांही कारण नाह. त्यांचा चांगला अभ्यास करण्यांत यावा. कारण त्यातील विषय महत्त्वाचे असतात. याबाबतीत निष्काळजीपणा करणे म्हणजे देवाला असंतोष देणे होय.CChMara 50.1

    जे शब्बाथ शाळेत शिकवितात त्यांची अंत:करणे देवाच्या सत्याने उत्तेजित व बळकट असली पाहिजेत फक्त ऐकणारे असू नये पण वचनाचे पालन करणारे व्हावे ज्याप्रमाणे वेलात फाट्याचे पोषण होतें. त्याप्रमाणे ख्रिस्तांत त्यांचे पोषण झाले पाहिजे. त्यावर स्वर्गीय कृपेचे दहिवर पडले पाहिजे अशासाठी कीं त्यांची हृदये, उमललेल्या कळ्या व देवाच्या बागेतून जाणार्‍यना सुवास देणाच्या रोपट्याप्रमाणे व्हावीत. शिक्षक देवाच्या वचनाचा अभ्यास करणारे हुशार विद्यार्थी असावेत. तें ख्रिस्ताच्या शाळेत रोज शिकत राहुन जो जगाचा प्रकाश आहे त्या महान् शिक्षकापासून मिळणारा प्रकाश इतरांना देण्यास समर्थ आहेत असें दर्शवावें.CChMara 50.2

    शब्बाथ शाळेचे वेळोवेळी निवडण्यात येणारे कामदार आवडीनिवडीने शोधू नयेत, पण तें देवाची भीति बाळगून त्याजवर प्रेम करतील व देवाला त्यांचा सल्लागार करतील अशांनाच त्या जागेवर नेमा. 102TT 557-566;CChMara 50.3