Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    जगिक कार्यापासून विसाव्याचा दिवस

    मर्त्य मानवाने स्वत:स क्षणिक व लहान सहान गोष्टी मिळण्याकरता सर्व समर्थांशी तडजोड करण्याचा प्रयत्न करणे फार अविश्वासाचे आहे. असें करणे म्हणजे शब्बाथ दिवस रोजच्या कामासाठी वापरून देवाच्या नियमांचे उल्लंघन करण्यासारखे व पूर्णपणे त्याला नाकारण्यासारखे आहे. कारण असें करणे म्हणजे प्रभूच्या आज्ञा आपल्या सोईच्या करणे होय. **मी तुमचा देव ईर्षावान देव आहे’ अशी सिनाय पर्वतावरून गर्जना झाली अर्धे आज्ञापालन व विभागलेली गोडी देव स्वीकारीत नाही. कारण तो म्हणतो कीं बापाच्या अन्यायामुळे मी लेकरांस त्यांच्या तिसर्‍य व चौथ्या पिढीपर्यंत शासन करतो आणि जे माझ्या आज्ञा पाळतात व त्याजवर प्रीति करतात अशांच्या हजारों जनावर दया करतो. शेजार्‍यची चोरी करणे हलकी बाब नाहीं. असें करणारा गुन्हेगार समजला जातो. तरी जो आपल्या सोबत्याला ठकविण्यासाठी नाकारतो. नि:संशय तो आपल्या स्वर्गीय पित्याला त्यानें आशीर्वादित केलेला व विशेष कार्यासाठी राखून ठेवलेला वेळहि चोरतो. 154T 249, 250; CChMara 52.4

    आपले शब्द व विचार याची काळजी घ्यावी शब्बाथ दिवशी धद्याविषयीं जे बोलतात व योजना करतात त्यांना देव प्रत्यक धद्यांत गुंतलेले आहेत असें समजतो. शब्बाथ पवित्र पाळण्यासाठी जगिक गोष्टींत आपण आपले मनसुद्धा गुंतू देऊ नये.CChMara 53.1

    देव बोलला आहे. मनुष्य आज्ञा पाळील असें तो म्हणतो. तो म्हणत नाहीं कीं, त्याला तसे करणे सोईचे आहे किंवा नाहीं. मानवाला त्याच्या आज्ञाभंगाच्या परिणामापासून सोडविण्यास जेव्हां गौरवी व जीवनदात्या प्रभूनें मरण पत्करले आणि दु:ख व क्लेश यांचा वाटा उचलला तेव्हां त्यानें आपल्या सुखसोयी व ख्यालीखुशाली पाहिल्या नाहींत. येशू मनुष्याला पापांत तारण्यास नव्हें पण पापापासून तारण्यास मेला. मनुष्याने चुकीचा मार्ग सोडून ख्रिस्ताचे उदाहरण घेतले पाहिजे. आपला वधस्तंभ उचलून घेऊन व स्वनाकार करून आज्ञापालनाद्वारे त्याचे अनुयायी । झाले पाहिजे. 162TT 185;CChMara 53.2

    जगिक फायद्यासाठीं शब्बाथ दिवशीं काम करण्याने कोणीही निर्दोषी होऊ शकत नाहीं. जर देव एकाला क्षमा करतो तर तो सर्वांना क्षमा करील. आपल्या कुटुंबांचे उत्तम रितीने पोषण करण्यासाठीं गरीब असलेल्या बंधुने शब्बाथ दिवशीं काम को करूं नये? किंवा दुसर्‍य भावानी जेव्हां जेव्हां शब्बाथ पाळणे सोईचे आहे तेव्हाच का पाळू नये ? सिनाय डोंगरावरील वाणी उत्तर देते; “सहा दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर; पण सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्बाथ आहे.” निर्गम २०:९, ९०CChMara 53.3

    दैवी आज्ञा पाळण्यासाठी तुमच्या वयाची सबब चालत नाहीं. आब्रा हामाची त्याच्या उतारवयांत कडक परीक्षा घेण्यात आली. प्रभूचे शब्द म्हाताच्या मनुष्याला भयकर असें भासलें. तरी त्यानें तें बरोबर आहेत किंवा नाही आणि त्याचे आज्ञापालन करावे किंवा नाहीं असें विचारलें नाही. त्याला असें म्हणता आलें असतें कीं मी म्हातारा व दुर्बल आहे व जो त्याच्या जीवाचा आनंद अशा पुत्राला तो अर्पण करूं शकत नाही. त्यानें प्रभूला असें म्हटलें असतें कीं ही तुझी आज्ञा तू या पुत्राच्या बाबतींत दिलेल्या वचनाला आड येते. पण अब्राहामाने कांही कुरकुर न करता देवाच्या आज्ञा पाळल्या. त्याचा देवावरील भरवसा पक्का होता. 174T 250-253;CChMara 53.4

    शब्बाथ दिवस पवित्र पाळण्यासाठी जे चुकतात त्यांना दोष दाखविण्यास येशूच्या सेवकांनी धैर्य दाखवावे. शब्बाथ दिवशीं जगिक संभाषणात जे भाग घेतात त्यांना दयेनेच पण गंभीरपणे दोष द्यावा कारण तें असें करूनही शब्बाथ पालन करणारे आहों असें म्हणतात. त्यांना त्याच्या पवित्र दिवशीं देवाला वाहून देण्यास व भक्त करण्यास उत्तेजन द्यावें. CChMara 53.5

    कोणालाहि असें वाटू नये कीं, पवित्र वेळ व्यर्थतेत खर्च करण्यास मोकळीक आहे. शब्बाथाचा बहुतेक वेळ झोपेत घालवणे देवाला नापसंत आहे. असें करून तें आपल्या उत्पन्नकर्त्यांचा अपमान करतात व त्यांच्या उदाहरणाने म्हणतात सहा दिवस विसावा घेण्यासाठी अंति मौल्यवान आहेत. पैसे मिळविण्यासाठी तें इतर दिवशीं आवश्यक असलेली झोप गमावून जादा काम करतात व त्याची भरपाई शब्बाथ दिवस झोपेमध्ये घालवून पुढीलप्रमाणे शब्बाथ सांगतात. “शब्बाथ विसाव्यासाठी दिला आहे. सभेला जाण्यासाठी मी विसावा घालवत बसणार नाहीं कारण मला विसावा पाहिजे.” असें लोक पवित्र दिवसांचा गैर उपयोग करतात. विशेषकरून या दिवशी त्यांनी आपल्या कुटुंबाना प्रार्थना स्थळी नेऊन थोडके असोत कीं जास्त असोत त्यांच्याबरोबर शब्बाथ पाळण्यास उत्तेजन द्यावे. त्यांनी आपला वेळ व शक्ति आत्मिक कार्यासाठी खर्च करावी अशासाठीं कीं, शब्बाथाला मिळालेला दैवी आशीर्वाद आठवडाभर राहावा. आठवड्यांतील सर्व दिवसांपैकी शब्बाथासारखा आत्मिक विचार व भावना याकरिता सोईचा दुसरा दिवस नाही182T 704;CChMara 53.6

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents