Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    धर्माचें व्यवहारिक प्रगटीकरण

    कर्तबगारीपेक्षा व उत्सुकतेपेक्षा प्रभूची सेवा कमी केल्याने आमच्या विश्वासाला काळीमा लागतो. फक्त ख्रिस्ती धर्मच मनापासून केलेल्या कार्याद्वारे जे पापाला व अधर्माला मेलेले आहेत त्याच्यावर उत्तम ठसा उमटवील. प्रार्थनाशील, नम्र व विश्वासू अशीं जीं ख्रिस्ती मनुष्यें आपल्या कार्याद्वारे दाखवितात कीं, त्यांची सर्वांत मोठी इच्छा ही आहे कीं, तारणदायी सत्य इतरांना सागावे. कारण त्याद्वारे सर्वांची कसोटी होईल व तें आपल्या धन्यासाठी पुष्कळ आत्मे गोळा करतील.CChMara 60.1

    आमच्या मंडळीचा विश्वास कोणत्याही प्रकारे दुर्बळ व निस्तेज असण्याचे कारण नाहीं. आशा धरून राहिलेले बदीवान हो, दुर्गाकडे परत या.” जखया ९:१२. ख्रिस्तामध्ये आम्हांला सामर्थ्य देऊ केले आहे. पित्यासमोर तो आमचा वकील आहे. तो आपल्या संदेशवाहकाना आपल्या राज्याच्या प्रत्येक भागात आपली इच्छा आपल्या लोकांना प्रगट करण्यासाठी पाठवितों. तो आपल्या मंडळ्यांमध्ये चालतो. तो आपल्या अनुयायांना पवित्र करण्यास, उंचावण्यास व महती देण्यास इच्छितो. त्याजवर जे खर्‍या रीतीने विश्वास ठेवतात तें जगांत जीवनदाई स्वाद बनतील. तो आपल्या उजव्या हातांत तारे धरतो व याद्वारें जगाला त्याचा प्रकाश दिला जावा असा त्याचा हेतु आहे. मंडळाच्या वरील उच्च सेवेसाठी आपल्या लोकाना तयार करण्याची त्याची इच्छा आहे त्यानें आम्हांस महान् कार्य करण्यास दिले आहे. म्हणून तें अचूक व निश्चयपूर्वक करूं या. जीवितांत सत्याने जे केले आहे तें दाखवू या.CChMara 60.2

    वेगवेगळी मिशनकार्ये पुढे आणण्यास स्वनाकार, स्वार्पण, भरपूर शक्ति व अधिक प्रार्थना कराव्या लागल्या आहेत जे कर्तबगारीच्या रंगभूमीवर नव्याने आलें आहेत असें कांही जण संतप्त होऊन अकतृत्ववान् बनतील व म्हणतील इतकी हुशारी व स्वनाकार करण्याची आता कांही गरज नाहीं, असें कठीण व नापसंत काम या निरोपांत पुढार्‍यनी केले आहे. तो काळ बदलला आहे व सध्या देवाच्या कार्यात विपुल पैसा आहे आणि कार्याच्या सुरवातीला जसे लोकांना खडतर व आणीबाणीच्या परिस्थितींतून जावे लागले तसे आता जाण्याची कांही आवश्यकता नाही, अशा विचारसरणीचा धोका सध्या डोकावत आहे.CChMara 60.3

    परंतु या कार्याच्या आरंभी जसा दीर्घोद्योगीपणा व स्वार्पण करावे लागले. तसेच आतांच्याही कार्यात केले तर आता जे काम होतें. त्यापेक्षा १०० पटीने अधिक काम होईल. 206T 417-419; CChMara 60.4

    आमचा धंदा उच्च दर्जाचा आहे. शब्बाथ पालन करणारे अॅडव्हेंटिस्ट या नात्याने आम्ही देवाच्या सर्व आज्ञा पाळणारे व येशूच्या येण्याची वाट पहाणारे असें स्वत:ला म्हणवितो, देवाच्या थोडक्या लोकांना फार गंभीर असा इशार्‍यचा संदेश देण्यांत आला आहे. आम्ही आपल्या शब्दांद्वारे व कार्याद्वारे असें दर्शवावं कीं, आम्हांवर फार मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. तिची आम्हांला संपूर्ण जाणीव आहे. आमचा प्रकाश इतका स्पष्ट पडावा व इतरांना स्पष्ट दिसावें कीं, आपल्या रोजच्या जीवितांत स्वर्गीय पित्यांचे गौरव व्हावें. आमचा संबंध स्वर्गाशीं असून आम्ही ख्रिस्ताबरोबर दत्तक आहोत अशासाठी कीं जेव्हां तो महान गौरव व सामर्थ्य यांनी युक्त असा येईल तेव्हां आम्ही त्यासारखे व्हावे. 214T 16.CChMara 60.5

    *****