Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    स्वसंतोषाने देणारा प्रत्येक मनुष्य

    आपलें कार्य पुढे जाण्यासाठी देवाने एकच साधन वापरले आहे तें म्हणजे मनुष्याला मालमत्ता देऊन आशीर्वादित केले आहे. त्यांना तो ऊन व पाऊस देतो. भाजीपाला वाढण्यास तोच मदत करतो; तो धन मिळविण्यास सामर्थ्य देतो व आरोग्यहि देतो. आपले सर्व आशीर्वाद त्याच्या विपुलतेच्या बाहंतून मिळतात. त्याकरिता मनुष्यांनी व स्त्रियांनी आपली कृतज्ञता त्याला आपला दशमांश आणि अर्पणे देऊन उपकारस्तुतींची अर्पणं, स्वइच्छंची अर्पणे, दोषार्पणे देऊन दाखवावी. 45T 150;CChMara 73.2

    निवासमंडप बांधण्यात व मंदिर उभारण्यांत यहदी लोकांनी दाखविलेले औदार्य हें उपकारबुद्धीचे उदाहरण असून त्यानंतरच्या ख्रिस्ती लोकाकडून दाखविण्यांत आलेल्या औदार्याची त्याच्याशी तुलना करता येत नाहीं. मिसरांतील अनेक वर्षाच्या दासपणांतून त्यांना नुकतेच सोडविण्यात आलें होतें, व तें अरण्यांत भटकत होतो. त्यांच्या या घाईच्या प्रवासात मिसरी सैन्यापासून सुटका झाली नाही तोच मोशाद्वारे देवाने संदेश दिला. “इस्राएल लोकांस साग कीं, त्यांनी मजसाठीं अर्पण आणावें. जो मनुष्य मनापासून संतोषाने देतो त्याचे अर्पण स्वीकारावे.” निर्गम २५:२.CChMara 73.3

    त्याच्या लोकाजवळ थोडी मालमत्ता होती व दुसरी कांही मिळकत नव्हती. पण त्यांच्यापुढे एक ध्येय होतें तें म्हणजे देवासाठी निवासमंडप बांधणे होय. देव बोलला म्हणून त्यांनी त्यांची वाणी ऐकली पाहिजे. त्यांनी कांही मागें राखून ठेविलें नाहीं. सर्वांनी खुश्न दिले; फक्त कांही उत्पन्नाचाच भाग नव्हें. पण त्यांच्या जवळच्या मालमत्तेचा मोठा भाग त्यांनी दिला त्यानी तो भक्तीभावाने व आनंदाने प्रभुला वाहन दिला व असें करण्यानें प्रभूला सतोष दिला. हें सर्व त्याचे नव्हते का? त्यांच्या जवळची मालमत्ता त्यानें दिली नव्हती काय? जर त्यानें ती परत मागितली तर ती देणाराला परत देणे त्याचे कर्तव्य नव्हते काय? CChMara 73.4

    द्या म्हणून सांगण्याची त्यांना गरज नव्हती. लोकानी वाजवीपेक्षा अधिक आणिलें व यापुढे आणण्याचे थांबविण्यास सांगितलें. कारण जेवढे पाहिजे होतें त्यापेक्षा अधिक आणिलें होतें. पुन:मदिर बांधताना लागणारा खर्च मनापासून देण्यांत आला. लोकांनी नाखुशीने दिले नाहीं. देवाची भक्ति करण्यासाठी उभारण्यांत येणार्‍य मंदिराच्या वाढीमध्ये त्यांना आनंद झाला, व कार्याकरिता गरजेपेक्षा अधिक त्यांनी दिलें.CChMara 73.5

    ज्या ख्रिस्ती लोकांना इब्री लोकापेक्षा अधिक प्रकाश प्राप्त झाला आहे त्यांनी त्यांच्यापेक्षा कमी द्यावे काय? 54T 77-79; अंतकाळांत राहणार्‍य ख्रिस्ती लोकांनी यहुदी लोकांच्या अर्पणापेक्षां निम्मे अर्पण देण्यांत संतुष्ट असावे काय? जे स्वर्गीय दानाचे भागीदार आहेत त्यांच्या अर्पणाद्वारे व स्वखुशीच्या कार्याद्वारे या पृथ्वींत देवाने सत्य व प्रकाशत पसरीला आहे. तुलनात्मक दृष्ट्या पाळक व मिशनरी या नात्याने प्रकाश देण्यास थोडक्यांना बोलाविले आहे. पण हजारों लोकाना आपल्या पैशाने सत्याचा प्रसार करण्यासाठीं सहकार्य करायचें आहे.CChMara 73.6

    एक म्हणतों, देवाच्या कार्यासाठी देण्यास पाचारण येत आहे, मला देण्याचा कंटाळा आला आहे. तुम्हांला आला आहे काय? मग मी असें विचारितों कीं, तुम्हांला देवाच्या परोपकारी हातांतून मिळवून घेण्यास थकवा येतो. काय ? तुम्हांला तो आशीर्वाद देण्याचे थांबेपर्यंत त्याच्या मागणीचा भाग देण्याचे थांबविणार काय? तुम्हीं आशीर्वाद द्यावा म्हणून तो तुम्हांला आशीर्वाद देतो. जेव्हां तुम्हांला घेण्याचा कंटाळा येतो तेव्हां तुम्ही म्हणू शकता कीं, क्या गोष्टींसाठी देण्याचा मला कंटाळा आला आहे. आम्हांला जे मिळते त्याचा कांही भाग देव आपल्यासाठी राखून ठेवतो. जेव्हां तो त्याला परत देण्यांत येतो तेव्हां बाकी राहिलेला भाग आशीर्वादित होतो. पण जेव्हां तो राखून ठेविला जातो तेव्हां सर्वच शापीत होतो. देवाची मागणी प्रथम नंतर इतर मागण्या. 65T 148, 150;CChMara 74.1