Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    स्वनाकार व स्वार्पणाची वृत्त

    तारणाची योजना अमर्याद देवाच्या पुत्राच्या आत्मयज्ञाने आखून देण्यांत आली आहे. ख्रिस्ताच्या क्रूसापासून प्रकाशणारा सुवार्तेचा प्रकाश स्वार्थाला धमकावतो व परोपकारवृत्ति व औदर्या यांना उत्तेजन देतो. देण्यासाठीं वाढत्या मागण्या आहेत म्हणून दु:ख करण्याचे कारण नाहीं. देव आपल्या दयेनुसार आपल्या लोकांना त्याच्या मर्यादित कार्याच्या वर्तुळांतून मोठ्या गोष्टी करण्यासाठी बोलावीत आहे. नैतिक अध:कार जगाला झाकीत असतां अमर्यादित कार्याची यावेळी गरज आहे. जगकपणा व लोभिष्टपणा याद्वारें देवाच्या लोकांची मर्मस्थाने खाऊन टाकिली जात आहेत. त्यांनी समजावे कीं, त्याच्या दयेनेच त्यांच्या पैशाला वाढत्या मागण्या येत आहेत. देवाचे दूत सदिच्छेची कृत्ये व प्रार्थना यांचा निकटचा संबंध जोडतात तो कर्नेल्यसाला म्हणाला, “तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आली आहेत.” प्रेषित १०:४ 26405;CChMara 82.2

    तुमच्या घरांत काटकसरीने वागा. कारण पुष्कळजण मूर्तिपूजेची आवड धरतात व त्याची भक्ति करतात. तुमच्या मूर्ति फेकून द्या. तुमची स्वार्थीपणाची चैन सोडून द्या. मी तुम्हांला विनविते कीं, तुमची घरें सुशोभित करण्यांत पैसा खर्च करूं नका; कारण हा देवाचा पैसा आहे. तुम्हांकडे तो पुन: पैशाची मागणी करील. आईबापानों, ख़िस्ताकरिता प्रभूचा पैसा मुलांचा लाड पुरविण्यासाठी वापरू नका. ख्यालीखुशाली व मील करण्यास त्यांना जगांत नावलौकिक मिळविण्यास शिकवू नका. याकडून ख्रिस्त ज्यांच्यासाठी मेला त्या आत्म्यांना तारण्यास तें तयार होतील काय ? नाहीं. उलट त्याकडून हेवा, मत्सर व वाईट तर्क निर्माण होतील. तुमची मुलें जगाचा अतिरेक व दिमाख करण्यासाठी तयार होतील आणि प्रभूचा पैसा ज्याद्वारे सुख व आरोग्य लाभणार नाही त्याकरितां तें खर्च करतील.CChMara 82.3

    तुमची तुमच्या मुलावरील प्रीति त्यांच्या फाजील गर्वाने व अतिरेकाने व दिमाखानें तुम्ही दर्शविता असें तुमच्या लेकरांना शिकवू नका. पैशाचा उपयोग करण्याचे मार्ग शोधीत बसण्याची ही वेळ नाहीं. तुमची शोधकबुद्धि काटकसर कशी करावी याकडे वापरा. स्वार्थीवृत्तीची हाव धरण्याऐवजी, व ज्याकडून विचार शक्ति नाश पावेल अशा वस्तूसाठी पैसा खर्च करण्याऐवजी स्वत:चा त्याग कसा करावा ह्याचा अभ्यास करा अशासाठीं कीं, सत्याचा दर्जा नवीन क्षेत्रात उंचावण्यासाठी खर्चण्यास तुम्हांजवळ कांहींतरी असावें. हुशारपण ही एक देणगी आहे; आत्म्याच्या तारणासाठी आपला पैसा कसा वापरावा याचा अभ्यास करण्याकडे तिचा उपयोग करा. 276T 450, 451;CChMara 82.4

    जे इतरांचे कल्याण करण्यासाठी स्वत:चा नाकार करतात व स्वत:ला वाहून घेतात व ख्रिस्ताच्या सेवेसाठी सर्वस्व देतात त्यांना स्वार्थी मनुष्य व्यर्थपणे शोधीत असलेल्या सुखाची कल्पना येईल. आमचा तारणारा असें म्हणाला, “जो कोणी स्वत:चा नाकार करीत नाही. त्याला माझा शिष्य होता येत नाही.’ लूक १४:३३. प्रीती “स्वार्थ पाहात नाही.” ख्रिस्ताच्या जीविंतात दिसून आलेल्या प्रीतीचे व सदिच्छेचे फळ होय. देवाचे नियमशास्त्र आमच्या अंत:करणात बाळगल्याने आमच्या आवडी देवाच्या उच्च व सार्वकालिक विचाराच्या अधीन होतील. 283T 397.CChMara 83.1

    *****