Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    प्रकरण १० वे - ख्स्ति आमची धार्मिकता

    “जर आम्ही आपली पापे कबूल करतो, तर तो विश्वासू व न्यायी आहे. तो आमच्या पापांची क्षमा करील व सर्व अधर्मापासून शुद्ध करील.” १ योहान १:९.CChMara 88.1

    आम्हीं आपली पापें कबूल करावी अशी देवाची मागणी आहे व त्यासमोर आमचीं अंत:करणे नम्र करावी, पण त्याचवेळीं तो आमचा प्रेमळ पिता या नात्याने त्याजवर आमचा भरवसा असावा, कारण जे त्याजवर भरवसा ठेवतात त्यांना तो विसरणार नाहीं. आपल्यापैकी पुष्कळ जन दृश्य पुराव्याने चालतात, विश्वासाने चालत नाहीत. ज्या गोष्टी आम्हांला दिसतात त्यावर आम्ही विश्वास ठेवतों, पण देवाच्या वचनात दिलेलीं मौल्यवान् आश्वासने आहेत त्यांवर विश्वास ठेवीत नाहींत, आणि तो जे कांही म्हणतो त्यावर अविश्वास ठेवून देवू आम्हांला फसवितो कीं, तो आमच्याशी प्रामाणिकपणे वागतो असा प्रश्न मनात आणणे यापेक्षा देवाचा अनादर दुसर्‍य कशानेही करूं शकत नाही.CChMara 88.2

    आमच्या पापामुळें देव आम्हांला सोडीत नाहीं. आम्ही चुका करून पवित्र आत्म्याला दु:ख देतो; पण जेव्हां आम्ही पश्चात्ताप करतो व पश्चातापी अंत:करणाने त्याजकडे येतो तेव्हां तो आम्हांला घालवून देत नाही. कांही अडखळणे बाजूला सारली पाहिजेत, वाईट कल्पना मनात बाळगल्या गेल्या आहेत; गर्व, आत्मसंतुष्टता, भित्रेपणा आणि कुरकुर या गोष्टी अंत:करणात दिसून आल्या आहेत. या सर्व गोष्टी देवापासून आम्हांला वेगळे करतात. पापांची कबूली झाली पाहिजे. अंत:करणांत कृपेचे कार्य झाले पाहिजे. ज्यांना अशक्तपणा आणि निराशा वाटते तें देवाचे बळकट पुरुष बनतील व देवाकरिता सर्वश्रेष्ठ काम करतील; पण त्यांनी उच्च तत्त्वानुसार कार्य केले पाहिजे. त्यांनी स्वार्थी हेतुनें बहकून जाऊं नये.CChMara 88.3

    आम्ही खिस्ताच्या शाळेत शिकले पाहिजे त्याची धार्मिकताच फक्त कृपेच्या कराराच्या आशीर्वादाला प्राप्त करील. फार दिवसापासून हें आशीर्वाद मिळवून घेण्याचे प्रयत्न केले गेले व त्यांची इच्छा बाळगली गेली, पण तें प्राप्त झाले नाहींत. कारण आम्हांला असें वाटले कीं, आम्ही या आशीर्वादाला पात्र होण्यासाठी कांही तरी करूं. आम्ही दूरवर पाहिलें नाहीं व येशू तारणारा आहे असा विश्वास ठेविला नाही. आम्हीं असा विचार करूं नये कीं आमच्या स्वत:च्या सद्गुणाने स्वत:ला तारु; खिस्ताची कृपा फक्त आमची तारणाची आशा आहे. तो आपल्या भविष्यवाद्याद्वारे आम्हांला वचन देतो, “दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्यावर दया करील; तो आमच्या देवाकडे वळो कारण तो त्याला भरपूर क्षमा करील.” यशया ५५:७ आम्हीं या वचनावर विश्वास ठेवावा व विश्वासाकरिता कल्पना बाळगू नयेत. जेव्हां आम्ही देवावर पूर्ण भरवसा ठेवतों, व ख्रिस्ताच्या सद्गुणावर अवलंबून राहतो व तो पापक्षमा करणारा तारणारा आहे असा विश्वास घरतो, तेव्हां आम्ही इच्छिलेली सर्व मदत आम्हांला मिळेल. CChMara 88.4

    आपण तारण करून घेण्यास समर्थ आहोत अशा रीतीने वागतों; पण आम्ही हें करण्यास दुर्बळ आहोंत म्हणून येशू ख्रिस्त आम्हांसाठी मेला. त्याच्यामध्ये आमची धार्मिकता व आमचे नीतिमत्व आहे. आम्हांला तारणारा नाही किंवा तो आम्हांला दया दाखवीत नाही म्हणून भिण्याचे व निराश होण्याचे कांही कारण नाहीं. याच घटकेला आमच्यासाठी काम करीत आहे, व आमच्या निराधार स्थितींत त्याजकडे जाऊन तारण पावण्यास तो आमंत्रण करीत आहे. आमच्या अविश्वासाने आम्ही त्याचा अपमान करतो. आम्ही आपल्या उत्तम मित्राला कसे वागवितों हें नवल वाटण्यासारखे आहे. जो पूर्णपणे तारण्यास समर्थ आहे व आपल्यावरील महान् प्रीतीचा पुरावा दिलेला आहे त्याजवर किती अल्पविश्वास दाखवितो! CChMara 89.1

    माझ्या भावांनो, तुमचा चांगुलपणा देवाच्या पसंतीपुढे तुमची शिफारस करील अशी इच्छा बाळगता काय? तारणासाठी त्याच्या सामर्थ्यावर भरवसा ठेवण्याअगोदर तुम्ही पापांपासून मुक्त झाले पाहिजे असा विचार करता काय ? हेच विचार जर तुमच्या मनांत चालले आहेत तर तम्हांला शक्ति मिळणार नाही व शेवटीं तुम्ही निराश व्हाल.CChMara 89.2

    अरण्यांतील बंडखोर इस्राएल लोकांस चावण्यासाठी विषारी साप परमेश्वराने सोडले. तेव्हां एक पितळी सर्प उंच करावयला मोशाला सांगण्यांत आलें आणि ज्यांना तें चावले होतें त्याना त्याकडे पाहन वाचण्यास बजाविलें, पण पुष्काळांना या स्वर्गीय योजनेतील उपाय फायद्याचा वाटला नाहीं. मेलेले व मरत असलेले त्याच्याभोवती होतें त्यांना समजले कीं दैवी मदतीशिवाय आमचा नाश खात्रीने होणार; परंतु तें आपल्या जखमेबद्दल, दुःखाबद्दल, त्याच्या खात्रीपूर्वक मरणाबद्दल त्यांची शक्ति हरण होईपर्यंत त्यांनी शोक केला व जेव्हां तें तत्क्षण बरे झाले तेव्हां त्यांचे डोळे दिपून गेले.CChMara 89.3

    “मोशानें अरण्यांत जसा सर्प उंच केला तसे मनुष्याच्या पुत्राला उंच केले जाईल. अशासाठीं कीं ज्यांनी त्याजवर विश्वास ठेविला त्यांचा नाश होऊ नये तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. जर तुमच्या पापाची तुम्हांला जाणीव आहे, तर त्याकरिता शोक करण्यांत सर्व शक्ति खर्च करूं नका, पण वर दृष्टि करा आणि जिवंत राहा. येशूच केवळ आमचा तारणारा आहे. जरी लाखों लोकांना तारणाची गरज आहे तरी तें त्याची दया नाकारतील. जो कोणी त्याच्या चांगुलपणाकडे पाहील त्याचा नाश होणार नाहीं. खिस्ताविना आम्ही आमची दुर्बलावस्था पाहूं तेव्हां आम्ही निराश होऊ नये; आम्हीं क्रूसी दिलेल्या व पुनरुत्थित झालेल्या येशूवर अवलंबून राहावे; पापाने पिडलेल्या गरीब व निराश अशा आत्म्याने पाहावे व जगावें. येशूनें आपले वचन दिले आहे; जे त्याजकडे येतील त्या सर्वांना तो तारील.CChMara 89.4

    येशूकडे या व शांति आणि विसावा पावा. तुम्हांला आतांसुद्धा आशीर्वाद मिळेल. सैतान म्हणतो कीं तुम्ही निराधारी आहांत व आशीर्वाद मिळवू शकत नाही. तुम्ही निराधारी आहांत हें खरे आहे. पण त्यापुढे येशुला उंच करा. “मला पुरुत्थित तारणारा आहे. त्यामध्यें माझा विश्वास आहे व तो माझी अडचण करणार नाही. त्याच्या नावात मला विजय आहे. तो माझी धार्मिकता आहे व हर्षाचा मुकुट आहे.” कोणालाही वाटू नये कीं, त्याची स्थिति आशाहीन आहे. कारण ती तशी नाही. तुम्हांला वाटेल कीं, तुम्ही पापी व टाकावू आहांत. पण याच स्थितींत तुम्हांला तारणाच्याची गरज आहे. जर तुम्हांला पापाची कबूली करावयाची आहे तर उशीर करूं नका ही सोन्यासारखी वेळ आहे. जर आपण स्वत:ची पापें पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून तो आपल्या पापाची क्षमा करील व आपल्याला सर्व अधर्मापासून शुद्ध करील.” १ योहान १:९ ज्यांना धार्मिकतेची तहान व भूक लागली आहे तें तृप्त होतील. कारण येशूनें तसे वचन दिले आहे. मौल्यवान् तारणारा ! त्याचे बाहू आम्हांला स्वीकारण्यासाठी पुढे आहेत व त्याच्या महान् प्रीतीचे अंत:करण आम्हांला आशीर्वाद देण्यास तयार आहे.CChMara 89.5

    कांहींना वाटतें कीं, त्यांचा कृपेचा काळ दिला पाहिजे व त्यांनी आशीर्वादाची अपेक्षा करण्याअगोदर प्रभुपुढे मात्र ठरले पाहिजे व त्याची सुधारणा झाली पाहिजे. पण हें प्रिय आत्म्या त्याच्या आशीर्वादाची आताहि मागणी करूं शकतोस. त्याची दया, व ख्रिस्ताचा आत्मा त्याच्या अशक्तपणांत त्यांना मदत करण्यास पाहिजे. नाहींतर त्यांना खिस्तीशील बनविता येणार नाही. आम्ही येशूकडे जसे आहों तसेच - पापी, निराधार व परावलंबी असतांना यावे, अशी येशूची इच्छा आहे.CChMara 90.1

    पश्चात्ताप व पापक्षमा ह्या खिस्ताद्वारें देवाच्या देणग्या आहेत. पवित्र आत्म्याद्वारे आमची पापाबद्दल खात्री होतें. क्षमेची गरज भासते. फक्त पश्चात्तापी जणांनाच क्षमा मिळेल. देवाची दया पश्चात्ताप करायला लावते, त्याला आमचा अशक्तपणा व दुबळेपणा माहीत आहे आणि तोच आम्हांला मदत करील.CChMara 90.2

    कांहीं पश्चात्ताप व पापकबूली करून देवाकडे येतात. त्यांची क्षमा झाली आहे असा त्यांचा विश्वास असतो तरी तें देवाची आश्वासने मागण्यास चुकतात. येशू हा सर्वसाक्षी तारणारा आहे हें त्यांना दिसत नाहीं. आपला आत्मा त्याला वाहन देण्यास तयार होत नाहींत. त्याच्या अंत:करणात दयेचे चाललेले कार्य पूर्ण करण्यास त्यांना त्याच्यावर अवलंबून राहावे लागते हें समजत नाहीं. तें स्वत:स देवाला वाहून देत आहेत असें त्यांना वाटते, तरी तें स्वत:वर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहातात. कांही आत्मे देवावर अर्धा विश्वास ठेवतात व अर्धा स्वत:वर ठेवतात तें देवाकडे पाहात नाहींत व त्याच्या सामर्थ्याने राखले जात नाहींत. पण मोहावर विजयी होण्यासाठी सावध राहातात. कामगिरीच्या तत्त्वावर अवलंबून त्यानें आपला स्वीकार करावा असें काहींना वाटते. अशा विश्वासात विजय नाहीं. अशा व्यक्ति व्यर्थ खटपट करतात. त्यांचा आत्मा अखंड गुलामगिरीत राहतो व त्यांचे ओझे येशूच्या चरणाजवळ ठेवल्याशिवाय त्यांना विसावा नाहीं. CChMara 90.3

    अखंड सावधगिरीची आवश्यकता आहे, व मनापासूनच्या प्रेमळ भक्तीचीहि गरज आहे. विश्वासाद्वारे देवाच्या सामथ्र्याने आत्मा राखिला जाईल तेव्हां स्वाभाविकरित्या ह्या गोष्टी घडतील. दैवी मर्जी संपादन करून घेण्यास आमची प्रशंसा करण्याइतके आम्ही कांही करुं शकत नाहीं. आपण स्वत:वर व स्वत:च्या सत्कृत्यावर भरवसा ठेवू नये. पण चुकणारे, पापी या नात्याने खिस्ताकडे यावे, तेव्हां त्याच्या प्रीतीत विसावा मिळेल. येशूच्या चांगुलपणावर पूर्णपणे जे विश्वास ठेवतात त्यांनाच देव स्वीकारील. अंत:करणात प्रीति निर्माण होतें पण शांतिमय विश्वासहि मुख्य आहे. प्रत्येक ओझे हलके आहे. कारण ख्रिस्ताचे जू भारी नाहीं. कामात आनंद वाटतो व आत्मयज्ञांत समाधान वाटते. अधारांतील रस्ता धार्मिकतेच्या सूर्याच्या किरणापासून तेजस्वी होतो. ख्रिस्त जसा प्रकाशांत आहे तसे प्रकाशांत चालावें. 12TT 91-95CChMara 90.4

    *****

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents