Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    देवाच्या स्वीकाराची खात्री बाळगणारांना सल्ला

    देवानें आपला स्वीकार केला आहे हें कसे समजायचे ? त्याच्या वचनाचा प्रार्थनापूर्वक अभ्यास करा. दुसर्‍य कोणत्याहि पुस्तकाकडे वळू नका. हें पुस्तक पापाची खात्री पटविते. तें अगदी स्पष्टरित्या तारणाचा मार्ग प्रगट करतें तें गौरवी व तेजस्वी असें वेतन दर्शविते. तें तुम्हांला पूर्ण तारणारा प्रगट करते व त्याच्या अमर्याद दयेंने फक्त तुम्हांला तारणाची अपेक्षा करता येते असें शिकवितें.CChMara 100.5

    गुप्त प्रार्थनेचा कंटाळा करुं नका. कारण ती धर्माचा आत्मा आहे कळकळीनें व अखंडरीत्या आत्म्याच्या शुद्धतेसाठी प्रार्थना करा. तुमचा जीव धोक्यात असताना जसे तुम्ही मर्त्य जिवाकरता कळकळीने व उत्सुकतेने विनंति कराल तशीच विनंति करा. तारणासाठी तुम्हांमध्ये अवर्णणीय इच्छा उत्पन्न होईपर्यंत व आपल्या पापक्षमेचा गोड पुरावा मिळेपर्यंत देवासमोर राहा. 141T 163; CChMara 100.6

    तुम्हांला जे मोह व संकटें येतील त्याकडे पाहून चकित व्हावे अशा स्थितीत येशूनें तुम्हांला सोडून दिले नाही. या संबंधाने त्यानें तुम्हांस सर्व सांगून ठेवले आहे. संकटें येतात तेव्हां निराश व दबलेले होऊ नका हेहि सांगून ठेविले आहे. तुमचा तारणारा येशू याकडे पाहा व आनंदीत व हर्षित व्हा. सोसण्यास कठीण अशी संकटे आपल्या बंधूकडून येतात व आपल्या ओळखीच्या मित्राकडून येतात. तरी हीं संकटें धैर्याने सहन करावीत. येशू योसेफाच्या नव्या कबरेंत निजला नाही. तो उठला आहे व आमची मध्यस्थी करण्यास स्वर्गात गेला आहे. आम्हांवर प्रीति करून आम्हांसाठी मरणारा उद्धारक आहे अशासाठीं कीं ज्याच्याद्वारे आम्हांला आशा, धैर्य, शक्ति मिळून सिंहासनावर ठिकाण प्राप्त व्हावे. जेव्हां जेव्हां तुम्ही त्याची योजना कराल तेव्हां तेव्हां तो तुम्हांला मदत करण्यास शक्तिमान आहे. CChMara 101.1

    जो दर्जा तुम्हांला मिळाला आहे त्याबद्दल तुम्हांला कमीपणा वाटतो काय? याबद्दल देवाचे उपकार माना. तुम्हांला जितकी अधिक दुर्बलता वाटेल तितक्या अधिक प्रमाणात तुम्ही मदतगाराचा शोध कराल. “देवाच्या जवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल.” याकोब ४:८. तुम्हीं सुखी व आनंदीत असावे अशी येशूची इच्छा आहे. तुम्हांला देवाने जितकी ताकद दिली आहे त्याप्रमाणात तुम्ही तुमची पराकाष्ठा करावी अशी त्याची इच्छा आहे. तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवावा अशासाठीं कीं, तुमचे ओझे वाहाण्यासाठी तुम्हांला मदतगार मिळून मदत व्हावी.CChMara 101.2

    मनुष्याच्या निर्दय भाषणाकडून तुम्ही स्वत: दुखी होऊ नका. येशूविषयीं लोक निर्दयतेने बोलले नाहीत का? कधीं कधीं तुम्ही चुका करून इतरांना निर्दयतेने बोलण्यास प्रसग देता पण येशूनें कधीही दिला नाहीं. तो शुद्ध, डागविरहित व निर्मळ असा होता. गौरवी राजपुत्राच्या जीवितांत ज्या गोष्टी होत्या त्यापेक्षा अधिक चांगल्या गोष्टींची अपेक्षा करूं नका. जेव्हां तुमच्या शत्रूना दिसते कीं, तें तुम्हांला दुखवू शकतात. तेव्हां त्यांना आनंद होईल व सैतानाला आनंद होईल. येशूकडे पाहा व त्याच्या गौरवासाठींच कार्य करा. तुमचे अंत:करण देवाच्या प्रीतींत राखा. 158T 128, 129;CChMara 101.3

    भावना केवळ पवित्रीकरणाचा पुरावा नाहींतCChMara 101.4

    सुखी भावना किंवा दु:खी भावना या गोष्टीच फक्त पवित्रिकरणाचे पुरावे नाहींत. तात्कालीक पवित्रीकरण अशी एखादी गोष्टच नाहीं. खरें पवित्रीकरण हें रोजचे काम आहे व ते आयुष्याच्या शेवटापर्यंत चालत राहाते. जे रोजच्या मोहाशी झगडत आहेत व आपल्या पापिष्ट वृत्तीवर जय मिळवीत आहेत आणि अंत:करण व जीवित यांच्या पावित्र्याविषयीं खटपट करीत आहेत तें पवित्रपणाविषयी फुशारकी मारीत नाहींत. तें धार्मिकतेची भूक व तहान लावून घेतात. पाप हें अतिशय ओंगळ असें त्यांना वाटते. 16SL 10;CChMara 101.5

    आम्ही पापी आहों म्हणून देव आम्हांला टाकीत नाहीं. आम्ही चुका करतों व पवित्र आत्म्याला दुखवितों; परंतु जेव्हां आम्ही पश्चात्ताप करतों व पश्चात्ताप अंत:करणाने त्याजकडे येतो तेव्हां तो आम्हांला दर लोटणार नाही. कांही अडखळणे काढून टाकली गेली पाहिजेत. चुकीच्या भावना बाळगल्या गेल्या आहेत आणि गर्व व कुरकुर या गोष्टीही अंत:करणांत बाळगल्या गेल्या आहेत. या सर्व गोष्टी आपणांला देवापासून दूर करतात. पापांची कबुली दिली पाहिजे. अंत:करणात कृपेचे खोल कार्य घडले पाहिजे. जे दुर्बल व निराश आहेत तें देवाचे बलवान् पुरुष बनतील व आपल्या धन्यासाठी श्रेष्ठ कार्ये करतील पण त्यानी उच्च पातळींतून कार्य केले पाहिजे; त्यांच्यात स्वार्थी हेतु नसला पाहिजे.CChMara 102.1

    काहींना वाटते कीं, आपल्याला सवलत असावी व त्याचा आशीर्वाद मागण्यापूर्वी तें सुधारले आहेत असें त्यांनी प्रभूला सिद्ध करून दाखवावे. पण हें प्रिय आत्म्यांनी आतांहि त्याच्या आशीर्वादाची मागणी करूं शकता. त्यांनी त्याची कृपा मिळविली पाहिजे, ख्रिस्ताचा आत्मा मिळवून त्यांच्या दुरावस्थेत मदत मिळवावी. नाहींतर तें ख्रिस्ती शील बनवू शकणार नाहींत. आम्ही येशूकडे यावे अशी त्याची इच्छा आहे. जसे आम्ही आहों तसे - पापिष्ट व निराधारी असें त्याकडे यावे.CChMara 102.2

    पश्चात्ताप व पापक्षमा या देणग्या ख्रिस्तीद्वारे देवापासून प्राप्त होतात. पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे आम्हांला पापाची खात्री होतें व पापाची क्षमा व्हावी असें वाटावे. फक्त पश्चात्तापी असतात त्यांना क्षमा होतें, पण देवाच्या कृपेनेच अंत:करण पश्चात्तापी होतें. त्याला आमचा अशक्तपणा व दुर्बलता माहीत आहे व तोच आमची मदत करणारा आहे. 172TT 91-94;CChMara 102.3

    पुष्कळदां निराशा व अधार आत्म्यावर येऊन आम्हांवर त्याचा पगडा बसण्याची भीति वाटते; पण आम्ही आमचा भरवसा टाकून देऊ नये. आम्हांला वाटों अगर न वाटों आम्हीं आपली दृष्टि येशूकडे लावावी. आम्हांला माहीत असलेले प्रत्येक कार्य विश्वासाने करावे व शात रितीने देवाच्या वचनावर अवलंबून राहावें.CChMara 102.4

    आपल्या अपात्रतेच्या खोल जाणीवेमुळे भीतीची धमकी बसेल पण याकडून देवाने आपले मुख आम्हांपासून काढून घेतले आहे असें म्हणता येत नाही. आपल्या मनाला ठराविक भावनात्मक हेतुचा लगाम घालण्याचा प्रयत्न करूं नये. काल वाटणारा आनंद व शांति आज आपल्याला भासणार नाहीं; पण आहीं विश्वासाने ख्रिस्ताचा हात धरावा व उजेडात जसे पूर्णपणे भरवसा ठेवतो तसा अधारातहि ठेवावा. CChMara 102.5

    जे विजयी होणार आहेत त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या मुकुटाकडे विश्वासाने पाहाता राहावे. तारलेल्यांच्या विजयी गाण्याकडे कान द्या, ज्याने आमचा उद्धार केला व जो वधला गेला असा तो कोंकरा आहे. या गोष्टी खर्‍य आहेत असें समजून घेण्याचा प्रयत्न करा.CChMara 102.6

    जर आपण अधिक प्रमाणात ख्रिस्तावर व स्वर्गीय गोष्टीवर लक्ष केंद्रित करूं तर आपणास प्रभूच्या लढाईसाठीं शक्ति प्राप्त होईल. जगिक गोष्टीवरील प्रीति कमी होऊन जे आमचे गृह होणार आहे त्या गौरवी देशाकडे मन लागेल. ख्रिस्ताच्या सौंदर्याशिवाय जगक मोहाच्या सर्व गोष्टी कमी महत्त्वाच्या वाटतील.CChMara 102.7

    जरी पौल रोमच्या तुरुगात होता व स्वर्गाच्या उजेडापासून व वातावरणापासून त्याला कोंडून घातलें होतें, सुवार्तेच्या कार्यापासून त्याला अलिप्त केले होतें व लवकरच त्याला मरणाची शिक्षा देणार होतें तरी त्यानें संशय किंवा निराशा यांना जागा दिली नाही. त्याच्या निराशजनक अधाच्या गुहेपासून मरणाची साक्ष ऐकू आली. त्यात दैवी विश्वास व धैर्य याद्वारें नंतरच्या युगांतील संताना व धर्मवीरांना प्रेरणा प्राप्त होत आहे. त्याचे शब्द पवित्रीकरणाचा जो परिणाम त्याचे वर्णन करतात. त्या पवित्रीकरणाविषयी आम्ही लिहिण्याचा प्रयत्न करीत आहों. “मी आता मरण्यास तयार आहे व माझ्या वियोगाची वेळ जवळ आली आहे. मी माझी धाव संपविली आहे. युद्ध संपविले आहे. विश्वास राखिला आहे. आता नीतिमत्त्वाचा मुकुट मजसाठी राखिला आहे, एवढेच नव्हें पण तो नीतिमान् न्यायाधीश त्या दिवशी मला देईल आणि फक्त मलाच नव्हें पण त्याचे येणें ज्यास प्रिय झाले आहे त्यांस देईल.” (२ तिम. ४:६-८.) 1889-96CChMara 103.1

    *****