Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकरण १३ वे - मंडळीची स्थापना

    ख्रिस्ताचा आज्ञाहुकूम कोणीतरी पूर्ण केला पाहिजे. त्यानें पृथ्वीवर सुरू केलेले कार्य कोणीतरी चालूं ठेवले पाहिजे आणि मंडळीला ही संधि दिली आहे. याच हेतूस्तव तिची स्थापना झाली आहे. 16T 295;CChMara 108.1

    पाळकांना नीटनेटकेपणा आवडला पाहिजे व त्यांनी स्वत:ला शिस्त लावली पाहिजे. मग तें देवाच्या मंडळीला शिस्त लावू शकतील व तें उत्तम शिक्षण मिळालेल्या सैन्याच्या तुकडीप्रमाणे ऐक्याने त्यांना काम करण्यास शिकवू शकतील. जर रणागणावरील कार्य फलद्रूप होण्यासाठी व्यवस्था व शिस्त आवश्यक आहे तर ज्या युद्धात आम्हीं गुंतलो आहोत त्यात हें किती विशेषेकरून आवस्यक आहे. कारण आमचा हेतु फार महत्त्वाचा असून शीलाच्या अधिक उच्चतेच्या लढाईवर असलेल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ज्या लढ्यात आम्ही गुतलो आहों त्यात सार्वकालिक जीवन पणास लावलेले आहे.CChMara 108.2

    दूत ऐक्यानें कार्य करतात. त्यांच्या सर्व हालचालींत पूर्ण व्यवस्था दिसून येते. जितक्या अधिक प्रमाणात दूतांची व्यवस्था व शिस्त याची नक्कल करुं तितक्या अधिक प्रमाणात आम्हासाठी या स्वर्गीय दुताचे प्रयत्न यशस्वी होतील. ज्याना वरून उत्साह प्राप्त झाला आहे तें त्याच्या सर्व कार्यात व्यवस्था, शिस्त व कार्याची एकवाक्यता यांना उत्तेजन देतील व देवांचे दूत त्याच्याशी सहकार्य करतील. पण हें स्वर्गीय सेवक अनियमितपणा, अव्यवस्था आणि गैरशिस्त याबाबतींत आपली पसंती केव्हाही दाखविणार नाहींत. ही सर्व वाईट कृत्ये, आमची सेना दुर्बल करण्याची सैतानाची खटपट, धैर्य खचविणे व विजयी कार्याला अडथळा आणणे यांची फळें होत.CChMara 108.3

    सैतानाला माहीत आहे कीं, शिस्त व एकीचे कार्य याद्वारें विजय प्राप्त होतो. त्याला चांगलं माहीत आहे कीं ज्या गोष्टींचा स्वर्गाशी संबंध येतो त्या सर्वस्वी शिस्तबद्ध असतात. देवाला पूर्ण शरण जाणे व पूर्ण शिस्तीने वागणे या गोष्टी स्वर्गीय दूतगणांची हालचाल व्यक्त करतात. त्याची जोराची खटपट ही आहे कीं, ख्रिस्ती माणसांना देवाच्या व्यवस्थेपासून जितकें दूर नेता येईल तितकें दूर न्यावे. म्हणून तो देवाच्या लोकांनाही फसवितों. व्यवस्था व शिस्त या गोष्टी आत्मिक बाबींच्या शत्रु आहेत असा त्यांचा ग्रह करून देतो. एकच संरक्षणाचा मार्ग आहे तो म्हणजे ज्याने त्यानें आपल्या स्वत:चा मार्ग चोखाळावा, व मंडळींत एकत्र झालेल्या ख्रिस्ती लोकापासून विशेषकरून वेगळे राहावे असें शिकवितो. कारण तें कार्याची जुळणी करून शिस्त व सव्यवस्था निर्माण करण्यासाठी कार्य करीत आहेत म्हणून सैतान त्याना वरीलप्रमाणे फसवितो. सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न धोक्याचे व हक्काच्या स्वातंत्र्याची हरकत असें वाटून तें भितात. हीं ठकविलेली माणसें आपल्या स्वातंत्र्याविषयीं फुशारकी मारणे हा सद्गुण समजतात व स्वतंत्ररित्या विचार करणे व कार्य करणेहि सद्गुण आहे असें समजतात. तें कोणत्याहि मनुष्याचा सल्ला घेणार नाहींत. तें कोणाच्या म्हणण्याला होकार देणार नाहींत. मला असें दाखविण्यांत आलें कीं, स्वत: बाहेर पडून आपली योजना आखावी व भावाच्या मताविरुद्ध स्वतंत्र विचार करावा असा देवाचा हुकूम आहे असें मनुष्याला वाटू देण्यास भाग पाडणे हें सैतानाचे विशेष कार्य आहे. 21T 649, 650;CChMara 108.4

    देवानें या पृथ्वीवरील आपली मंडळी प्रकाशाचे साधन केले आहे. त्याद्वारे तो आपले हेतु व स्वच्छ प्रगट करतो. तो आपल्या सेवकांपैकी एकास स्वतंत्र अनुभव मंडळीच्या अनुभवाविरुद्ध देत नाही किंवा एकाच मनुष्याला सर्व मंडळीसाठी त्याच्या इच्छेचे ज्ञान देत नाहीं; आपली मंडळी अंधारात असतांना तो हें करीत नाहीं. त्याच्या योजनेत तो आपल्या सेवकांना आपल्या मंडळीच्या निकट संबंधात आणतो. अशासाठीं कीं, त्यांचा स्वत:वर कमी भरवसा बसवा व त्याचे कार्य पुढे नेण्यासाठी ज्यांना तो मार्गदर्शन करीत आहे त्यांच्यावर मोठा भरवसा ठेवावा. 3AA 163;CChMara 109.1