Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकरण १७ वें - सर्व जगांतील ख्रिस्ती लोक ख्रिस्तांत एक होतात

    (या प्रकरणांतील पुष्कळसा सल्ला श्रीमती व्हाइट यांनी वेगवेगळ्या देशांतून व वेगवेगळ्या चालीरिती व भाषा बोलणारे कामदार एकत्र जमले असतां दिला आहे. कांही कामदारांना वाटले कीं, प्रभूनें श्रीमती ई. जी. व्हाईटद्वारे दिलेला सल्ला फक्त श्रीमती व्हाईटच्या देशातीलच लोकांना लागू आहे. - व्हाईट ट्रस्टीज)CChMara 130.1

    जर आम्ही मुलासारख्या साध्या विचाराने ती जशी आपल्या आई बापाकडे जातात तसे जाऊ व त्यानें देऊ केलेल्या गोष्टींची मागणी करूं व त्या आम्हांला मिळणार असा विश्वास धरू तर त्या आम्हांला मिळतील. जर आम्ही सर्व आपला विश्वास जसा दर्शवावा तसा दर्शवू तर देवाच्या आत्म्याने अधिक प्रमाणात आम्ही आशीर्वाद मिळवून घेवू. आपली सभा आणखी कांही दिवस राहील म्हणून मला आनंद वाटतो. आता प्रश्न असा आहे कीं, आम्ही झर्‍यकडे येऊन पिणार आहे का? सत्याने शिक्षक म्हणून आम्ही योग्य कित्ता घालणार काय? जर आम्ही त्याच्या वचनाप्रमाणे विश्वासाने त्याचा स्वीकार करुं तर देव मोठ्या गोष्टी आम्हासाठी करील. म्हणून देवासमोर येथे सार्वजनिक नम्रता आम्हांला दिसावी. CChMara 130.2

    ही सभा सुरू झाल्यापासून, मी प्रीति व विश्वास यावर अधिक भर द्यावा असें मला भासलें. याचे कारण तुम्हांला या साक्षीची गरज आहे. जे मिशन क्षेत्रांत गेले आहेत. त्यापैकी कांही जण म्हणतात: “तुम्हांला फ्रेंच लोकांचा स्वभाव कळणार नाहीं, तुम्हांला जर्मन लोकांचा स्वभाव कळणार नाही. त्यांना याच मार्गाने भेटले पाहिजे.” CChMara 130.3

    पण मी विचारतें कीं, देवाला त्याची माहिती नाहीं काय? तोच आपल्या सेवकाला लोकांकरतां संदेश देत नाही का? त्याला त्यांना कोणती गोष्ट हवी आहे हें कळते. त्याच्यापासून जो संदेश येतो व आपल्या सेवकाद्वारे लोकांना दिला जातो, तेथें तो आपले कार्य पूर्ण कराल. तो सर्वांना ख्रिस्तांत एक करील. जरी काहीं स्वत:ला फ्रेंच, जर्मन, अमेरिकन समजतात तरी तें ख्रिस्तांत एक समजले जातील.CChMara 130.4

    यहुद्यांचे मंदिर डोंगरांतील खाणींतून घडलेल्या दगडाचे बांधले होतें प्रत्येक दगड यरुशलेमास आणण्यापूर्वी तपासून घडून व त्याला चमक देऊन तो मंदिरात बरोबर बसेल कीं नाही याची तपासणी केली होती. तें सर्व तेथें आणले तेव्हां इमारत बांधताना हातोडा किंवा कु-हाड यांचा मुळीच आवाज आला नाहीं. ही इमारत देवाच्या आत्मिक मदिराचे दर्शक आहे. या इमारतीचे सामान प्रत्येक राष्ट्र, भाषा, लोक म्हणजे श्रीमंत व गरीब, अडाणी व सुशिक्षित, उच्च व नीच यांतून गोळा केले आहे. हें हातोडी व छन्नी यांनी घडविण्याच्या वस्तु नव्हते. तें जीवत धोंडे निश्चयें या जगाच्या खाणींतून काढलेले आहेत ! महान कारागीर मंदिराचा प्रभु असून तो त्यांना चमक देत आहे. आत्मिक मंदिरांत त्यांच्याजागी बसवत आहे. जेव्हां हें मंदिर पूर्ण होईल तेव्हां सर्व भागांत तें पूर्ण होईल व त्याकडून मनुष्याला व दूतांना नवल वाटेल. कारण त्याचा योजणारा व बांधणारा देव आहे. कोणालाही असें वाटू नये कीं, त्याच्यावर टोला मारण्याची गरज नाहीं.CChMara 130.5

    प्रत्येक विचारात व सवयीमध्ये पूर्ण असणारे एकही राष्ट्र किंवा एकही व्यक्ति नाहीं. एकाने दुसन्यापासून शिकले पाहिजे. म्हणूनच वेगवेगळ्या देशांतील लोकांनी एकत्र मिसळावे, अशी देवाची इच्छा आहे व त्यांनी एकच हेतु व एकच निवड करावी मग ख्रिस्तांतील एकीकरण उदाहरणादाखल होईल.CChMara 131.1

    या देशाला मला येण्यास भीति वाटत होती. कारण पुष्कळजण असें म्हणताना मी एकिले कीं, युरोपातील वेगवेगळे लोक विचित्र असून त्यांना वेगवेगळ्या रीतीने भेटले पाहिजे. देवाचा समंजसपणा ज्यांना हवा आहे व त्याची जे मागणी करतील त्यांना तो मिळेल. लोकांना सत्य मिळेल अशा ठिकाणी देव त्यांना आणील. देवाला आमचे अंत:करण ताब्यात घेऊन चिखलाप्रमाणे त्याला आकार देऊ द्या. मग हा भेद राहणार नाहीं. येशूकडे पाहा, भावांनो त्याची रीत व वृत्ति धारण करा आणि या वेगवेगळ्या लोकात काम करणे कठीण होणार नाही. CChMara 131.2

    आम्हांला सहा मार्गांनी जावयाचें नाहीं किंवा पांचहि नव्हें. आम्हांला एकच मार्ग आहे, आणि तो ख्रिस्त होय. जर इटलींतील भाऊ जर्मनी व फ्रान्स देशांतील भावांसारखे होण्याचा प्रयत्न करतील तर तें आपले पाय सत्याच्या पायावर रोवतील. एकामध्ये जो आत्मा बसतो तोच इतरांमध्ये बसेल आणि गौरवाची आशा असा जो खिस्त त्यामध्ये आढळेल. म्हणून भावानों आणि बहिणींनो, मी तुम्हांला इशारा देतों कीं. वेगवेगळ्या देशांतील लोकामध्ये भेदाची भित बांधू नका. उलटपक्षी जेथे कोठे ती निर्माण होईल तेथें ती पाडून टाका. ख्रिस्तामध्ये जी एकी आहे ती करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे व आपल्या सोबत्याचा करण्याचा जो हेतु त्याकरता झटले पाहिजे.CChMara 131.3

    माझ्या पाळक भावांनो, देवाची थोर आश्वासने तुम्हांला समजतात काय? तुम्ही स्वत:ला बाजूला ठेऊन ख्रिस्ताला पुढे करता काय? देव तुमच्याद्वारे कार्य करण्याअगोदर तुमचा स्वार्थ भरून गेला पाहिजे. मला जेव्हां स्वार्थ इकडे तिकडे दिसतो तेव्हां धोका वाटतो नासरेथकर यांच्या नावाने मी आपल्याला सांगते कीं, तुमच्या इच्छा मारल्या पाहिजेत व त्या देवाच्या इच्छेप्रमाणे झाल्या पाहिजेत. तुम्हांला गाळून प्रत्येक भ्रष्टतेपासून शुद्ध करायला पाहिजे. देवाच्या सामर्थ्याने युक्त होण्याअगोदर तुम्हांला मोठे कार्य करावयाचे आहे. देवाच्या महान् आशीर्वादाची जाणीव ही सभा बंद होण्याअगोदर तुम्हांला व्हावी म्हणून देवाच्याजवळ जाण्यासाठी मी तुम्हांला विनवितें.CChMara 131.4