Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  साक्ष

  आम्ही ख्रिस्ताचे साक्षीदार आहोत. आम्हाला जगाच्या योजनेमध्ये भाग घेण्यास परवानगी नाही कारण ही आपली वेळ आहे. - टस्ट्टिमोनिज फॉर द चर्च ९:५३,५४.ChSMar 23.2

  “परमेश्वराचे असे म्हणणे आहे की, तुम्ही मला ओळखावे, मजवर भाव ठेवावा व मी तोच आहे. माझ्यापूर्वी कोणी देव नव्हता व माझ्यानंतरही कोणी होणे नाही. हे तुम्हाला समजावे म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात. तू माझा निवडलेला सेवक आहेस. मीच परमेश्वर आहे. माझ्याशिवाय कोणी त्राता नाही. मीच तारण विदित केले, प्राप्त करुन दिले व समजाविले. तुमच्यामध्ये कोणी अन्य देव नव्हता, म्हणून तुम्ही माझे साक्षी आहा व मीच देव आहे असे परमेश्वर म्हणतो.” मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलविले आहे. मी तुझा हात धरिला आहे, तुला राखिले आहे, तू लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी करीन, अंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदी शाळेतून बंदिवानास व अंधारात बसलेल्यास कारागृहातून बाहेर काढावे म्हणून मी असे करीन.” - अॅक्टस ऑफ अपोस्टल १०.ChSMar 23.3

  जगातील लोक चुकीच्या देवांची उपासना करतात. तेव्हा त्यांनी या खोट्या देवापासून वळावे. ते त्यांच्या भीतिदायक व धाक दाखविणाऱ्या इतर मूर्ति देवांचे ऐकून वळू नये, परंतु काही योग्य मार्ग दिवडावा. देवाचा चांगुलपणा समजून घ्यावा. “तुम्ही माझी साक्ष आहात.” असे देव म्हणतो, कारण मी देव आहे. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन २९९.ChSMar 24.1

  जे कोणी सर्व देवाच्या नगरीमध्ये प्रवेश करु पाहतात त्या सर्वांनी पृथ्वीवर त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा समावेश असावा देवाचा संदेष्टा म्हणून त्यांची नेमणूक करणे. ते त्याची साक्ष होतील दुष्ट शक्तिविरुद्ध ते साक्ष देतील आणि देवाच्या चांगुलपणाची साक्ष देतील. जे दुष्ट शक्तिंचा वापर कयन इतरांचा नाश करतील त्यांना देवाच्या लोकऱ्याच्या प्रीति विषयी सांगतील. तो कोकरा पाप्यांचे पाप हरण करतो व त्यांच्या पापांची क्षमा करतो. तोच जगाचे पाप हरण करतो. टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:२३.ChSMar 24.2

  ख्रिस्ताविषयी साक्ष देण्यास त्याच्या विषयी काढलेले उद्गार काळाच्या अखरेपर्यंत पिढ्यान पिढ्या प्रतिध्वनीत होत राहतील. त्याच्या विषयी शिष्यांनी जे श्रवण केले व पाहिले ते जगाला घोषित करण्यासाठी त्यांना ख्रिस्ताचे साक्षीदार म्हणून बाहेर पडायचे होते. मानव प्राण्याला पाचारण केलेले त्याचे काम अत्युतम होते. ते ख्रिस्ताच्या खालोखाल होते. मानवाच्या तारणासाठी त्यांना परमेश्वराबरोबर सहभागी व्हायचे होते. - द अॅक्टस ऑफ अपोस्टल १९. ChSMar 24.3

  पवित्र शिक्षक म्हणतो, माझा आत्मा एकटा कार्य करण्यास, शिकविण्यास आणि पाप्यांचे परिवर्तन करण्यास सक्षम आहे. मनावर जो परिणाम होतो तो केवळ तात्पुरताच व वरवर होतो. मी त्यांच्यावर सत्याचे बीज पेरुन त्यांना साक्षीदार बनवितो. मानवाचा पैसा व त्याची चतुराई वापरुन जगभर माझी साक्ष देतील. टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:१५९..ChSMar 24.4

  त्याच्या खरेपणाविषयी आमची साक्ष ही जगाला ख्रिस्त प्रगट करण्याचे देवाने निवडलेले एक माध्यम आहे. प्राचीन काळातील सद्भक्ताद्वारे आपल्याला कळविलेल्या कृपेचा आपण स्वीकार केला पाहिजे. तथापित आपल्या स्वानुभवाची साक्षच अधिक प्रभावी होतील. जेव्हा आपण देव प्रेरित कार्य करतो तेव्हा आपण त्याचे साक्षीदान बनतो. व्यक्ति तितक्या प्रकृति म्हणून प्रत्येकाचे अनुभवही निराळे. आपापल्या व्यक्तिमत्वाचा ठसा असलेली व्यक्तिची भक्ति देवाकडे जावी अशी तो अपेक्षा बाळगतो आणि जेव्हा त्याच्या कृपेच्या मोठेपणाच्या गौरवाचा सिव्कार ख्रिस्त स्तवन जीवनावर आधारला आहे. तेव्हा मानवाच्या तारणासाठी प्रबिंध न करता येणारी शक्ति कार्य करते. - युगानुयुगाची आशा - ३४७.ChSMar 25.1

  देव त्याच्या ज्ञानाचे, इच्छेचे आणि त्याच्या चमत्काराचे व दयेचे प्रदर्शन करीत नाही. कारण त्याचे विश्वासू जगभर अविश्वासणाऱ्या लोकांमध्ये त्याची साक्ष देण्यासाठी पसरले आहेत.ChSMar 25.2

  जगाच्या तारणासाठी असणारी येशूची योजनाही त्याचे लोकांनी जगामध्ये पसरविणे हे त्यांचे कार्य आहे. ते त्याचे मिशनरी आहेत. त्याचा प्रकाश घेऊन ते जातात. जगीक लोकांसाठी हा एक त्यांना पुरावा असेल. सर्व लोकांनी सुवार्ता प्रसाराची पत्रके वाचावित अशी देवाची इच्छा आहे. म्हणजे कोणी म्हणू नये की परमेश्वराची कृपा आम्हांला कळालीच नाही. त्याच्या येण्याविषयीही काहीच समजले नाही असेही ते म्हणून शकणार नाहीत. देवाच्या प्रीतिचे हे कार्य व्यर्थ जाणार नाही. देवाचा न्याय जगावर येण्यासाठी लोकांना इशारा देऊन त्यांनी तयारी करावी. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च २:६३१-६३२.ChSMar 25.3

  जसजसे त्यांनी त्याच्या शुद्ध आणि पवित्र जीवनावर चिंतन आणि मनन केले तसतसे त्यांना वाटले की ख्रिस्ताच्या शील स्वभावाच्या सौंदर्याची लावण्याची त्यांना त्यांच्या जीवनाद्वारे साक्ष देता आली तर कोठले ही कष्ट फार कठीण वाटणार नाही. कोठलाही स्वार्थ त्याग त्यांना जास्त वाटणार नाही. साडेतीन वर्षे पुन्हा जगण्याचा प्रसंग मिळाला तर त्यांच्या करवी कितीतरी वेगळ्या राहतील असे त्यांना वाटले. जर ते पुन्हा त्यांच्या प्रभूला पाहू शकतील तर त्याच्यावर ते किती अतिव प्रेम करतात. हे दाखविण्याचा ते मनापासून प्रयत्न करतील आणि अश्रद्धेची एखादी उक्ती किंवा कृति यांनी त्याला अति तीव्र दुःख दिल्याबद्दल किती वाईट वाटले हेही दाखवितील, परंतु त्यांना क्षमा करण्यात आली आहे ह्या विचाराने त्याने त्यांना समाधान वाटत होते. जगाच्या समोर धैर्याने प्रगट करण्याद्वारे शक्य तो त्यांच्या श्रद्धेच्या अपकृत्याची ते भरपाई ते करतील असा त्यांनी निर्धार केला. अॅक्टस ऑफ अमोस्टल ३६. ChSMar 25.4

  भूते काढलेले दोन भूतग्रस्त हे देकापलास प्रदेशात सुवार्ता गाजविण्यासाठी ख्रिस्ताने पाठविलेले पहिले मिशनरी होते. ख्रिस्ताचा शब्द ऐकण्याची त्यांना काही क्षणाचीही संधी मिळाली होती. पण असा ख्रिस्ताचा एकही संदेश त्यांना ऐकण्यास कधीच मिळाला नव्हता. सदोदित ख्रिस्ताबरोबर असलेले शिष्य ज्या प्रकारे लोकांना शिक्षण देऊ शकत होते तसे ते देऊ शकत नव्हते तथापि हाच मशीहा होता असे पटवून देणारा पुरावा त्यांनी त्याच्या जीवनात अनुभवलेला होता. त्यांना जे माहीत होते. त्यांनी स्वत: जे पाहिले व ऐकले होते आणि ख्रिस्ताच्या सामर्थ्याविषयी त्यांना काय वाटत होते तेच ते सांगू शकत होते. ज्यांच्या हृदयाला देवाच्या दयेचा स्पर्श झाला आहे ते सर्वजण अगदी तसेच करु शकतात. येशूचा प्रिय शिष्य योहान यानेही लिहिले की जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळिले आहे, स्वहस्ते चाचपिले त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. ते जीवन प्रगट झाले ते आम्ही पाहिजे आहे व त्याची साक्ष देतो, ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हांस प्रगट झाले. तुम्हासही कळवितो जे आम्ही पहिले व ऐकले आहे ते तुम्हासही कळवितो की तुमचीही आम्हाबरोबर भागी व्हावी, आपली भागी तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याजबरोबर आहे. १ योहान १:१-३ ख्रिस्ताचे साक्षदार या नात्याने आपल्याला काय माहिती आहे, आपण स्वत: काय पाहिले. काय ऐकले व कशाची प्रचिती घेतली आहे हेच आपल्याला सांगायचे आहे. आपण जर येशूचे पायरी पायरीने अनुकरण करीत असू तर त्याने आपल्याला ज्या मार्गाने जाण्यास मार्गदर्शन केले त्या मार्गाविषयी मुद्देसूदपणे सांगण्यास आपणा जवळ काहीतरी असेल. आम्ही त्याच्या अभिवचनाचा कसा अनुभव घेतला याविषयी आपण सांगू शकू.ChSMar 26.1

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents