Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  अध्याय १३ : प्रकाशनपानाची मिनिस्ट्री

  कायाचे पहिले महत्त्व

  जर एखादे कार्य दुसऱ्यापेक्षा महत्त्वाचे असेल तर ते प्रकाशन छापण्याआधी लोकांकडे जाऊन त्यांना बायबल मधून शोधून पाहण्यास सांगणे. मिशनरी कार्य हे आपली प्रकाशने लोकांकडे किंवा कुटूंबाकडे जाऊन ओळख करुन देणे. त्यांच्याशी बोलून प्रार्थना करणे हेच चांगले कार्य आहे. - द कॉल्पोरेटर इव्हॉन्जिलिज ८०.ChSMar 179.1

  प्रत्येक सेव्हंथ डे अॅडव्हेंटिस्ट सभासदाने स्वत:ला विचारावे कि “तिसऱ्या देवदूतांचा संदेशाचा प्रचार करण्यासाठी मी काय करावे ?’ ख्रिस्त या जगामध्ये हा संदेश घेऊन त्याच्या सेवकांकरवी मंडळ्यांना देण्यासाठी आला. हा संदेश सर्व राष्ट्र, भाषा, जाती, लोक, गरीब, श्रीमंत अशा सर्वांना देण्यासाठी आहे. हा संदेश आपण कसा द्यावा ? आपल्या प्रकाशनाचे वितरण करुन या करवी आपल्या संदेशाचे प्रसारण करु शकतो. सर्व विश्वासूंनी प्रकाशने, पत्रक, पुस्तिका आणि पुस्तकांचे सर्वत्र वितरण करावे. त्यामध्ये सध्य काळातील संदेशे असावेत. पुस्तक विक्रेते सर्वत्र जाऊ शकतात आणि प्रकाशनांचे वाटप करु शकतात. - द सदर्न वॉचमन ५ जानेवारी १९०४.ChSMar 179.2

  देवाच्या दृष्टीने कागद आणि पुस्तके यामध्ये या काळासाठी देवाचे संदेश आहेत. ते लोकांसमोर मांडायचे आहेत. आत्मज्ञान व सत्याची पुष्टी आणि आत्म्याचे सत्य लोकांना देऊन देवाच्या महान कार्याची सांगता देवाच्या कामगारांनी करणे आवश्यक आहे. ......... हे कार्य गुप्तपणे लोकांच्या घरामध्ये पत्रके, पुस्तिकाच्या रुपाने लोकांकडे पोहोचविण्यासाठी देवाचे कामगार व प्रकाशनाचे कार्यकर्ते करतील. या करवी देवाचे वचन व त्याचे विश्लेषण प्रत्येक घरामध्ये पोहोचेल. अशाप्रकारे देवाच्या वचनाचे प्रकाशन सूवार्ता प्रकाशनाचा प्रचार हा जे कोणी वाचतील व ऐकतील ते देवदूतां सारखेच हे प्रकाशन त्यांच्या मनामध्ये कार्य करतील व सुवार्तिचे कार्य होईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:३१५, ३१६.ChSMar 179.3

  घरोघर जाणाऱ्या लोकांचे कार्य कदाचित हळू किंवा सूस्त असेल परंतु प्रकाशनाचे कार्य देवाचे सत्य वचने घराघरामध्ये जाऊन आपले कार्य करावे म्हणजे प्रकाशनाकरवी लोकांमध्ये देवाच्या सत्य वचनाचा प्रकाश पसरेल. आमच्या परिषदेचे अध्यक्ष याचे या कार्यासाठी त्यांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. - द सदर्न वॉचमन २५ एप्रिल १९०५.ChSMar 179.4

  सुवार्ता कार्याकरवी जगाने सत्याचा प्रकाश मिळवायचा आहे. आमची प्रकाशने आणि नियतकालिकेमधून आपण वाचू शकता की जगाचा शेवट किती जवळ आला आहे. - द कॉल्पोरेटर इव्हॅन्जीलिस्ट १००.ChSMar 180.1

  देवाने त्याच्या लोकांना पाचारण केले आहे ते अशासाठी की त्यांनी आळीश न राहता उत्साही असावे. सूस्त आणि उदास राहू नये तर नेहमी उत्साही व आशीवादी राहावे. आपण आपली प्रकाशने लोकांकडे घेऊन जावे आणि त्यांना विनंती करावी त्यामध्ये जे लिहिले आहे त्याचा स्वीकार करावा. - द सदर्न वॉचमन, २५ एप्रिल १९०५.ChSMar 180.2

  आमची प्रकाशने आता सुवार्ता प्रसाराची पेरणी करीत आहेत आणि वचनात सांगितल्याप्रमाणे अनेक आत्मे ख्रिस्ताकडे घेऊन येत आहेत. सर्व मंडळ्या जाग्या होऊन त्यांच्या वितरणामुळे जागृती होत आहे. या कार्यामध्ये ख्रिस्ताचा प्रत्येक शिष्यसहभागी होऊ शकतो. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड १० जून १८८०.ChSMar 180.3

  स्वर्गातील संदेष्टा आमच्यामध्ये उभा राहिला आणि त्याने वचनातील इशाऱ्याची ओळख करुन दिली. त्याने आम्हाला स्पष्ट समजाऊन दिले की राज्याची सुवार्ता सध्याच्या जगासाठी असून छापला गेला आहे आणि आणखी छपाईच्या मार्गावर आहे जे अजून अंधारामध्ये आहेत त्यांच्यासाठी अजून द्यायचा आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:६७.ChSMar 180.4

  पुस्तकांचे कार्य लवकरच सध्याचापवित्र प्रकाश जो सत्य आहे जगाला द्यायचा आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:६९.ChSMar 180.5

  सैतान त्याच्या कार्यामध्ये उत्साही आहे. प्रकाशन साहित्य नष्ट करुन तो तरुणांच्या मनामध्ये दुष्टाईचे बीज पेरत आहे. त्यांच्या हृदयामधील धार्मिकता नष्ट करीत आहे. या भूमिवरुन तो या गोष्टी नष्ट करु पाहात आहे. मग का मंडळीतील सर्व सभासदांनी बाहेर जाऊन देवचे प्रकाशन साहित्य लोकांना वाटू नये ? या कार्यामध्ये त्यांनी खोल रस घ्यायला हवा. असे केले तर अनेक लोकांचा त्यावर विश्वास बसून ते देवाकडे वळतील. त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांना सत्य सांगावे. हे प्रकाशन साहित्य त्यांच्यामध्ये सत्याचा प्रकाश निर्माण करतील. आणि त्यांच्या आत्म्यामध्ये बदल घडून येईल. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड १० जून १८८०.ChSMar 180.6

  आम्ही सर्वजण पवित्र वचनाचे साहित्याचे वितरण करुन लोकांची मने देवाकडे वळविण्याच्या बाबतीत झोपी गेलो आहोत. यामुळे देवाचे कार्य संपुष्टात येऊ शकत नाही. तर चला आता आपले चातुर्य वापरुन आपली सर्व साहित्य पुस्तके व नियतकालिके लोकांमध्ये वितरीत करुन त्यांना जागृत करावे. देवाचे वचनाचा प्रचार देवाच्या सहाय्याने आणि चातुर्याने त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे. ....... बेटावर देवाने योहानाला जे प्रकटीकरण दिले आहे ते लोकांना देण्याचे कार्य करावे. - द काल्पोरेटर इव्हॅन्जिलिस्ट १०१.ChSMar 181.1

  मंडळीच्या सभासदांनी या महत्त्वाच्या कार्यासाठी जागृत व्हावे ते अशासाठी की स्वत:ला समर्पित करुन देवाचे हे साहित्य त्याचे सत्य वचनाचे वितरण अंधारात असणाऱ्यांना करावे. पुस्तके, पत्रिका, नियतकालिके व इतर साहित्यांचे वितरण करावे. आतावेळ खर्च करणे उपयोगी नाही. अनेकांनी आता स्व इच्छेने या साहित्य वितरण आणि कॅनवॉसच्या कार्यामध्ये स्वत:ला वाहून घ्यावे. अगदी नि:स्वार्थपणे. हे कार्य अति आवश्यक आहे. जेव्हा मंडळीने तिला नेमून दिलेले कार्य हाती घेतले तर ती पुढे पुढे जाईल. “चंद्रासारखा विश्वास सूर्यासारखा स्पष्ट आणि अति जबरदस्त लष्करी झेंडा.’ — द सर्दन वॉचमन २० नोव्हेंबर १९०२.ChSMar 181.2

  सत्याचाप्रकाश आपली किरणे मिशनऱ्यांच्या कष्टामुळे जगावर प्रकाशित आहेत. छापखाना या माध्यमाने ही प्रकाश किरणे सुवार्ता प्रसारकाच्या कष्टातून अनेकांकडे सत्य पोहोचले आहे. नाहीतर ते पोहोचणे अशक्य होते. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:३८८.ChSMar 181.3

  त्रासाची रात्र जवळ जवळ संपली आहे. सैतान हा आपला मालकी हक्क दाखवू पाहात आहे. कारण त्याला ठाऊक आहे की त्याची वेळ खूप कमी आहे. त्याला मिळणारी शिक्षा ही जगामध्ये आहे आणि ज्यांना सत्य ठाऊक आहेत परंतु त्यांनी लपून ठेवली आहेत. शेवटी त्यांनाच खडकामध्ये लपावे लागेल. परंतु देवाचे गौरव लपणार नाही. देवाचे सत्य गोंधळात टाकणारे नाही, तर प्रकाशित व स्पष्ट आहे. याचे निवेदन स्पष्ट असावे. देवाचे सत्य पत्रके, पुस्तिका व पुस्तकांमध्ये लिहिण्यात यावे. याचे वितरण शरदऋतुतील पानांप्रमाणे विखरायला हवी. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:२३१. जे पुस्तक विक्रेते आहेत त्यांनी हे सत्य संदेश आपणा बरोबर घेऊन जावे. लोकांमध्ये त्याचे वितरण करावे. जे सत्याचा संदेश घेऊन जाणारे आहेत. त्यांना अंधारात असणाऱ्या आत्म्यांची आस्था असावी. जे प्रकाशाच्या शोधात आहेत त्यांच्याशी सत्याविषयी त्यांनी सांगावे. काही म्हणतील, “मी भाषणकार नाही, मी लोकांसमोर भाषण करु शकत नाही.” तुम्ही भाषणकार किंवा पाळक नसणार तरीही सुवार्ता प्रसारक असू शकता. ज्यांच्या संपर्कामध्ये तुम्ही येता त्यांना सत्याविषयी नक्कीच सांगू शकता. तुम्ही देवाचा सहाय्यक ........... होऊ शकता. त्याच्या शिष्यासारखे कार्य करु शकता. ते तुम्हाला भेटता त्यांना विचारु शकता की खरेच ते देवावर प्रेम करु शकता का ? - सदर्न वॉचमन २० नोव्हेंबर १९०२.ChSMar 181.4

  सेव्हंथ डे अँडव्हेंटिस्ट म्हणून देवाने विशिष्ट मंडळी देवाने निवडली आहे. जगापासून वेगळे असणारे हे लोक त्यांच्याजवळ देवाचे सत्य त्याच्याशी निगडीत आहेत. देवाने त्यांना आपले प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे. देवाचे ते राजदूत आहेत. कारण स्वर्गासाठी लोकांच्या तारणाचा हा शेवटचा काळ आहे. देवाने एक महान व धनवान सत्य मर्त्य मानवाला दिले आहे. देवाने मानवाला जग दिले आणि त्याने आपले कार्य पूर्ण करण्यासाठी प्रकाशन संस्था दिल्या आहेत. या प्रकाशन संस्था अति परिणामक एके शेवटचे कार्य पूर्ण करतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:१३८.ChSMar 182.1

  आपल्या प्रकाशन संस्था या देवाच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाल्या आहेत. त्याच्या देखरेखी खाली या संस्था चालतात. या प्रकाशनाची स्थापना ही अशासाठी झाली की दुसरा एक देवदूत आकाशातून खाली आला त्याच्याजवळ महान सामर्थ्य व त्यामुळे सर्व पृथ्वी प्रकाशित झाली. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:१४०.ChSMar 182.2

  आमच्या प्रकाशन संस्थांना मी सूचना देतो की, “तुमचा दर्जा उंचवा तोंडच धरा. तिसऱ्या देवदूताचा संदेश गाजवा म्हणजे सर्व जग तो ऐकतील म्हणजे त्यांना दिसू द्या की देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्वासाला धरुन राहणारे पवित्रजन ह्यांचे धीर धरण्याचे अगत्य ह्यातच आहे.” प्रकटीकरण १४:१२. आपले साहित्य साक्षीदार म्हणून संदेश देऊ द्यावा. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:६१.ChSMar 182.3

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents