Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  प्रकाशन प्रसारण

  यावेळी तुम्ही जे सत्यावर विश्वास ठेवता. जागे व्हा. हे तुमचे कर्तव्य आहे ते म्हणजे शक्य असेल तर हे सत्य ज्याना ठाऊक नाही त्यांना सादर करा आणि त्यांना इतरांना सांगायला लावा. प्रकाशनाची छपाई करणे हा पैशाचा भाग आहे. हो पैसा प्रकाशनाची विक्री करुनच येऊ शकतो. त्याचा वापर केवळ अधिक प्रकाशनाचे उत्पादन करण्यासाठीच वापरावा म्हणजे सत्य वचनांचा प्रचार जास्त प्रमाणात होऊ शकेल. हे साहित्य अंधांचे डोळे उघडतील. त्यांची हृदये विश्वासाने भरुन जातील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:६२. ChSMar 183.1

  काही वर्षापूर्वी देवाने मला मार्गदर्शन केले की अमेरिकेतील अनेक ठिकाणी इमारती बांधण्यात तसेच युरोप आणि इतर देशामध्येही या इमारतींचे बांधकाम व्हावे. सध्य काळातील सत्याचा प्रसार होण्यासाठी प्रकाशन संस्था स्थापन करण्याच्या हेतूने अशा इमारती बांधण्यात असे मार्गदर्शन मला देण्यात आले. हे साहित्य सध्य युगाचा प्रकाश घेऊन सर्वत्र जाईल. देवाने सूचना दिली की जे साहित्य प्रेसमध्ये छापले जाते ज्यामध्ये देवाचे सत्य वचन आहे ते सर्वत्र प्रसारीत होणे अति आवश्यक आहे. छापखान्या मधून निमंत्रण आणि इशाराचे संदेश जगभर पोहोचणे आवश्यक आहे. आपली पुस्तके, पत्रिका, मासिके आणि इतर साहित्य या सर्वांमधून सत्याच्या प्रकाशाची किरणे सवृत्र प्रसरण पावतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ८:८७.ChSMar 183.2

  मला दाखविण्यात आले की आमची प्रकाशने प्रत्येक भाषेमध्ये छापली जावीत आणि प्रत्येक प्रदेशामध्ये पाठविली जावीत. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक गाव आणि खेड्यामध्येही देवाचे सत्य वचन पोहोचणे आवश्यक आहे. आत्म्यांच्या मोलापेक्षा पैशांची किंमत ती काय असणार ? हे कार्य देचाचे आहे आपले नाही म्हणून त्याचे हे अनमोल वचन काळजीपूर्वक सर्वत्र पसरविणे ते वाया घालवू नये प्रत्येक गाव खेडे व शहरांमधून याचे वितरण होणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक स्त्री पुरुषाचे तारण होणे आवश्यक आहे. - लाईफ स्केचेस् २१४.ChSMar 183.3

  सत्याचे छापलेले वचन सर्व भाषांमधून भाषांतर होणे आवश्यक आहे. आणि पृथ्वीच्या टोकापर्यंत त्याचे वितरण व्हावे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:२६. ChSMar 183.4

  काही प्रकाशने अशी आहेत की त्यांचे भाषांतर होणे आवश्यक आहेत. ख्रिस्ताने अभिवचन दिले हाते की प्रत्येक वंश, भाषा, राष्ट्र आणि राष्ट्र सर्वांना त्याच्या येण्याचा इशारा जाईल आणि ख्रिस्ताच्या प्रत्येक कामगाराने ही जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. तरच हे कार्य यशस्वी होईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:३४.ChSMar 183.5

  आपले प्रकाशन सर्वत्र पोहोचणे आवश्यक आहे. प्रत्येक व सर्व भाषांमधून त्याचे वितरण झाले पाहिजे. तिसऱ्या देवदूताचा संदेश हा या माध्यमामधून सर्वत्र पसरविणे अति आवश्यक आहे. यावेळी जे कोणी या सत्यावर विश्वास ठेवतात त्यांनी जागृत व्हावे. - द कॉल्पोरेटर १०१.ChSMar 184.1

  देवाचे अनेक लोकांनी बाहेर जाऊन तिसऱ्या देवदूताचा संदेश व त्या विषयीची प्रकाशने घेऊन जेथे संदेश पोहोचला नाही त्या सर्व ठिकाणी जाऊन संदेश द्यावेत. वेगवेगळ्या भाषेमध्ये आपल्या पुस्तकांचे वितरण करणे आवश्यक आहे. कारण त्यामध्ये सार्वकालिक सुवार्ता आहे. देवाचे विश्वासू आणि नम्र लोकांनी हे साहित्य घेऊन लोकांकडे जाऊन त्यांनाप्रकाशात आणण्याचा प्रयत्न करावेत. सुवार्ता प्रसारक, पुस्तक विक्रेते आणि संदेशवाहक या सर्वांनी लोकांकडे जाऊन संदेश दिल्याशिवाय त्यांना प्रकाश दिसणार नाही. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:३३,३४. ChSMar 184.2

  शहरांकडून शहरांकडे, राष्ट्रांपासून राष्ट्रांकडे व खेडोपाडी देवाची प्रकाशन साहित्य घेऊन जावे कारण त्यामध्ये लवकर येणाऱ्या तारणाऱ्याचे अभिवचन आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:३४. ChSMar 184.3

  मला दाखविण्यात आले की इतरप्रकाशन कार्ये अगोदरच इतर देशांमध्ये अंधश्रध्देचे बीज पेरले जात आहेत त्याला डवर म्हणून आपले प्रकाशनसुद्धा सत्य वचन पसरवित आहेत. मला हे सुद्धा दाखविण्यात आले की स्त्री आणि पुरुष सध्याचे सत्य जे आहे त्याचा अभ्यास मन लावून करीत आहेत. ही सत्य ते पुराव्यासहित वाचतात आणि त्यांना ती नवीन आणि आश्चर्यकारक आहेत. ते आपले बायबल उघडून त्यामधील वचने वाचून समाधान करुन घेतात. त्यांच्या अंधारातून ते विश्वासाने बाहेर येतात. कारण ही सत्ये त्यांना पटतात. ज्यास त्याचा विषया त्यांच्यासाठी अंधारात असतो तो विषय त्यांच्यासमोर स्पष्ट होतो. विशेष करुन चौथ्या आज्ञेचा शब्बाथाचा प्रकाश त्यांच्यावर पडून सत्य त्यांना दिसून येते. त्यांच्या बुद्धीला देवदूत चालना देतात. आणि बायबल करवी त्यांच्या डोळ्यावरील अंधार दूर करतात आणि मनाला सत्य दिसून येते. जे प्रकाशन ते त्या साहित्यांची त्यांना सत्य समजून येण्यास मदत होते. मी पाहिले त्यांच्या हातामध्ये पुस्तिका आणि पत्रिका व दुसऱ्या हातामध्ये बायबल अश्रृंनी त्यांचे गाल भिजलेले दिसत होते आणि देवासमोर गुडघे टेकून नम्रपणे प्रार्थना करीत होते. सर्व सत्यामध्ये त्यांना मार्गदर्शन केल्याचे देवाला आभार मानीत होते. ते त्याला बोलविण्या अगोदरच तो त्यांचे काम करीत होता आणि जेव्हा सत्य त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचले व त्यांनी पाहिले की सत्याची साखळी एकमेकांना गुंतली आहे. यावेळी त्यांच्यासाठी बायबल एक नवे पुस्तक वाटू लागले. एका मोठ्या आनंदाने त्यांनी बायबल आपल्या हृदयाशी धरले. त्यांचे नैतिक पाठबळ उत्तेजित झाले होते. त्यांचा पवित्र आनंद त्यांच्या चेहऱ्यावर चमकत होता. हा आनंद केवळ त्यांचे स्वत:चेच समाधान करीत नव्हता. तर ते इतरांसाठीही कार्य करु लागले. काहींनी तर सत्यासाठी मोठे समर्पण केले. जे अंधारामध्ये होते त्या बंधूपर्यंत हे सत्य घेऊन त्यांनाही देऊ केले. त्यांनी सत्याची ही वेगवेगळ्या भाषेतील पत्रके, पुस्तके सर्वत्र देण्याचे प्रयत्न केले. - लाईफ स्केचेस २१४, २१५.ChSMar 184.4

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents