Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First

  आठवण ठेवणे

  लोकांशी व्यवहार करताना आम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की दुसऱ्यांच्या अनुभवाचा अध्याय असा आहे की जो नाशवंत दृष्टीपासून लपून बसला आहे. आठवणीच्या पानांवर द:खाचा इतिहास लिहीला आहे. हा इतिहास जिज्ञासू नजरेपासून लपवून ठेवला आहे. तेथे कठीण अवस्थेमध्ये दीर्घकाळ आणि अवघड व कठीण संघर्षामध्ये आहोत व कदाचित कौटुंबिक समस्यामध्ये जगत आहोत. रोज येणारे गंभीर प्रसंग यामुळे रोजचे साहस, विश्वास या गोष्टी कमजोर होतात. या गोष्टी दिर्घकाळ राहिल्यास विश्वास व साहस डळमळतो. जे लोक विषमतेमध्ये जीवनाशी लढत असतात. अशा परिस्थितीमध्ये प्रेमभावानेची साथ मिळाली तर शक्ति व साहस प्राप्त होऊ शकते. त्यांच्यासाठी एक खऱ्या मित्राची साथ मिळाल्यास तर त्यांच्या हाताची पक्कडही बहुमोल सोने व चांदीपेक्षाही अधिक मौल्यवान ठरते. दयापूर्ण शब्दाने स्वर्गातील देवदूतांच्या हास्याप्रमाणे स्वागत केले जाते.ChSMar 222.2

  गरीबांच्या फार मोठ्या संख्येमुळे जीवनावश्यक गोष्टींची पुर्तता करणे हे अति कठीण झाले आहे. यामुळे थोडासा रोजगार मिळणे सुद्धा कठीण झाले आहे. गरीब लोकांच्या थोडयाशा गरजा भागविणे सुद्धा कठीण झाले आहे. सर्व गरीब लोकांना कठोर परिश्रम केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कठीण व कठोर कार्य करुन सुद्धा अनेक जीवनावश्यक गोष्टींना वंचित राहावे लागत आहे. योग्य आशा नसल्यामुळेही सर्व जीवनावश्यक गोष्टींची पूर्तता व त्याचे ओझे अधिकच असहाय्यक झाले आहे. चिंताग्रस्त आणि त्रासलेल्या लोकांना समजत नाही की कोठे जायचे व कोणाला सहाय्य मागायचे. त्यांच्या या कसोटीमध्ये, निराशामध्ये सहानुभूति दाखवा त्यांना धीर द्या. त्यांच्या सहाय्यासाठी आणखीन एक दरवाजा उघडा केला जाईल. त्यांच्याबरोबर परमेश्वराच्या वचनाची आठवण ठेवा. त्यावर चर्चा करा. त्यांची हिम्मत बांधा. - द मिनिस्ट्री ऑफ हिलींग १५८.ChSMar 222.3

  अनेकांचे जीवन दुःखदायक प्रयासाचे झाले आहे. त्यांच्या उणीवा त्यांना भासतात आणि ते दु:खी कष्टी होऊन त्यांचा विश्वास ढळतो. कृतज्ञता व्यक्त करण्यासारखे त्यांच्या जीवनात काहीच नाही असे त्यांना वाटते. कष्टमय दुःखाचे जीवन जगणाऱ्यांना दयेचे शब्द, सहानुभूतिच्या भावना गुण ग्राहकतेचा अविर्भाव आणि तहानेने व्याकुळ झालेल्यांना थंड पाण्याचा प्याला जीवनपोषक ठरेल. सहानुभूतीचे शब्द, दयाळूपणाची कृती यांच्यामुळे खांद्यावरील अवजड ओझे हलके होईल. दयेचा प्रत्येक शब्द किंवा नि:स्वार्थी कृती, पतित मानवतेवरील ख्रिस्ताच्या प्रेमाचा व्यक्त केलेला भाव आहे. - थॉटस फ्रॉम द माऊंट ऑफ ब्लेसिंग २३.ChSMar 223.1

  पाप हे सर्व दुष्टतेत पापी आहे आणि आम्ही त्या पापी मनुष्यावर दया करणे व त्याला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, परंतु सर्वांना आम्ही एकाच प्रकारे मदत करु शकत नाही. पुष्कळजण असे आहेत की त्यांचा आत्मा भुकेला जरी असला तरी ते तसे दाखवित नाहीत. अशा लोकांना प्रेमळ शब्दाने व दयेने आठवण ठेऊन मदत करणे. दुसरे असे काही असे आहेत की त्यांना मदतीची गरज आहे, पण ती गरज त्यांची त्यांना भासत नाही. त्यांच्या आत्म्याची किती दुरावस्था झाली आहे ती त्यांना समजत नाही. लोक समुदाय पापात इतके खोलवर रुतले आहेत की सार्वकालिक जीवनाची आवश्यकता व खरेपणाचा त्यांना विसर पडला आहे. मानव हा परमेश्वराच्या प्रतिमेचा आहे याचा त्यांना विसर पडला आहे व त्यांना त्यांच्या आत्म्याचे तारण करावयाचे आहे किंवा नाही याचे त्यांना भान राहिले नाही. ते परमेश्वरावर विश्वास ठेवीत नाहीत. अशा लोकांना नि:स्वार्थी प्रेमानेच आपण जिंकू शकतो. प्रथमत: आपण त्यांच्या जीवनातील शारीरिक गरजांचा पुरवठा करणे. त्यांना खाऊ घालणे. त्यांना स्नान घालणे व स्वच्छता शिकविणे व नीटनेटका पोषाख करावयास शिकविणे. जेव्हा ते तुमच्या नि:स्वार्थी प्रेमाचे प्रमाण पाहतील. तेव्हा त्यांना ख्रिस्ताच्या प्रेमावर विश्वास ठेवायला सोपे जाईल.ChSMar 223.2

  पुष्कळजण असे आहेत की त्यांना त्यांची चूक दिसून येते व ते कसे वेडगळ वागतात याबाबत त्यांना लाज वाटते ते त्यांच्या जीवनातील चुका व अपराध पाहतात व अति निराश होतात. अशा लोकांचा आपण धिक्कार करु शकत नाही. जेव्हा कोणी पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करता तेव्हा प्रवाहाची शक्ति त्यांना मागे ढकळत असते. अशावेळी त्याच्या बंधने त्यांना मदतीचा हात देऊन त्यांना मदत करावी. पत्रे बुडत असताना ख्रिस्ताने जसे त्याला वाचविले तसे वाचवावे. नंतर त्याला उत्तेजनार्थाचे शब्द बोलावेत, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल व तो प्रीतिचा उत्साहिक सहाय्यक होईल. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन ३८७. ChSMar 223.3

  जो आत्मा पापामध्ये आहे, परंतु त्यामधून मुक्ति मिळून आराम मिळण्याचा मार्ग त्याला मिळत नाही. कृपाळू तारणाऱ्याचे अस्तित्वाची त्याला जाणीव नसते. त्याचा हात धरुन त्याला वर उचलतो व त्याच्याशी बोलतो. धीर व आशेचे शब्द बोलतो. अशा निराश लोकांना तारणाऱ्याचा हात धरण्यास सहाय्य करा. - मिनिस्ट्री ऑफ हिलींग १६८.ChSMar 224.1

  या जगात आपले कार्य म्हणजे इतरांसाठी जगणे. ChSMar 224.2