Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    बायबल काळातील धनवान लोक

    हा एथिओपियन हबशी षंढ प्रतिष्ठित मनुष्य असून त्याचा दबाव विस्तीर्ण होता. देवाने पाहिले की ह्याचे परिवर्तन झाले तर त्याला मिळालेला प्रकाश तो इतरांना देईल. आणि सुवार्तेच्या संदर्भात भरीव प्रभाव पाडील.ChSMar 240.2

    सत्य प्रकाशाच्या शोधार्थ असणाऱ्या या मनुष्याकडे देवाचे दूत लक्ष देत होते. आणि उद्धाराकडे त्याला आकर्षित करण्यात आले होते. पवित्र आत्म्याच्या सेवेद्वारे ज्या व्यक्तिद्वारे त्याला प्रकाशाकडे त्याला नेता येईल. त्या व्यक्तिशी देवाने त्याचा संबंध घालून दिला.ChSMar 240.3

    - अॅक्टस ऑफ अपोस्टलस १०७. ChSMar 240.4

    शिशु अवस्थेतील मंडळी नष्ट करण्याचे प्रयत्न यहूदी करीत असताना तिच्या संरक्षणार्थ निकदेम पुढे आला. कसलाही प्रश्न न विचारता त्याने शिष्यांच्या श्रद्धेला प्रोत्साहन दिले. आणि यरूशलेममधील लोकांना आधार देण्यासाठी व सुवार्ता कार्याच्या उन्नतीसाठी त्याने आपल्या धनाचा वापर केला. अगोदर ज्यांनी त्याचा सन्मान केला होता तेच आता त्याची टिंगल करून त्याचा छळ करू लागले. पुढे तो जगाच्या दृष्टीने जरी दरिद्री बनला तरी तो त्याच्या विश्वासात डगमगला नाही.ChSMar 240.5

    - अॅक्टस ऑफ अपोस्टल १०५.ChSMar 240.6