कुटुंबाचा प्रभाव दूरवर पोहोचला आहे
ख्रिस्ती धर्मामध्ये व्यवस्थित असणारे सामर्थ्यवान कुटुंब म्हणजे धार्मिक क्षेत्रामध्ये एक चर्चेचा विषय आहे. ही चर्चा अशी आहे की आब्राहामाची मुले ही कुटूंबामधूनच तयार होऊन बाहेर पडतात. ख्रिस्ती कुटुंबामध्ये ख्रिस्तीपणाचा दावा असतो कारण मुलांची तशी तयारी करण्यात येते असे कुटुंब खरेच देवाचा प्रकाश असतात.ChSMar 244.2
- पॅट्रिक्स ॲण्ड प्रॉफेटस १४४. ChSMar 244.3
कुटुंबातील सेवाकार्यामध्ये केवळ कुटुंबातील सभासदच येत नाहीत परंतु ख्रिस्ती प्रत्येक घर हे जगासाठी एक आदर्श कुटुंब म्हणून गणले जावे. जगाने या कुटुंबाचा आदर्श समोर ठेऊन त्याप्रमाणे स्वतःचे वर्तन ठेवावे. याकरवीच जग हे चांगुलपणाचे सामर्थ्य प्राप्त करू शकतो. मानवी हृदयावर एक आदर्श कुटुंबाचा जितका अधिक प्रभाव पडतो तितका मोठा प्रभाव एखाद्याच्या उपदेशानेही पडत नाही. आदर्श कुटुंबातील एखादा तरुण जर बाहेर गेला तर त्याच्या वर्तणूकीचा योग्य प्रभाव इतर तरुणांवर पडून त्यांच्यामध्येही सुधारणा घडून येते. जीवनातील उच्चसिद्धांत इतर कुटुंब आणि समाजासाठी एक प्रेरणादायी प्रभाव कार्य करतो.ChSMar 244.4
- द हीलिंग मिनिस्ट्री ३५२. ChSMar 244.5
ख्रिस्तीपणाच्या सामर्थ्याचा मोठा पुरावा जगासमोर क्रमानुसार सादर करता येतो. तो म्हणजे सुव्यवस्थित कुटुंब. आदर्श कुटुंबाचे हे एक जिवंत सत्य आहे. याला जगभर मान्यता मिळू शकते. कारण हा जिवंत पुरावा आहे. हृदयावर याची शक्ति प्रस्थापित होऊ शकते.ChSMar 244.6
- टेस्चिमोनिज फॉर द चर्च ४:३०४. ChSMar 244.7
देवाने या जगामध्ये कुटुंबाची स्थापना केली. आणि स्वर्गीय कुटुंबाचे हे प्रतीक आहे. देवाच्या योजनेनुसार ख्रिस्ती कुटुंबाची स्थापना झाली. याचे जगातील उदाहरण म्हणजे देवानेच प्रथमच जगामध्ये कुटुंबाची स्थापना केली. त्याच्या निर्मितीची ही प्रमुख योजना आहे. त्याच्या कार्याची ही प्रगती आहे.ChSMar 244.8
- टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:४३०. ChSMar 244.9
आपले विचार तोकडे असले, आपली पात्रता कमी असली, आपल्या संधी थोड्या असल्या, आपली मर्यादा कमी असली परंतु तरीही आपल्या शक्यता या पूर्ण विश्वास असून मिळणाऱ्या संधीचा पूर्णपणे फायदा होतो. आपल्या स्वतःच्या कुटुंबाची संधी प्राप्त होते. आपण आपल्या कुटुंबामध्ये मिळालेल्या संधीचा फायदा करून घेऊ शकतो. जर आपण आपली हृदये आणि घरे पवित्र तत्वांसाठी उघडतो तर आपण आपल्या जीवनातील सर्वात महत्वाचे सामर्थ्यशाली ........ उघडतो. आमच्या घरामधून आरोग्याचा झरा वाहतो, आपल्या घरामध्ये जीवन येते. फलद्रुपता येते, नापीकरणा संपतो व मृत्यू नाहीसा होतो.ChSMar 244.10
- मिनिस्ट्री ऑफ हीलिंग ३५५.ChSMar 245.1