Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  उमेद

  प्रामाणिक, आस्थेवायिक ख्रिस्ती ‘उमेद’ पाहिजे आहे. ‘उमेद’ अशी की जी काही करण्यास उद्युक्त करेल. यापुढे कोणीही जो ख्रिस्ताला धारण करतो त्याने त्याच्याविषयी कबुली देण्यास कचरु नये, स्वत:ला आवर घालू नये. त्यापेक्षा नायगारा धबधब्यातून वाहणारे पाणी थांबणे बरे. TFTC - २:२३३.ChSMar 265.7

  तो ख्रिस्ताला वैयक्तिक त्राता म्हणून ज्याने स्विकारले आहे. प्रभु कार्याला हक्क बजावण्यास आतूर असेल. स्वर्गिय पित्याने आपल्या करिता काय केले याचे चिंतन करताना त्याचे हृदय असीम आनंदाने आणि प्रेमळ कृतज्ञतेने भरुन जाते. आपली कृतज्ञता तो पूर्ण मनापासून, पूर्ण शक्तिनिशी प्रभूच्या कार्यातून प्रकट करण्यास उत्सुक असतो. ख्रिस्तावरील त्याची प्रीती व्यक्त करण्यास तो आतूर असतो कारण तो ख्रिस्ताच्या मोलाने विकत घेतलेला आहे. तो परिश्रम, दुःख, त्याग यांची अभिलाषा धरतो. - मिनीस्ट्री ऑफ हिलींग, ५०२.ChSMar 266.1

  ‘मार्था’ सारख्यांसाठी विस्तृत क्षेत्र आहे. कृतिशील कार्य करण्यास ते उत्साही असतात, परंतु मरीचेप्रमाणे त्यांना प्रभुच्या पायाशी येऊ द्यात. तत्परता, साधना व उर्जा हे ख्रिस्त कृपेमध्ये पवित्र घोषित करुद्यात ! तेव्हा जीवन अपराजीत शक्ति बनेल. - डिझायर ऑफ एजेस — ५२५.ChSMar 266.2

  परमेश्वराच्या नामामध्ये, अथक चिकाटी व दुर्दम्य उमेद जी ख्रिस्ताने आपल्या कामकऱ्यांना दिली आहे, आपण त्यांचे कार्य पुढे चालवू या. TFTC - ९:२५. ChSMar 266.3

  या पवित्र कार्यास निरसपणाला वाव नसावा. आपण कार्य तर करत आहोत, पण आपला उत्साह आणी कृतिमध्ये थोडे कमी पडत आहोत. आपण अधिक प्रामाणिकपणे कार्य केले तर आपण बहुतेकांना ‘सत्याचा’ संदेश पोहोचवू, जेणेकरुन त्यांचे समाधान होईल. प्रभुकार्यातील निरसपणा व निर्लज्जपणा जे प्रामाणिकपणा व पावित्याची उमेद, उत्साह आपल्याल पाहू इच्छितात ते आपल्यापासून दूर जातील. TFTC - ६:४१७.ChSMar 266.4

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents