Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    सहानुभूति व सामानिकता

    प्रभू कार्याच्या प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक स्त्री व पुरुषास मानवतेच्या दुःखा विषयी सहानुभूतिची गरज आहे, परंतु अशी सहानुभूति फज्ञर विरळ असते. - रिव्ह्यु ॲन्ड हेरॉल्ड - मे ६, १८९०. ChSMar 269.1

    आपल्या ख्रिस्तासम सहानुभूतिची गरज आहे. जे स्वत:ला निर्दोश दाखविण्याचा प्रयत्न करतात. त्याच्याबद्दल जशी असते तशी सहानुभूति पूरेशी नाही, तर गरीबांबद्दल तसेच दुःखित, संघर्ष करणारे जे चूकीत सापडतात, पापात अडकतात, पुन्हा पश्चात्ताप करतात, तसेच जे मोहपाशात पडतात व निराश होतात. अशांसाठी सहानुभूतिची गरज आहे. आपल्या स्वर्गीय पित्याप्रमाणे द्रवलेल्या हृदयाने आपल्या सहकाऱ्याकडे जावे. त्यांच्या अशक्ततेत त्यांना सांत्वन द्यावे. - गॉस्पल वर्कर्स १४१. ChSMar 269.2

    पामर या नात्याने, परस्परांमध्ये सहनशीलता व सामाजिकता यांचा अभाव असल्याने आपण फार काही गमावतो. जो स्वातंत्र्याच्या गप्पा मारतो आणि स्वतः स्वत:लाच कोंडून ठेवतो तो पमरेश्वराने त्याला ज्या स्थानावर असावे असे वाटते त्यासाठी तो उणा आहे. ChSMar 269.3

    आपण जी देवाची लेकर आहोत ते सुखी-आनंदी राहण्याकरिता परस्परांवर अवलंबूण आहोत. आपल्यावर परतेश्वर व मानवता यांचा हक्क आहे. आपल्या जीवनातील आपला कार्य भाग आपण पार पाडावा. आपल्या स्वभाव गुणाची ही योग्य लागवड आहे जी आपल्याला आपल्या बंधूविषयी सहानुभूति आणते जेणेकरुन इतरांना मदत करण्याच्या प्रयत्नातून आनंद प्रदान करते. तसेच त्यांनी आशीर्वादीत होण्यासाठीच्या आपल्या प्रयत्नास पुरेसे बनविते. - टेस्टिमोनिज - ४:७१, ७२.ChSMar 269.4

    पारश्यांच्या मेजवानीमध्ये आपला रक्षणकर्ता पाहुणा होता. त्याला गरीब व श्रीमंत दोघांही तर्फे निमंत्रण होते ते त्याने स्विकारले आणि त्याने त्याच्या रुढीप्रमाणे त्याची शिकवण व सत्य याचा या गोष्टीशी मिलाफ घडविला. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स २१९.ChSMar 269.5

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents