Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    नेमस्तपणा

    परमेश्वराच्या प्रत्येक लेकरान आपल्या खानापानाची शिस्त योग्य पेहराव व कार्य यासंबंधी नेमस्त राहून इतरांवर त्या द्वारे छाप पाडणे किंवा लोकांना ते भावावे, हे गरजेच आहे यासाठी की परमेश्वराचे कार्य आपल्या तर्फे अगदी अव्वल त-हेने व्हावे. जेव्हा कामकरी सोपवलेले कार्य व काळजी याने दबावात येतो आणि मन व शरीर दोहाकडून क्षमतेपेक्षा अधिक काम करवून घेतो आणि थकतो, तेव्हा त्याने थोड्या काळासाठी कामापासून स्वत:ला दूर करुन थोडी विश्रांती घ्यावी, नव्हे तर त्याने पुढील कामासाठी सज्जा व्हावे. कारण आपल्या सर्व हालचालीवर एक अतिशय दक्ष शत्रू (सैतान) लक्ष ठेवत असतो. आणि तो आपल्या अशक्तपणाचा कायदा घेण्यास टपलेला असतो. तो लगेचच वाईट प्रलोभनास आपणाला बळी पाडण्याचे मनसूबे रचतो. कामामुळे क्षीण झालेले शरीर व अतिताणाने कमकुवत झालेले मन हे सैतान ओळखतो व आपल्याला अशा मोहात पडण्यास उद्युक्त करतो जेणेकरुन देवाचे लेकर होण्याच्या आपल्या उद्दिष्टाचा हास होवू लागेल. म्हणून कामकऱ्यांनी त्यांचे सामर्थ्य शक्ति काळजीपूर्वक वापरावी आणि अशा क्षीण दशेमध्ये जी यायलाच हवी, या अवस्थेत त्याने कार्यातून तात्पुर्ती स्थगिती घेवून येशूच्या सान्निध्यात यावे. - द रिव्ह्यू अॅन्ड हेरॉल्ड, नोव्हें. ४, १८९३.ChSMar 284.4

    परमेश्वराच्या वैभवाकरिता आपणांस मिळालेली शारिरीक शक्ति, तीचा गैरवापर झाल्यास त्याच्या कार्यासाठीच्या दिलेल्या वेळेमध्ये, काळामध्ये खंड पडू शकतो आणि येथून दिलेले कार्य करण्यास आपण अपात्र ठरतो. आपणास लागलेल्या वाईट सवयी, जसे की रात्रभर जागरण करणे. पर्यायाने कमी भूक लागणे व शरीरावर दुष्परिणाम होणे जे अशक्तपणाचा पाया आहे असे ‘जागरण’ आहे. तसेच व्यायामचा अभाव, शरीर व मनाचे ‘अति काम’ ज्यामुळे मज्जा संस्था प्रभावित होतात, अशा प्रकारचे अनैसर्गिक सवयी लावून स्वत:ची क्षती पोहचवून स्वत:चे आयुष्यमान घटविणारे परमेश्वरापुढे दोषी गृहित धरले जातील. ते स्वतः परमेश्वराने मुकुर केलेला काळावधीमध्ये आपल्या घाणरेड्या सवयीने ‘डाका’ घालतात, तर आपल्या सोबत्यालाही त्या पाशता पाडतात जे कार्य करण्यास त्यांना ओडास वेळही पुरेसा ठरत होता ते सुद्धा काम त्यांनापूर्ण करता येत नाही. अशा धोकादायक सवयीमुळे जो पमरेश्वरासाठी चांगले असे कृत्य करण्यापासून स्वतः वंचित करतात. हे लोक परमेश्वराचे अपराधी आहेत. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स, ३४६, ३४७.ChSMar 285.1

    परमेश्वर कनवाळू आहे आणि त्याच्या आपल्या कडूनच्या अपेक्षांबद्दल ही ‘वाजवी’ आहे. कष्टाने आपल्या शरीराचा नाश व्हावा किंवा आपला आत्मा अतिताणाने क्षीण व्हावे, अशा प्रकारचे कार्य ह्याला अपेक्षीत नाहीच. आपण अतिश्रम करुन थकावे आणि गलितगात्र होई पर्यंत कार्य करतच रहावे, आपली मज्जासंस्था क्षीण व्हावी. अति श्रमाने, असं त्याला नको आहे. त्याने निसर्गनियम लावलेले आहेत ते आपण पाळून ते जीवन मुल्ये बनवितात त्याप्रमाणे आपला आयुष्यक्रम असावा असे त्याला हवे आहे. दिवसामागून दिवस जातात व दिवसागणिक आपल्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये आपण पार पाडत असते, परंतु उद्या जे करावयाचे आहे त्याचा विचार आपण करण्यात काही अर्थ नाही. परमेश्वराच्या सेवकांनी त्याचे कार्य किती पवित्र आहे हे ध्यानात घ्यावे. त्यांनी उद्याच्या कार्याची तयारी आपल्या शक्तिचे, उर्जेचे चतुरार्याने व्यवस्थापन करुन करावी. - द रिव्ह्यु ॲन्ड हेरॉल्ड, नोव्हें. ७, १८९३.ChSMar 285.2

    ख्रिस्ताच्या अनुयायांनी आपले कार्य करण्यात ‘सुशिभित’ असावे. परमेश्वराचा निवडलेल्या कामकऱ्यांनी ख्रिस्ताने दिलेल्या आशेने प्रतिसाद म्हणून योग काळ एकांतवासात जावून विश्रांती घ्यावी. बहुतांना ह्या आज्ञांच्या बाबतीत अनभिज्ञता असेलेल्या आपला जीव गमवावा लागला आहे. पिक बहुत आहे व कामकरी थोडे आहेत. असे असले तरीही आपलं शारिरीक व मानसिक आरोग्य धोक्यात घालून कार्य करत राहिल्याने काही सिद्ध होणार नाही. आपल्यात बहतशे दर्बल, कमजोर, कामकरी आहेत जे कार्याच्या आवाक्या संबंधी चिंतीत आहेत. म्हणजे कार्य किती अधिक आहे आणि त्यांच्या तर्फे किती कमी काम होत आहे आणि त्यांना किती अधिक कार्य करण्याची उत्सुकता आहे आणि त्यासाठी त्यांना भरपूर शारिरीक शक्तीची गरज आहे. अशाच्या संबंधी येशू ख्रिस्त म्हणतो, ‘तुम्ही स्वत:ला एकांतवासात न्या व थोडी विश्रांती घ्या. - द रिव्ह्यू अॅन्ड हेरॉल्ड, नोव्हेंबर ७, १८९३.ChSMar 286.1

    ख्रिस्ती जीवन हे अविरत कार्य करत राहण्याकरिता बनविण्यात आलेले नाही. ख्रिस्ती लोकांनी परमेश्वरापासून दूर असणाऱ्या आत्म्याचे आहे, परंतु त्याबरोबर चिंतन करणे, प्रार्थना करणे व प्रभूचे वचन अभ्यासावे व त्याला अवघी देणेही गरजेचेच आहे. त्यांनी सतत कार्य व त्या संबंधीच्या ताण व उत्साह यातच मश्गुल असू नये. त्यामुळे स्वत:ची प्रतारणा होवू शकते व मनशक्ति तसेच शारिरीक शक्ति क्षीण होते, बाधीत होते. - द रिव्ह्यू अॅन्ड हेरॉल्ड, नोव्हेंबर ७, १८९३.ChSMar 286.2

    परमेश्वराच्या कार्याचे प्रशिक्षणार्थीसाठी स्वत:च्या मनाचा मोगावा घेण्यास, निसर्गाशी एकरुप होण्यास व परमेश्वराच्या सान्निध्यात रहाण्यास एक तास एकांताचा असावा. कारण त्यातच आपल्याला समजून येईल की जीवन म्हणजे या जगाशी असणारी समरसता, त्याचे नियम व त्याचे अनुपालन हे नव्हे तर प्रभूची इच्छा जाणून घेण्यासाठीचे ज्ञान मिळविण्याचा आपला अनुभव हे आहे. आपण व्यक्तिशः आपल्या अंर्तमनाशी होत असलेला त्याच्या सुसंवादाची अनुभूति घेणे आवश्यक आहे. जेव्हा निरव शांतता असते आणि त्या शांततेत आपण प्रभुसमोर येतो आणि या शांत मनामध्ये परमेश्वराचा स्वर अगदी स्पष्ट येतो तो म्हणतो, ‘निश्चल रहा आणि जाणा की मी परमेश्वर आहे. आपणा कामकऱ्यासाठी हे उस्फुर्तदायक आहे. या धावपळीच्या धाई गोंधळात आणि धकाधकीच्या जीवन कार्यात. असे जे पुर्नरुस्ताहित झालेले आहेत ते शांती व प्रकाश याने मंडित झालेले आहेत. त्यांना ईश्वरीय देणगी दाखल शारिरीक व मानसीक उर्जा प्राप्त होते. त्यांच्या श्वासामधून सुंगध दरवळतो आणि दिव्य शक्ति प्रसारित होते जी हृदयास साद घालते. - द मिनिस्ट्री ऑफ हिलंगी - ५८.ChSMar 286.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents