Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  मूल्यांकनाचा आधार

  परमेश्वरा प्रति कार्याचे मूल्यमापन ते कार्य कोणत्या भावनेने केले आहे त्यानुसार होते. ना कि तुम्ही किती काळ श्रम केलेले आहेत त्यानुसार होते. TFTC - ९:७४.ChSMar 304.3

  तुम्हाला देण्यात आलेल्या कौशल्यामध्ये तुम्ही आणखीन किती सुधारणा केली आहे, यावर तुमच्या दैवी जीवनाच्या प्रगतीचे यश अवलंबून आहे. - द रिव्ह्यू अॅन्ड हेरॉल्ड - मार्च १, १८८७..ChSMar 304.4

  परमेश्वराला आपल्याकडून भरपूर कार्य करावयाचे आहे आणि ह्या काळामध्ये जे विश्वासाने व पूर्ण मनापासून कार्य करत आहेत ते भविष्य कालामध्ये असे कार्य करण्याचा फारसा चालवतील असे त्याने योजिले आहे. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स - ३३०.ChSMar 304.5

  जे शेवटच्या क्षणी कार्यरुपी द्राक्ष मळ्यामध्ये दाखल झालेले होते त्यांनाही कार्याची संधी मिळाली म्हणून ते आभारी होते. ज्याने त्यांना स्विकारले त्याच्या प्रती ते कृतज्ञ होते आणि दिवस सरला तेव्हा त्याने त्यांना पूर्ण दिवसाचा मेहनताना दिला तेव्हा ते स्तिमीत झाले कारण त्यांना ठावूक होते की त्यांनी दिवसभर काम केलेले नव्हते. त्यामुळे धन्याने दाखवलेल्या प्रेमळ दयेमुळे त्यांचे मन भरुन आले. ते धन्याच चांगूलपण आणि मुक्तहस्ते दिलेला मेहनाताना ते कधीच विसरु शकले नाहीत.ChSMar 304.6

  हे सर्व पाप्याविषयी आहे, ज्याला तो स्वत: लायक नाही हे ठावू नसूनही त्याने शेवटच्या क्षणी धन्याच्या द्राक्ष मळ्यात प्रवेश केला. त्याचा कार्यकाळ छोटा होता आणि प्रतिमळासाठी आपण पात्र आहोत असे त्याला वाटले नाही, तरीही परमेश्वराने त्याचा तो जसा आहे तसा त्याचा स्विकार केला आणि तो फार हर्षित झाला आता तो नम्रपणे, विश्वासाने व उपकृतपणे सेवा कार्य करतो आणि ख्रिस्ताचा सहकारी म्हणून सेवा कार्य करण्याचा विशेष अधिकार मिळाल्याबद्दल ऋणी राहतो. खरंच अशा आत्म्यांचा प्रभू सन्मान करतो. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स ३९७, ३९८.ChSMar 304.7

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents