Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  प्रतिफळा करिताचा संयम

  आपल्या मुक्तिदात्याच्या पुनरागमणास विलंब होत आहे, असे वाटत असेल किंवा दुःख, श्रम याने विमनस्क होवून आपल्यावर सोपविलेली कामगिरी केव्हा संपेल व या समरामधून सन्माननियतेने केव्हा मुक्त केले जाईल अस असंयमीत विचार श्रृंखलेत आपण असाल तर लक्षात ठेवा. अशाप्रकारची कुरबुर करणाऱ्यांना हे जाणा की परमेश्वराने आपल्याला अशा प्रकारच्या वादळास तोंड देण्याकरिता, खरे ख्रिस्ती व्यक्तिमत्व उजागर करण्यास, परमेश्वर पित्याबद्दल अधिक जाणण्यास ख्रिस्त जो आपला वडील बंधू त्याच्या सह आत्मे जिंकण्याच्या कार्यात सहकार्यास, या पृथ्वीतलावर पाचारण केलेले आहे. ख्रिस्त आपल्या करिता असे म्हणतो, “विश्वासू व भल्या सेवका, छान केलस आता परमेश्वराच्या स्वर्गिय आनंदाचा वाटेकरी होण्यास तुझे स्वागत आहे.” - द रिव्ह्यू अॅन्ड हेरॉल्ड - ऑक्टोबर २५, १८८१.ChSMar 313.1

  ख्रिस्ती सैनिका, धीर धर, थोडा अधिक धीर धर आणि जो देणारा आहे... येईल ! वाट पहाण्याची, टेहेळणीची, शोक करण्याची वेळ संपत आली आहे. प्रतिफळ प्राप्तीचा दिवस येत आहे. सार्वकालिक दिवस येत आहे. आता झोपणस अवधी नाही, छोट्या-मोठ्या गोष्टीत गुंतून पडण्यास वेळ नाही, जो आज या वेळी अळस करतो तो चांगूलपणाच्या गोष्टी करण्याच्या संधीस मुकेल. आपणास ह्या हंगामात पिक गोळा करण्याचे विशेष हक्क बहाल करण्यास आलेले आहेत आणि जिंकला गेलेला प्रत्येक आत्मा ख्रिस्त मुकुटातील हिऱ्याप्रमाणे असेल आपला मुक्तिदाता आपण सस्त्र सामग्री थोड्या कालाकरीता म्यान करत आहे. या करिता की आणखी नवी विजय प्राप्ती व्हावी आणि सार्वकालिकतेच्या आणखीन पारितोषिकाचे मानकरी व्हावे. - द रिव्ह्यू अॅन्ड हेरॉल्ड २५, १८८१.ChSMar 313.2

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents