Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  गुन्ह्यांचा फैलाव

  गुन्हेगारीच्या फैलावाच्या मध्यावर आम्ही राहात आहोत. देवाची भीती बाळगणारे लोक सर्वत्र भांबावलेल्या अवस्थेमध्ये उभे आहेत. भ्रष्टाचार इतका वाढला आहे की मानवाची लेखणीही त्याचे वर्णन करण्यास कमी पडेल. दररोज राजकारणातील उलाढाली, झगडा, लाचलुचपत आणि खोटारडेपणा दिसून येतो. ऐकायला मिळते. अत्याचार अन्याय यामुळे मनुष्य भरडला जात आहे. मानवाचे जीवन पशुतूल्य असे झाले आहे. त्याचा नाश होत आहे. दररोज मानवतेची कसोटी घेतली जात आहे. खून, आत्महत्या यांना उत आला आहे. लोक असा संशय घेत आहेत. की सैतानी शक्ति सर्वत्र आपले कार्य करीत आहे. मानवाकरवी भ्रष्टाचार, अत्याचार आणि मानवाची बुद्धी भ्रष्ट केली जात आहे. त्याच्या शरीराचे नुकसान केले जात आहे ? - द मिनिस्ट्री ऑफ हिलिंग १४२, १४३.ChSMar 74.3

  अराजकतेच्या आत्म्याला सर्व राष्ट्रांवर तुटून पडण्याची परवानगी देण्यात आली. वारंवार अराजकतेच्या मारा राष्ट्रांवर होत आहे. क्रोधाग्नी भडकून नियमबाह्य नियंत्रण सुटून सर्व पृथ्वी ओसाड करण्याचा अराजकतेचा इरादा आहे. नोहाच्या दिवसा अगोदर जगाची जी अवस्था होती अगदी तशीच परिस्थिती आतासुद्धा आहे. अराजकतेच्या किंवा अत्याचाराच्या घटना अगदी जलद गतीने घडताना दिसतात. अगदी आता सुद्धा या शतकामध्ये सुद्धा अपराध घडत आहेत. देवाचे सर्व नियम ठाऊक असून सुद्धा ते सर्व प्रकारची दुष्टता करतात. जुन्या काळातील लोकांनी जी पापे केली आणि नाश ओढवून घेतला तीच पापे आजही केली जात आहेत. महा प्रलयाआधी देवाने नोहाला पाठविले. कदाचित लोक पश्चात्ताप करुन देवाकडे वळतील. नोहाने जगाला धोक्याचा इशारा दिला ही आणि आता या शेटच्या जगामध्ये सुद्धा देवाचे सेवक धोक्याच्या इशाराचा संदेश देत आहेत. कारण ख्रिस्ताचे दुसरे येणे जवळ आले आहे. यासाठी लोकांनी येशूच्या येण्यासाठी आपली तयारी करावी. असंख्य लोक आज देवाच्या आज्ञाभंग अवस्थेत जगत आहेत, देवाचे नियम त्यांनी पायदळी तुडविले आहेत. म्हणून पुन्हा एकदा देव सर्वांवर दया दाखवित आहे की त्यांना पश्चात्ताप करण्याची आणखी एक संधी दिली आहे. म्हणजे जे सर्व आपली पापे वेगळी करुन पश्चात्ताप करुन विश्वास ठेवणाऱ्यांच्या पापाची क्षमा करण्यात येईल. - पॉट्रिक्स ॲण्ड प्रॉफेटस १०२.ChSMar 75.1

  आजच्या जगाची अवस्था अशी आहे की संकटाचा काळ आपल्या डोक्यावर घिरट्या घालीत आहे. रोजच्या बातमी पत्रामध्ये ज्या बातम्या येतात. त्यावरुन असे दिसून येते की जवळच्याच भविष्यामध्ये भयंकर संकटे येणार आहेत. जबरी चोऱ्या वारंवार घडत आहेत. चळवळी किंवा बंद सर्वसामान्य झाल्या आहेत. दरवेळी चोऱ्या आणि खूनाचे प्रकार घडत आहेत. भूतांचे आत्मे लागलेले लोक इतरांचे स्त्रिया-मुले आणि इतरांचे प्राण घेत आहेत. माणसाची बुद्धी भ्रष्ट होत आहे. वेड लागून ते मोठ्याने गोंधळ घालीत आहेत. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:११.ChSMar 75.2

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents