Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय ८ : संघटीत ख्रिस्ती सामर्थ्य

    संस्थेची आवश्यकता

    वेळ खूप कमी आहे आणि संस्थेचे सामर्थ्य मोठ्या प्रमाणात करणे गरजेचे आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:२७.ChSMar 97.1

    छोट्या कंपनीची रचनाही मंडळीच्या स्थापनेचे कार्य आहे. याची ओळख करुन देणे यात मला काही चुकीचे वाटत नाही. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:२१,२२.ChSMar 97.2

    प्रत्येक मंडळीची व्यवस्था ही उत्तम प्रकारे स्थापन होणे अती आवश्यक आहे. चर्चच्या शेजारी राहणाऱ्यांशी मंडळीतील कामगारांनी योग्य प्रकारे शिक्षण देण्याचे प्रयत्न करावेत. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड, २९ सप्टेंबर १८९१.ChSMar 97.3

    प्रत्येक शहरामध्ये मंडळीचे दल किंवा संस्था असावी जी कार्यासाठी तयारी असावी. - जनरल कॉन्फरन्स डेली बुलेटिन, ३० जानेवारी १८९३.ChSMar 97.4

    आमच्या मंडळ्यांमध्ये कंपन्यांची स्थापना करावी. सेवेसाठी त्याचा वापर करावा. मासे धरणाऱ्यां सारख्या वेगवेगळ्या लोकांचा समावेश असावा. भ्रष्ट जगातील आत्मे शुद्ध व पवित्र ख्रिस्ताच्या सेवेसाठी आणायचे कार्य ते करतील. ख्रिस्ताची प्रीति आणि आशीर्वाद त्यांनाही मिळू दे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:२१.ChSMar 97.5

    जगामध्ये ख्रिस्ताच्या मंडळीची स्थापना केली ती जगासाठी मिशनरी कार्यासाठी आणि देवाची इच्छा आहे की सर्व मंडळीने उच्च नीच, श्रीमंतगरीब या सर्वांनी राज्याची सुवार्ता या लोकांना सांगावी. मंडळीने त्यांना देवाचे सत्य या सर्वांना सांगण्यात यावे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:२९.ChSMar 97.6

    जर एखादी मंडळी मोठ्या संख्येने असेल तर सभासदांनी लहान कंपन्यांची स्थापना करावी. म्हणजे त्यांनी केवळ मंडळीसाठीच कार्य करावे असे नाही, परंतु अविश्वासूंसाठी सुद्धा कार्य करावे. एके ठिकाणी जेथे दोघे किंवा तिघे विश्वासू असतील, तर त्यांनी कार्यकर्त्यांची टोळी बनवावी. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:२२. ChSMar 97.7

    जर लढाई क्षेत्रामध्ये शिस्त आणि हुकूम यशस्वी कार्यासाठी गरजेचे असेल तर क्षेत्रही तसेच असावे लागते आणि स्वत:ला त्या कार्यामध्ये गुंतवून ठेवावे. म्हणजे त्यांना त्यामध्ये मोठे यश प्राप्त होईल. यामुळे त्यांचे यश उच्च पातळीवर जाईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:६४९.ChSMar 97.8

    देव हा हुकुमाचा देव आहे. सर्व काही स्वर्गाशी तंतोतंत व क्रमवार मांडले आहे. ही अधिनता शिस्त आणि प्रत्येक कृतिच्या नोंदीवर असते कारण देवदूत मानवाच्या प्रत्येक कृति आणि हालचाली व विचारांच्या नोंदणी ठेवित असतात. शिस्त आणि आज्ञापालनानेच मानव देवाच्या विश्वासामध्ये यशस्वी होऊ शकतो. देवाला त्याच्या कार्यामध्ये शीस्तपणा, आज्ञापालन यांची गरज असते. आता इस्त्राएलांच्या दिवसात ते जसे होते तसेच आताही आहे. जे कोणी सर्व देवासाठी कार्य करतात त्यांनी सर्व गोष्टी त्याच्या शिस्तीप्रमाणे लागावे. त्यांनी निष्काळजीपणा आणि बेतालपणे वागू नये. त्यांनी आपले कार्य विश्वासाने आणि नम्रपणे करावे म्हणजे देवाला त्यांचे कार्य मान्य होईल आणि आवडेल. - पॅट्रिअॅर्च ॲण्ड प्रॉफेटस् ३७६.ChSMar 98.1

    कार्याची योग्य व्यवस्था मंडळीमध्ये असणे गरजेचे आहे. मंडळीच्या सभासदांना समजणे आवश्यक आहे की इतरांना सत्यप्रकाश देणे किती आवश्यक आहे. अशा प्रकारचे कार्य त्यांनी मंडळीमधून करावे. त्यांचा विश्वासू वाढविणे आणि त्यांचे ज्ञान वाढविणे असे त्यांनी करावे. जे देवापासून दर गेले आहेत त्यांना देवाजवळ आणावे. हे दान देवा पासूनच असते. हे विश्वासाचे काम असते. देवासाठी कार्य करणारी मंडळी ही जिवंत मंडळी आहे. जिवंत धोंड्यावर मंडळीची बांधणी करण्यात येते. आणि प्रत्येक धोंडा हा प्रकाशमय असतो. प्रत्येक ख्रिस्ती मनुष्य हा देवाचा मौल्यवान धोंडा आहे. ज्याच्या जवळ देवाचा प्रकाश आहे. त्याच्यामधून देवाचे गौरव दिसून येते. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:४३५.ChSMar 98.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents