Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    काहीतरी कृति हवी

    मला दाखविण्यात आले होते की देवाचे लोक काहीतरी बदल पाहण्यासाठी थांबले आहेत. त्यांना सामर्थ्य धरुन ठेवण्यासाठी भाग पाडले जात आहे. परंतु त्यांची निराशा होईल. कारण ते चुकीच्या मार्गावर आहेत. त्यांनी कृति केली पाहिजे. त्यांनी स्वत: आपल्या हाती कार्य करायचे आहे. त्यांनी कळकळीने देवासमोर सत्य कार्यासाठी विनंती केली पाहिजे. सत्य ज्ञान मिळविण्याची खटपट केली पाहिजे. आपल्या समक्ष ज्या गोष्टी घडत आहेत त्या पाहून आपण जागे होण्यासाठी योग्य अशाच आहेत. त्यामुळे आपण उठून ऐकण्याची ज्यांची तयारी आहे अशा घरांमध्ये जाऊन त्यांना सत्य सांगण्याची तातडीची गरज आहे. कारण आता जगाची कापणी करण्याची वेळ आली आहे. कारण पीक तयार आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. १:२६१.ChSMar 108.2

    विश्वातील ज्या सर्वांना तिसऱ्या देवदूता विषयीचे सत्य माहीत आहे त्यांनी हे पवित्र कार्य मुक्तपणे सर्वत्र पसरविण्याचे आहे. आपण पाहातो की हे कार्य करण्याचे आपले कर्तव्य आहे. सैतानाचे हस्तक आहेत त्यांना प्रत्येक ख्रिस्ती मनुष्यासाठी भरपूर काम आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:२५,२६.ChSMar 109.1

    ख्रिस्ताच्या लवकर येण्याचा संदेश सर्व राष्ट्रांना देणे गरजेचे आहे. शत्रुच्या जोरदार हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी सावध राहून अतुट आणि सतत परतावून लावणे गरजेचे आहे. एकाच ठिकाणी बसून हात चोळत राहणे आणि रडत बसणे हे आपले काम नाही, परंतु उठून कार्य करणे ही या शेवटच्या काळाची गरज आहे. सार्वकालिकतेसाठी हे कार्य करणे आवश्यक आहे. - द सदर्न वॉचमन २९ मे १९०२.ChSMar 109.2

    “काहीतरी करा, लवकर करा पूर्ण शक्तिनिशी
    स्वर्गदूत देतील आपल्या पंखांना दीर्घ विश्रांती
    आणि देव आता रक्तपातासाठी शांत राहणार नाही.”
    ChSMar 109.3

    - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ५:३०८.

    कोणीही असे समजू नये की त्यांना स्वातंत्र्य आहे आणि आपण हाताची घडी करुन शांत बसू आणि काहीच करण्याची गरज नाही. आळस आणि सुस्त राहून कोणाचेही तारण होत नाही हे कोणीही सांगू शकते. विचार करा की ख्रिस्त या जगामध्ये असताना त्याने त्याच्या जीवनामध्ये किती कार्य केले. त्याने किती कष्ट केले. आळस न करता त्यान नेमून दिलेले कार्य पूर्ण केले होते. त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालत आहोत काय ? त्याच्या कार्यात सहाय्य करीत आहोत काय ? - कॉल्पोसर इव्हॉन्जिलिस्ट ३८.ChSMar 109.4

    ईश्वरी आणि मानवी सहाय्यामुळे आत्मे वाचविण्याचे कार्य नेमून दिले आहे. देवाने आपले कार्य केले आहे. आणि आता मानवाची वेळ आहे. ख्रिस्ती लोकांनी आता त्यांचे कार्य करायचे आहे. देवाची इच्छा आहे की आता त्याच्या लोकांनी त्याने दिलेला प्रकाश जगातील राष्ट्रांना द्यायचा आहे. यासाठीच देवाचे पाचारण आहे. त्याला सहकार्य करण्यासाठी ख्रिस्ताबरोबर कोण जाईल ? - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. १ मार्च १८८७.ChSMar 109.5

    जी मंडळी हे कार्य करते ती जिवंत मंडळी असेल. पापाच्या आणि चुकांच्या विरुद्ध केवळ आपल्याच बाजूचे समाधान घेऊन उपयोगाचे नाही, परंतु हे समाधान मंद पाऊले टाकून चालणार नाही, परंतु ख्रिस्ताचा वधस्तंभ खांद्यावर वाहायला हवा. म्हणून आपल्या पुढाऱ्या बरोबर एक नवशिक्या शिपाया सारखा नव्या मार्गाने चाला. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड, ४ ऑगस्ट १८९१.ChSMar 109.6

    आपण या लढाईमध्ये स्वत:ला पुढे जोमदारपणे गेले पाहिजे. मग ख्रिस्त येईल आणि यामुळे बंडखोरी बंद होईल. मग आपले शेवटचे कष्ट हे ख्रिस्ताबरोबर असेल ख्रिस्ताबरोबर असणारे कार्य म्हणजे त्याच्याबरोबर त्याच्या राज्याकडे वाटचाल करुन जे कोणी लढाई काळामध्ये सर्वात पुढे असतील ज्या वाईट गोष्टी पुढे येतील आणि त्यांना तोंड देण्यासाठी ते उत्सुक असतील, परंतु ते कार्य करण्यासाठी त्यांना वेळ नसेल. तर त्यांनी लष्करामधून माघार घ्यावी आणि असे लोक जर ऐनवेळी माघार घेतील तर अशा लोकांच्या हातातील ख्रिस्ताचे ध्वजाचे ओझे होऊन त्यांच्या हाताला पक्षाघात होऊन मरणदंड ही शिक्षा मिळेल, परंतु जर ते नव्या जोमाने उभे राहिले तर त्यांना सामर्थ्य येईल व सत्याचे समर्थन करतील व ख्रिस्ताचा सन्मान करतील. जो कधी केला नव्हता. जे सध्याच्या सत्यावर विश्वास ठेवतात. त्यांना काळाच्या मागणीनुसार कार्याचे सामर्थ्याची मागणी हवी आहे. त्यांनी दैवी आज्ञा आणि उदाहरणे शिकविणे आवश्यक आहे. - रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड २५ ऑक्टोबर १८८१.ChSMar 110.1

    देवाने आता सर्व सेव्हंथ डे अँडव्हेंटिस्ट सर्व ठिकाणाहून पाचारण केले आहेत. कारण त्यांना स्वत: देवाला वाहून घेतले आहे. व त्यांच्या परिस्थितीनुसार त्याच्या कार्यासाठी अति विश्वासाने कार्य करतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:१३२.ChSMar 110.2

    आळस आणि धर्म एकत्र जात नाहीत आणि ख्रिस्ताच्या कार्यामध्ये ख्रिस्ती लोकांच्या जीवनातील ख्रिस्ताच्या कार्यामध्ये ही एक फार मोठी उणीव आहे. हा अनेक वर्षांचा अनुभव आहे. तुम्ही जर व्यायाम केला नाहीतर शरीरातील स्नायु शीथील होऊन निकामी ठरतील. आध्यात्मिक नैसर्गिकतेमध्ये सुद्धा असेच आहे. तुम्हाला बळकट राहायचे असेल तर व्यायाम हा केलाच पाहिजे. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड १३ मार्च १८८८.ChSMar 110.3

    आपण सर्वांनी मेहनती कार्यकर्ते असणे आवश्यक आहे. आळशी मनुष्य दीन व दरिद्री असतो, परंतु त्याच्या आळशीपणाचा कारण काय देऊ शकतो जेव्हा ख्रिस्ताने आपले जीवन त्यांच्यासाठी दिले. या महान कार्यासाठी ते लोक कोणती सबब सांगू शकतात ? जर आध्यात्कि देवाच्या लोकांनी आध्यात्मिक सराव केला नाही तर सैतान त्यांना मोहात पाडून आपल्या नियंत्रणात घेईल आणि मग त्यांना शिक्षा होईल. स्वर्गातील सर्व देवदूत पृथ्वीवरील लोकांसाठी येशूच्या दुसऱ्या येण्याची तयारी करण्याची गडबड करीत आहेत. आम्ही सर्व देवाचे लोक या नात्याने देवाशी सहकार्य करीत आहेत. या सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे. आता ही आपल्याला कार्य करायची संधी आहे. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड, २४ जानेवारी १८९३.ChSMar 110.4

    मिशनरी हृदयाची आता गरज आहे. जोरदार केलेल्या प्रयत्नाचा थोडा बहुत परिणाम होईल. आपण एकचित होऊन लक्ष ठेवावे. आम्ही खोलवर जाऊन कळकळीने कार्य करावे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:४५.ChSMar 111.1

    देवाने दिलेल्या दानाकडे जर लोकांनी दुर्लक्ष केले तर ते काहीच त्यांचा वापर करीत नाहीत, तर त्याचा परिणाम काहीच होत नसेल तर ते दान निरुपयोगी होईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:४२५.ChSMar 111.2

    जगामध्ये आपले स्थान काय आहे ? आम्ही वेळेसाठी थांबलो आहोत, परंतु ही वेळ काल्पनिक समर्पणासाठी खर्च करण्याची नाही. थांबणे, वाट पाहाणे आणि सावधपणे कार्य करणे या गोष्टी एकत्रित आहेत. आपले जीवन धावाधाव आणि जगातील गडबड आणि जगातील सर्व योजनांसाठी आपले जीवन नाही. वैयक्तिक धार्मिकतेकडे दुर्लक्ष करणे या सर्व गोष्टी जगामध्ये चालू आहे. त्यासाठी देवाचे कार्य करणे आवश्यक आहे. आपल्या व्यवहारामध्ये आळस करुन चालणार नाही. आपण आत्म्यात उत्साही असले पाहिजे. देवाची सेवा करण्यात तत्पर असावे. आत्म्यांचे दिवे नीट करायचे असतात. आणि आपल्याकडे देवाच्या कृपेचे तेल असणे आवश्यक आहे. आध्यात्मिक -हास होण्यापासून नेहमी सतर्क राहावे त्याची काळजी घ्यावी. नाहीतर ख्रिस्ताचे येणे हे चोरासारखे होईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ५:२७६.ChSMar 111.3

    आध्यात्मिक आळशीपणाच्या जगात आम्ही जगत आहोत. प्रत्येक आत्मा आता चार्ज करणे आवश्यक आहे. यासाठी स्वर्गीय वीज प्रवाहाची गरज आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ८:१६९.ChSMar 111.4

    तुमच्या जीवनामध्ये शक्य असल्यास सर्व चांगल्या गोष्टींची गर्दी असणे आवश्यक आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ५:४८८.ChSMar 111.5

    येशूने त्याच्या शिकवणीने आपल्या कामगारांकरवी त्याचे कार्य करुन आपले नाव केले असते. प्रत्येक सभासदाने येशूला वैयक्तिकपणे खडकावर स्थापन करणे आवश्यक आहे. कारण वादळाने सर्व गोष्टींची धूळधाण होऊ शकते होत्याचे नव्हते होऊ शकते. प्रत्येकाचा आध्यात्मिक पाया उखडला जाऊ शकतो. म्हणून वाळूची तुलना खडकाशी करु नका. म्हणून खोल पाया खणा व सार्वकालिकतेची इमारत बांधा. अश्रृंनी बांधा, मनापासून प्रार्थनेने बांधा. तुमचे जीवन चांगल्या गुणांनी युक्त करा. या शेवटच्या दिवसामध्ये मनुष्याने आपला उद्देश स्थिर ठेवला पाहिजे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ५:१२९, १३०.ChSMar 112.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents