Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First

  ख्रिस्तीसेवेची सुरुवात करण्यासाठी प्रोत्साहन

  देवाच्या सेवेमध्ये असणारे अति छोटे कार्य करण्यासाठी जे कष्ट केले जातात त्यामध्ये आनंद, विश्वास आणि आवड असावी लागते तरच त्यामध्ये यश येते. प्रत्येक मानव त्याच्या जीवनामध्ये कार्य करीत असता घाबरतच काम करतो. विणकार्य करीत असताना त्याचा पूर्ण नमूना असणे आवश्यक आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:११५.ChSMar 127.1

  आम्ही आपले रोजचे कर्तव्य करीत असताना सतत समर्पित जीवन जगावे आणि इतरांच्या उपयोगी पडण्यामध्ये त्यात वाढ होणे आवश्यक आहे. कारण सार्वकालिक प्रकाशामध्ये आम्ही आपले कार्य शोधीत असतो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:११५.ChSMar 127.2

  आपण आपली रोजची कामे करण्या अगोदर ईश्वर भक्ति प्रार्थना करुनच सुरुवात करावी. आपण आपली कामे उपयोगी असावी अशीच करावीत. आपण आपली कामे सार्वकालिकतेच्या प्रकाशामध्ये करावीत. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:१५०.ChSMar 127.3

  परमेश्वराकडे प्रत्येकासाठी त्याच्या महान कार्यासाठी कार्य आहे. ज्या दानाची गरज नाही ते दिले. - टेस्टिोनिज फॉर द चर्च. ९:३७.ChSMar 127.4

  प्रत्येकासाठी स्वर्गामधून सार्वकालिक योजना आहे. आत्म्यांच्या तारणासाठी प्रत्येकाने ख्रिस्ताला सहकार्य करायचे आहे. आम्हा सर्वांसाठी स्वर्गामध्ये जी जागा तयार करण्यात आली आहे त्यासाठी आपण पृथ्वीवर ख्रिस्तासाठी कार्य करायचे आहे तरच स्वर्गात जागा मिळेल. पृथ्वीवरील आपल्याला देवाच्या कार्यावर अवलंबून आहे. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन. ३२६, ३२७.ChSMar 127.5

  देवाचे डोळे त्याच्या प्रत्येक मनुष्यावर आहेत. प्रत्येकाची तो काळजी करतो. त्यांच्यासाठी त्याच्या योजना आहेत. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:१२.ChSMar 128.1

  सर्वजण काहीतरी कार्य करु शकतात. आत्मे मिळविण्यासाठी जे विश्वासाने आणि नि:स्वार्थीपणे कार्य करतात त्यांना देवासमोर लज्जीत होण्याची गरज नाही. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ५:३९५.ChSMar 128.2

  तुम्ही केलेल्या कार्याचे फळ इतर कोणाला मिळू शकणार नाही. आपले कार्य आपल्यालाच करायचे आहे. तुमच्या जवळ तुमचा प्रकाश असेल तर इतर अंधारातच राहतील. कारण तुमच्या कार्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले असणार. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ५:४६४.ChSMar 128.3

  देवाचे नम्र लोक आज्ञाधारकपणाने देवाच्या पाचारणाला प्रतिसाद देतात. त्यांना नक्कीच ईश्वरी सहकार्य मिळते. ते महान आणि पवित्र जबाबदारी स्वीकारतात. त्यांच्या गुणांना बढती मिळते. याला आध्यात्मिक सामर्थ्य उच्च विचारसरणीची कृति असे म्हणतात. त्यांचे मन आणि सामर्थ्य स्वच्छ असते; हृदय शुद्ध असते. येशूवरील विश्वास आणि सामर्थ्याचा हा परिणाम आहे. देव खूप अद्भुत आणि सामर्थ्यवान आहे. अशक्तांनाही तो सशक्त आणि सामर्थ्यवान बनवितो. मनुष्य देवासाठी व त्याच्या कार्यासाठी जे निर्णय घेतो ते स्वत:च्या बळावर व देवावरील विश्वासाने घेतो. त्याचा परिणाम योग्यच होतो. जे कोणी थोड्या ज्ञानाने व नम्रपणे आपले कार्य आरंभ करतो, जे ज्ञान त्याला आहे ते इतरांना सांगतो त्याला स्वर्गीय सर्व ज्ञान प्राप्त होते. त्यांच्या मागणी प्रमाणे त्याला ते मिळते. जे कोणी जास्त प्रमाणात प्रयत्न करुन जगाला देवाच्या प्रीतिविषयी सांगतात ते देवाच्या प्रीतिने अनेक आत्मे जिंकतात त्यांच्या योजना सफल होतात. देवाचे ज्ञान मिळविण्याचे जे सतत प्रयत्न करतात त्यांचे स्वर्गीय ज्ञान वाढते आणि ते अधिकार सामर्थ्यवान बनतात. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन ३५४.ChSMar 128.4

  प्रत्येकाने देवाला आत्मे मिळविण्याचे कार्य करावे. कारण ते देवाचे कार्य आहे. सर्वांनी आपले ज्ञान इतरांना द्यावे आणि शांत राहू नये यासाठी कोणीतरी आपल्याला मार्गदर्शन करावे याची वाट पाहू नये नाहीतर ते योजनांचा डोंगर तुमच्यावर रचतील, तुमची ही जबाबदारी वाढेल. तसेच मार्गदर्शनासाठी तुम्ही वाट पाहात राहिला तर वेळ फुकट जाईल. देव तुम्हाला ज्ञान देईल, सुधारणा देईल. परंतु पाचारण अजूनही आहे. तो म्हणतो, “मुला माझ्या द्राक्षमळ्यात जाऊन आज कार्य कर.” ह्यावरुन पवित्र आत्मा म्हणतो तुम्ही माझी वाणी ऐकाल तर आपली अंत:करणे कठीण होऊ देऊ नका.” इब्री ३:७,८. देव प्रस्तावना करु शेवट “पुत्र” या शब्दाने करतो. किती उत्कृष्ट किती दयाळू तरीही किती तातडीची गरज. त्याचे निमंत्रण सुद्धा एक आज्ञाच आहे. - कॉन्सल्स टू पेरेन्टन्स टीचर्स अॅण्ड स्टुडंटस. ४१९.ChSMar 128.5

  दुष्टाईचा प्रतिकार करणे म्हणजे जोमाने सेवा कार्य करणे होय. - द अॅक्टस् ऑफ द अपोस्टल. १०५.ChSMar 129.1

  प्रत्येक कृति, प्रत्येक न्यायाचे कार्य आणि दया व सदिच्छा या गोष्टी स्वर्गात संगीत निर्माण करतात. - रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड १६ ऑगस्ट १८८१. ChSMar 129.2

  ख्रिस्ताचा आत्मा हा मिशनरी आत्मा आहे. परिवर्तन होण्याची प्रथम प्रेरणाही हृद्याचे परिवर्तन ते म्हणजे इतर आत्मे ही तारणाऱ्याकडे आणणे. - द ग्रेट कॉन्टरवर्सी. ७०.ChSMar 129.3

  देवाच्या कृपेमध्ये वाढण्याचा एकच मार्ग म्हणजे ख्रिस्ताचे काम करण्यामध्ये रस घेणे. त्या कार्याचा आनंद घेणे. - रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. ७ जून १८८७.ChSMar 129.4

  आपण एखाद्या मोठ्या समारंभाची वाट पाहू नये किंवा अधिक विलक्षण पात्रता असण्याची अपेक्षा करु नये देवाच्या कार्याला जाण्याआधी. - स्टेप्स टू ख्राईस्ट. ८३.ChSMar 129.5

  जो मनुष्य समाजासाठी आशीर्वादित ठरतो मग तो सुशिक्षित किंवा अशिक्षित असो तो आपले सर्व सामर्थ्य वापरुन देवाचे कार्य करतो. - द सदर्न वॉचमन २ एप्रिल १९०३.ChSMar 129.6

  अनेकांना देवाने आपल्या कार्यासाठी तयार केले आहे. परंतु त्यांना थोडेच कार्य केले कारण त्यांना तेवढेच कार्य करायचे होते. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन ३३१. ChSMar 129.7

  तुम्ही जर एक आत्मा जिंकण्यासाठी ९९ ते १०० वेळा पडला पण शेवटी एक आत्मा जिंकू शकता, तर धन्यासाठी तुम्ही फार मोठे कार्य केले असेल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ४:१३२.ChSMar 129.8

  देव आणि प्रत्येक आत्म्यामधील संबंध अगदी वेगळे आहे की जसे या जगामध्ये दुसरा कोणता आत्मा नाहीच जो त्यांच्यामध्ये येईल. जसे काय देवाने आपला एकूलता एक पुत्र त्या एका आत्म्यासाठीच दिला आहे. - स्टेप्स टू ख्राईस्टि. १००.ChSMar 129.9

  देव पाहातो त्याला समजते आणि तो तुमचा वापर करुन घेईल. तुम्ही अशक्त जरी असले त्यांना जे दान मिळाले आहे ते त्याच्या कार्यासाठी पवित्र असे असेल. म्हणजे त्याची सेवा सामर्थ्यवान बनेल, अशक्तपणा निघून जाईल त्याची मौल्यवान प्रशंसा होते. देवाचा आनंद हा शक्तिचा घटक आहे. तुम्ही जर विश्वासू असाल तर तुम्ही आपली शांती सर्वत्र पसरवाल. तुमच्या जीवनातील ते पारितोषिक असेल आणि तुम्ही भविष्यामध्ये देवाच्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश कराल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ८:३४.ChSMar 130.1

  ज्या व्यक्तिला थोडे ज्ञान आहे आणि जर देवाच्या प्रीतिमध्ये तो विश्वासू असेल तर तो ख्रिस्तासाठी आत्मे जिंकण्याचे कार्य करील. हारलान पेज नावाचा गरीब मॅकेनिकल होता. तो साधारण शिकलेला होता. सामान्य पात्रतेचा होता. परंतु त्याने देवाची वाट पाहणाऱ्यांच्या संख्येमध्ये फार मोठी वाढ केली. यामध्ये तो यशस्वी होऊनी जीवनी मुकूट त्याच्या मस्तकावर ठेवण्याचा सन्मान त्याला मिळेल हे त्याचे यश असेल. त्याने लोकांच्या तारणासाठी त्यांच्याशी खाजगी संभाषण केले. त्यांच्यासाठी कळकळीची प्रार्थना केली. त्याने त्यांच्यासाठी प्रार्थना सभा चालू ठेवल्या. त्या विषयी त्याने पत्रिका छापल्या आणि सर्वत्र त्यांचे वितरण केले आणि जेव्हा तो मृत्युशय्येवर होता तेव्हा सार्वकालिकतेचा प्रकाश त्याच्या चेहेऱ्यावर दिसत होता. तो म्हणू शकला होता की “मला ठाऊक आहे की ही सर्व देवाची कृपा आहे आणि मी जे कले त्यात माझे कोणतेच गुण नाही, परंतु मी जे शेकडो आत्मे देवासाठी जिंकले ती केवळ त्याचीच कपा मी वैयक्तिकपणे केले ती सर्व देवाचीच साधन सामग्री होती. देवानेच सहाय्य केले. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ५:३०७, ३०८.ChSMar 130.2

  हे जग ख्रिस्ती लोकांचा स्वर्ग नाही. परंतु केवळ देवाची उपासना करण्याचे क्षेत्र आहे, जेथे आपण निष्पाप देवदेतांबरोबर देवाची भक्ति करण्याचे मूळ स्थळ स्वर्गामध्ये आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. २:१८७.ChSMar 130.3

  ख्रिस्ताचे सर्वात हीन, दीन व दरिद्री समजले जाणारे शिष्य सुद्धा दुसऱ्यांकरीता आशीर्वाद ठरु शकतात. ते काही खास सत्कृत्य करीत आहेत. अशी त्यांना जाणीव असतेच असे नाही, परंतु त्यांच्या नकळत समाज सागरात त्यांच्यामुळे आशीर्वादाच्या लाटा उत्पन्न होतील व त्या अधिकाधीक पसरट व खोल होत जातील. असा त्यांचा प्रभाव पडेल. जे आशीर्वादीत सुपरिणाम घडून येतील त्यांची जाणीव एखादेवेळी त्यांना पारितोषिकाच्या शेवटच्या दिवसापर्यंत होणार नाही. आपण काही थोर कार्य करीत आहोत असे त्यांना वाटत नसेल व या जीवनात माहीत ही होणार नाही. यशाची चिंता करीत त्यांनी मनातल्या मनात कुढावे अशी देवाची इच्छा नाही. त्यांनी फक्त शांत व स्वस्थ मनाने पुढे जायचे आहे. देव संधी उपलब्ध करुन देईल. तसतसे देवाने नेमून दिलेले कार्य विश्वासूपणे त्या स्वभावात त्यांच्यासारख्या स्वत:च्या अंतरात्म्याची प्रगती जास्त जास्तच होईल. या जीवनातले देवा समवेत कार्य करणारे देवाचे सहकारी आहेत व अशाप्रकारे ते अधिक उच्च कार्या करीता पात्र होत आहेत. तसेच येणाऱ्या सार्वकालिक जीवना करिता व पवित्र निष्कलंक जीवनाकरीता ते पात्रा मिळवित आहेत. या सत्यावर त्यांनी पूर्ण विश्वास ठेवावा. स्टेप्स टू ख्राईस्ट ८३. ChSMar 130.4

  अनेकजण असे आहेत ज्यांनी स्वतास ख्रिस्तास समर्पित केले आहे. तरीही अनेकजणांना ही संधी दिसत नाही. त्याच्या सेवेमध्ये त्यांना समर्पण करण्याचे आणि कार्य करण्याची संधी ते चुकवितात. जे स्वतः मोठ्या प्रमाणात देवाचे कार्य करतात त्यांना वाटते की आम्ही त्यांचे कार्य करता करता हुतात्म्याचे मरण पत्करु, परंतु त्याची गरज नाही. अर्थात असे समर्पण देवाला मान्य असते. ज्यांना रोजड धोका आणि मरणाला तोंड द्यावे लागते ते मिशनरी नसतात. स्वर्गातील नोंदणी वहीत त्यांचे नाव वरचे असते. जे ख्रिस्ती लोक रोज ख्रिस्ताला शरण जातात त्यांना अनेक समस्या असूनही ते नम्र असतात त्यांची धर्मनिष्ठा, भक्ति व शांती कोणत्याही अवस्थेमध्ये ढळत नाही. असे लोक घरगुती जीवनामध्येही त्यांच्यामध्ये ख्रिस्ताचे गुण दिसतात. असे लोक देवाच्या दृष्टीमध्ये अति मौल्यवान असतात. इतके की जगामध्ये प्रसिद्ध असणाऱ्यांपेक्षाही मौल्यवान असतात. - ख्राईस ऑब्जेक्ट लेसन ४०३.ChSMar 131.1

  कार्यसिद्धी करण्याची गणती किंवा त्याचे परिणाम नाही, परंतु आत्म्याचे जे कार्य आहे देवाला मान्य असते. आत्म्याकरवी करण्यात आलेले कार्य हेच मौल्यवान असते. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन. ३९७.ChSMar 131.2

  धन्याची मान्यता दिली नाही कारण कार्याचे वैभवी सादरीकरण कारण अनेक गोष्टी मिळविल्या आहेत. कारण थोड्या गोष्टींमध्ये इमानीपणा असावा लागतो. याचे काही महान परिणाम मिळवित नाही. त्याकडे आमचे लक्ष नाही, परंतु ज्या उद्देशासाठी आपण कार्य करीत आहोत ते देवाचे वजन आहे. महानतेपेक्षा तो पारितोषिक देतो ते चांगुलपणाचे आणि विश्वासूपणासाठी. हे कार्य पूर्णतेस जाणे अति आवश्यक आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. २:५१०, ५११. ChSMar 131.3

  छोट्या गोष्टी पुढे सरकवू नका आणि मोठ्या कार्याकडे पाहू नका. तुम्ही छोटे काम यशस्वीपणे करु शकता, परंतु मोठ्या कार्याच्या मोहासाठी अपयशी ठरु शकता आणि निराशामध्ये पडू शकता. ज्या ठिकाणी कार्य होऊ शकते तिकडे लक्ष लावा. मग तुम्ही गरीब असा की श्रीमंत, मोठे किंवा नम्र. देव तुम्हांला त्याच्या कार्यासाठी कृति करण्यासाठी पाचारण करतो. ते कार्य तुम्ही आपल्या शक्तिने करु शकता. तुमचे हात जे काय करु शकतात त्यामध्ये प्रगती करा. त्या दानाचा वापर त्याच्या कार्यासाठी करा आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले तर ती संधी गमावाल. त्यामध्ये तुम्ही निष्फळ व निस्तेज व्हाल. म्हणूनच सध्या अनेकजण निष्फळ ठरले आहेत. देवाच्या बागेमध्ये फळे नसणारी अनेक झाडे आहेत. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:१२९.ChSMar 132.1

  देवाची इच्छा आहे की आमच्याकडे जी जी दाने आहेत त्या सर्वांचा वापर त्याच्या कार्यासाठी करावा आणि जर आपण तसे केले तर आमच्याकडे महान दाने येतील वापरण्यासाठी. तो आपल्याला अलौकिक दान देऊ शकणार नाही. आपल्याकडे ते ज्ञान कमी आहे, परंतु सध्या आपणाकडे आहे त्याचा वापर आपण करु शकतो. तो आपल्यामध्ये त्याची वाढ करु शकतो, आपणास तो सामर्थ्य देऊ शकतो. धन्याच्या सेवेसाठी पूर्ण अंत:करणाने आणि मोठ्या सामर्थ्याने आपण कळकळीने त्याचे कार्य करु शकते. यामुळे आपले सामर्थ्य वाढेल. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन २५३, ३५४.ChSMar 132.2

  ख्रिस्ताचे हृदय आनंदी आहे कारण जे आत्म्यामध्ये दीन ते सर्व गोष्टीमध्ये ते दीन असतात. तरीही ते देवाला आवडतात मग त्यांची अवस्था कोणतीही असो. जे गरीब व दीन असतात त्यांच्याकडे देवाचे जास्त लक्ष असते. कारण त्यांच्या अनेक समस्या असतात यामुळे ते नम्र असतात अनेक गरजा पुरविण्यासाठी असमर्थ असतात तसेच ते धार्मिकतेचेही भुकेले असतात. देवांचे अनेक कार्य ते असतात. ते त्यांच्या असमर्थतेने देवाचे कार्य करण्यास त्यांना शक्य नसते.यामुळेही ते निराश होतात अशांचे देव स्वागत करतो. - गॉस्पल वर्कर्स. ३७.ChSMar 132.3

  ख्रिस्ताचे कार्य करण्यास आपण विधर्मी देशात जाण्याची गरज नाही. आपल्या कुटूंबाच्या छोट्या वर्तुळातूनही जर आपले कर्तव्य तिथे असेल तर आपण बाहेर पडण्याची गरज नाही. हे कार्य आपण आपल्या घरच्या लोकांत, मंडळीमध्ये ज्या कोणाशी आपला संबंध येतो व ज्यांच्याशी आपण व्यवहार करतो त्यांच्यामध्ये व त्यांच्या करीता करु शकतो. - स्टेप्स टू ख्राईस्ट. ८१.ChSMar 133.1

  जर आपण आपले जीवन बनवितो आणि अभ्यासामध्ये ख्रिस्ताविषयी शिकवितो, प्रत्येक घडणाऱ्या घटना प्रत्येक वचनाची पूर्तता करते. कारण प्रत्येक वचने प्रेरणादायक असते. प्रत्येक प्रवचन स्फूर्तिदायक असते. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:६३.ChSMar 133.2

  पृथ्वीवरील जीवन हे स्वर्गातील जीवनाची सुरुवात आहे. पृथ्वीवरील शिक्षण हे स्वर्गातील प्रथम दिक्षा असेल. ते स्वर्गातील तत्त्व असेल. येथील जीवनातील कार्य हे तेथील जीवन कार्याचे प्रशिक्षण असेल. त्याच्या पवित्र सेवेतील मनुष्याचा स्वभाव असेल तोच भविष्यात ही असेल. — एज्युकेशन ३०७.ChSMar 133.3

  जो कोणी ख्रिस्ताच्या सेवेमध्ये त्याच्या साथसंगतीच्या संधीला नाकार देतो. हे त्याचे प्रशिक्षण तो नाकारतो तर एवढेच नाहीतर त्याच्या गौरवामध्ये भाग घेण्याचेही तो नाकारतो. या जगामध्ये त्याला मिळण्यात येणारे प्रशिक्षण त्याचे स्वभावगुण बदलण्यासाठी होते. - एज्युकेशन २६४.ChSMar 133.4

  कोणीही आपले जीवन स्वार्थीपणाने जगू नये आणि नंतर स्वत:च्या इच्छेने सेवा करण्यास सुरु करु नये. त्यांनी त्यांच्या देवाच्या आनंदात प्रवेश करावा. नि:स्वार्थीपणाच्या आनंदात ते प्रवेश करु शकणार नाहीत किंवा त्यामध्ये भाग घेऊ शकणार नाहीत. स्वर्गीय दरबारात ते योग्य आहेत. स्वर्गीय स्वच्छ वातावरण ते मान्य करणार नाहीत. स्वर्गात पसरलेल्या प्रीतिच्या वातावरणामध्ये ते टिकू शकणार नाहीत. देवदूतांचा आवाज आणि त्यांच्या संगीताची मधुरतेने त्यांचे समाधान होणार नाही. स्वर्गीय विज्ञान त्यांच्या मनाला गूढ असे वाटेल. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन. ३६४, ३६५.ChSMar 133.5

  धीराने आणि चिकाटीने कार्य करण्यासाठी देवाने त्याच्या लोकांना पाचारण केले आहे. जगामध्ये सर्वत्र पाप पसरले आहे. समुद्राच्या रुक्ष भूमिवर फुटलेल्या गलबताप्रमाणे सर्व लोकांची अवस्था झाली आहे. जे कोणी ख्रिस्ताच्या गौरवाविषयी सांगतात त्यांनी त्याच्या कार्याविषयी सुद्धा सांगावे. असहाय्य लोकांना त्यांनी मदत करावी. दुर्दैवी आणि निराश लोकांना आधार द्यावा. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:३१.ChSMar 133.6

  सामान्य लोक आपली जागा कामगार म्हणून स्वीकारतात. ते आपले दुःख इतरांना सांगतात जसे ख्रिस्त दयाळूपणे इतरांना सहाय्य करीत असे. लोकही त्याच्यावरील विश्वासाने आपले कार्य करीत असत. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ७:२७२.ChSMar 134.1

  ख्रिस्ताची प्रतिमा त्याच्या प्रत्येक शिष्यामध्ये बसली होती. देवाने प्रत्येकाच्या नावावर पूर्व नियोजनाप्रमाणे त्याचा पत्राची प्रतिमा कोरुन ठेवली आहे. प्रत्येकासाठी ख्रिस्ताची प्रीति, त्याचा नम्रपणा, त्याचे दीर्घ दुःख सहन, त्याचे पावित्र्य, दया आणि सत्य सर्वजणासाठीच समर्पण केले आहे. डीजायर ऑफ एजेस. ८२७.ChSMar 134.2

  सेवेच्या वेदीवर सर्व काही अर्पण करण्यात सर्वांना पाचारण येते. आलीशाच्या सेवेसारखी आम्ही सेवा करावी अशी अपेक्षा नाही किंवा आम्हांजवळ असलेले सर्व विकून टाकण्यास आम्हाला सांगितले नाही, परंतु आमच्या जीवनात देवाच्या सेवेला आम्ही प्रथम स्थान द्यावे अशी देवाची अपेक्षा आहे आणि ह्या पृथ्वीवरील देवाचे कार्य पुढे जाण्यास काहीतरी केल्याशिवाय दिवसाचा अस्त होऊ नये ही धारणा असावी. सर्वांकडून सारख्याच सेवेची अपेक्षा तो करीत नाही. एखाद्याला परदेशात काम करण्यास पाचारण होईल. दुसऱ्याकडून सुवार्ता कार्याच्या अर्थ सहाय्याची मागणी करण्यात येईल. देव प्रत्येकाची देणगी स्वीकारतो. जीवन व हितसंबंध यांचे समर्पण आवश्यक आहे. हे समर्पण करणारे स्वर्गीय पाचारण श्रवण करुन त्याचे आज्ञापालन करतील. - प्रॉफेटस अँण्ड किंग्ज. २२१.ChSMar 134.3

  जगातील हुशार मनुष्य जो चिंतन आणि योजना करतो आणि जो नेहमी आपल्या व्यसनाविषयी विचार करतो. त्याने सार्वकालिक जीवनासाठी हुशार बनण्यासाठी विचार करायला हवा. जर त्याने आपले मन आणि विचार स्वर्गीय खजिन्यासाठी कष्ट केले असते त्यांनी आपले चित्त देवाकडे लावावे. या जगामध्ये असताना त्याने लोकांचे जीवन वाचविण्यासाठी आपले जीवन वेचले. स्वर्गामध्ये त्यांनी आपली संपत्ती साठवावी म्हणून कार्य केले. आपले कार्य संपन्न करण्याचे त्याने सर्व प्रयत्न केले. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:२९७.ChSMar 134.4

  जे नम्र आहे त्यांच्याकडे देव सध्याचे सत्य सुपूर्त करतो. अनेकांनी इकडे-तिकडे जलदगतीने जाऊन देवाच्या आत्म्याकरवी जे अंधारामध्ये आहेत त्यांना देवाचा प्रकाश देण्याचे प्रयत्न करतात. सत्य त्यांच्या हाडामध्ये अग्निसारखे आहे. त्यांच्यामध्ये देवाचे सत्य सतत जळतच राहावे म्हणजे जे अंधारात बसले आहेत त्यांच्यापर्यंत सत्य घेऊन जाण्यासाठी त्यांच्यामध्ये स्फूर्ति तशीच राहावी. त्यांच्यामध्ये जे अशिक्षित आहेत ते देवाच्या वचनाची सुवार्ता गाजवित आहेत. मुलांमध्येही पवित्र आत्मा येऊन देवाचा स्वर्गीय संदेश ते सर्वत्र पसरवितील. ज्यांना राज्याची सुवार्ता पसरविण्याची कळकळ आहे ते देवाचे वचन सांगण्यासाठी उत्सुक असतील त्यांच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव होईल आणि मानवाच्या बंधनामधून ते मुक्त होऊन देवाच्या लष्करामध्ये मिसळतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ७:२६,२७.ChSMar 135.1