Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय १० : पद्धती

    घरोघरी

    सार्वजनिक सभा घेणे आणि घरोघरी जाऊन कार्य करणे हे दोन्हीसुद्धा सारखेच आहे. मोठ्या शहरांमध्ये अनेक वर्गाचे लोक आहेत. त्यातील काही प्रकारचे लोक सार्वजनिक सभांसाठी येऊ शकत नाहीत. त्यांचा शोध घेणे म्हणजे शंभरातून हरवलेल्या एखाद्या मेंढराचा शोध घेण्यासारखे आहे. त्यांच्यासाठी वैयक्तिक पण कष्ट करुन त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचणे आवश्यक आहे. जेव्हा वैयक्तिक कार्याकडे दुर्लक्ष केले तर आपण मौल्यवान संधी गमावू. त्या योगे आपण नि:संशय कार्याची प्रगती करु शकतो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:१११.ChSMar 144.1

    वचनाबरोबरच धीराच्या शब्दांचीही गरज असते. ख्रिस्ताने दिलेल्या आपल्या संदेशाबरोबरच परोपकार बुद्धीत प्रीतिही दाखविली. या कामगारांनी घरोघर जाऊन गरजवंताना सहाय्य करावे आणि संधी मिळाली तर वधस्तंभाची गोष्ट त्यांना सांगावी. ख्रिस्त त्यांचे वचन असावे. त्यांना धार्मिक तत्वाच्या विषयाची गरज नाही. त्यांना ख्रिस्ताचे कार्य आणि त्याच्या समर्पणाविषयी कळू द्या. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्ताची धार्मिकता निर्माण करु द्या. त्याचे पावित्र्य धारण करु द्या. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:२८८.ChSMar 144.2

    देव लोकांचा आदर करणारा आहे. तो नम्र आणि समर्पित लोकांचा वापर करुन घेतो. त्यांनी जरी इतरांसारखे शिक्षण घेतले नसेल त्यांनीही इतरांसारखे स्वत:ला घरोघरी जाऊन लोकांची सेवा करावी. शेकोटीभोवती बसूनही त्यांना ख्रिस्ताविषयी सांगू शकतात, जर ते नम्र आणि दूरदर्शी असतील तर ते अति सावधपणे वेळेचा सदुपयोग करतील. कुटुंबियांची गरज लक्षात घेऊन त्यांना ते सहाय्य करतील आणि ते देवाविषयी सांगण्याचा प्रयत्न करतील. एखाद्या दीक्षित पाळकाप्रमाणे सामान्य मनुष्य सुद्धा हे कार्य करु शकतात. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:२१.ChSMar 144.3

    जे घरोघरी जाऊन कार्य करण्यामध्ये गुंतलेले असतात त्यांना देवाचे कार्य करण्याचे अनेक मार्ग दिसतात. आजारी लोकांसाठी ते प्रार्थना करु शकतात. जे त्रासामध्ये असतात त्यांना ऐपतीप्रमाणे अशांना ते सहाय्य करतील. साधे आणि नम्र लोकांना साधेपणाने होईल तितके सहाय्य करावे. जे असहाय्य आहेत त्यांच्यासाठी मदत करावी. जे बलहीन आहेत त्यांना मदत करावी. जे शक्तिहीन आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. त्यांची जगीक भूक आणि वेदना कमी करुन तारणाची भूक त्यांना लागावी म्हणून प्रार्थना व विनंत्या कराव्यात यासाठी त्यांची झोप आणि हृदये जागृत व्हावी म्हणून प्रयत्न करावेत. नि:स्वार्थी आणि दयाळूपणामुळे अनेक जणांकडे आपण पोहोचू शकतो आणि ख्रिस्तामध्ये त्यांचा विश्वास संपादन करु शकतो. आणि जसे ते आपल्या नि:स्वार्थीपणाचा पुरावा पाहतील तर ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासाठी त्यांना सोपे जाईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:८३,८४.ChSMar 144.4

    देवाच्या लोकांना घरोघरी जाऊन बायबल उघडून त्यांना शिकवावे. ख्रिस्ती साहित्याचे वितरण करावे. त्यांना देवाच्या प्रकाशाचा आशीर्वाद प्राप्त झाल्याची साक्ष द्यावी. यामुळे त्यांचा आत्मा तृप्त झाल्याचे त्यांना सांगावे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:१२३.ChSMar 145.1

    आपला तारणारा घरोघरी जाऊन लोकांचे आजार बरे करणे, रडणाऱ्यांचे सांत्वन करणे. जे त्रासात आहेत त्यांचा त्रास कमी करणे. द:खी व खिन्न लोकांशी बोलून त्यांचे दुःख निवारण करणे. त्यांच्या मनात आशा निर्माण करणे अशी कामे करीत होता. स्वत:साठी नाही परंतु इतरांच्या सुखासाठी जगला. तो सर्व जगाचा सेवक होता. जे त्याच्या संपर्कात येत होते त्यांच्यासाठी तो अन्न, पाणी होता. त्यांना तो एक नवी आशा देत होता. - गॉस्पल वर्कर्स १८८.ChSMar 145.2

    सत्याचे सादरीकरण हे घराघरांमधून साधेपणाचे व प्रीतिचे असावे. ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना त्यांना प्रथमच सुवार्ता प्रसारासाठी पाठविले तेव्हा ऐक्याची शिकवण दिली. त्यांना नम्रपणाचे धडे दिले. त्याची स्तुती गौरव आणि प्रार्थना व गीते गाऊन देवाचे गौरव करण्याचे शिक्षण दिले. अशाप्रकारे हे ईश्वरी कामगार जगामध्ये पाठविण्यात आले. ख्रिस्त म्हणाला, “मी तुमच्याबरोबर सतत आहे. त्याने तसे वचन दिले. त्याने खात्रीशीर सांगितले की तो त्यांच्यामध्ये राहील. तो धैर्य देणारा व विश्वासु आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:३४.ChSMar 145.3

    घरोघरी काम करण्यासाठी कामगारांची गरज आहे. ज्या लोकांना बायबलविषयी काहीच माहिती नाही अशा लोकांच्या घरी जाऊन देवाची गौरवगीते गाऊन बायबल वाचून प्रार्थना करण्याची मोठी गरज आहे आणि आताच ही वेळ आहे की घरोघरी जाऊन प्रार्थना करणे. “जे मी तुम्हाला सांगितले ते जाऊन त्यांना शिकवा. मी तुम्हाला जे आज्ञापिले ते त्यांना पाळण्यास सांगा.” जे कोणी हे कार्य करील ते बायबलच्या अभ्यासामध्ये तयार असावे’ असे लिहिले आहे. हे तुमचे ........ असावे. हे तुमच्या बचावासाठी असेल. - कॉन्सल्स पेरेंट, टीचर अॅण्ड स्टुडंटस् ५४०. ChSMar 145.4

    माझ्या बंधु-भगिनींनो, तुमच्या शेजारी जे राहतात त्यांना भेटी द्या. कृपेने, दयेने त्यांच्या हृदयाशी बोला. त्यांच्या हृदयामध्ये काय आहे याचा शोध घ्या. त्यांच्या मनातील खोट्या कल्पना काढून टाका आणि लक्षात ठेवा की ज्यांना सत्य ठाऊक असूनही ते आपल्या शेजाऱ्यांना व इतरांना सांगत नाहीत तर त्यांना त्याचा जाब विचारण्यात येईल. त्यांना त्याबद्दल किंमत मोजावी लागेल. ते जर आपल्या मंडळीमध्ये ही जर सांगणार नाहीत, तर त्याविषयी त्यांची झडती घेण्यात येईल. कारण ते देवाशी अविश्वासू राहिले. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:३४. ChSMar 146.1

    या पहिल्या फेरीच्या वेळी शिष्यांना येशू त्याआधी गेला होता आणि त्याने मित्र केले होते त्याच ठिकाणी त्यांनाही जायचे होते. त्यांच्या फेरीच्या प्रवासाची तयारी अगदीच साधी होती. त्यांच्या महान व महत्त्वाच्या कार्यापासून त्यांची मते विचलित करणाऱ्या अगर इतरत्र वळविणाऱ्या किंवा कोणत्याही प्रकारे विरोधला प्रज्वलित करुन कार्याची दारे बंद करणाऱ्या कोणत्याच गोष्टीला वाव देण्यात येणार नव्हता. किंवा ते साध्या सुध्या नम्र ग्रामस्थांपासून कोणीतरी वेगळे आहेत असे दाखविणारा वेषही त्यांनी करायचा नव्हता. कोणत्या धर्मगुरुच्या पोषाखासारखा पोषाख करायचा नव्हता. त्यांनी यहूदी लोकांच्या मंदीरात जाऊन तेथे लोक जमा करुन तेथे सामुदायिक सभा भरवायची नव्हती. तर घरोघरी भेटी घेऊन परिश्रमपूर्वक कार्य करायचे होते. निरर्थक मानसन्मान देण्या-घेण्यात त्यांनी वेळ व्यर्थ घालवायचा नव्हता किंवा फक्त जीव रंजविण्यासाठी घरोघरी जाऊन वेळ वाया जाऊ द्यायचा नव्हता. तथापि ज्या ठिकाणी योग्य लोक असतील आणि जे त्यांचा पाहुणचार करताना जसे काही ते ख्रिस्ताचाच पाहुणचार करीत आहेत अशा भावनेने पाहुणचार करीत असतील अशाच ठिकाणी त्यांना पाहुणचार स्वीकारायचा असतो. “या घरात शांती असो” असे मन प्रसन्न करणारे उद्गार उच्चारुन त्यांनी घरात प्रवेश करायचा होता. त्यांच्या प्रार्थना, उपकार स्तुतीची त्यांची गीते आणि शास्त्र वचनाचा अभ्यास यामुळे त्या घरात कुटुंब आशीर्वादीत व्हावयाचे होते. - डीजायर ऑफ एजेस. ३५१, ३५२.ChSMar 146.2

    तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांना मित्र रुपाने भेट द्या आणि त्यांचे मित्र व्हा. जे कोणी हे कार्य स्वीकारीत नाहीत बेपर्वाईने नाकार देतात, दुर्लक्ष करतात व लवकरच ते आपले पाहिले प्रेम विसरतील. आपल्या भावाचे दोष काढतील. त्याची निंदा करतील आणि त्याला निरुपयोगी ठरवून शिक्षाही करतील. - रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड १३ मे १९०२.ChSMar 147.1

    जाहीर प्रवचन करणे एवढेच प्रषितांचे काम नव्हते त्याद्वारे त्याला सर्वांपर्यंत पोहोचता आले नसते. घरोघरी भेटी घेऊन त्याने आपले काम उरकले. त्याद्वारे परिचित घरगुती संभाषण करण्याची संधी त्याने उपलब्ध करुन घेतली. त्याने आजाऱ्यांना व दुःखीतांना भेटी दिल्या. पीडितांचे सांत्वन केले आणि खिन्न झालेल्यांना प्रोत्साहन दिले. त्याच्या सर्व उक्ति आणि कृतिमध्ये त्याने ख्रिस्ताचा महिमा वर्णिला अशाप्रकारे त्याने अशक्त, भयभीत व अति कंपित होऊन काम केले. १ करिथ २:३. त्याला धाक असे की दिव्य प्रभावाच्या ऐवजी त्याच्या प्रवचनाद्वारे मानवी प्रभाव पडेल. - ॲक्टस ऑफ अपोस्टल. २५०. ChSMar 147.2

    एक दिवस तुम्ही तुमच्या शेजाऱ्याकडे जा त्यांची विचारपूस करा. त्यांना आपुलकी दाखवा आणि तुमच्या उपस्थितीमुळे त्यांच्या हृदयात आनंद निर्माण होईल असे करा. तुमचे नि:स्वार्थी आणि मनमिळावूपणा व नि:स्वार्थीपणा त्यांना समजू द्या. त्यांच्यावर दया दाखवा. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांच्यासाठी चांगले काहीतरी करण्याची संधी शोधा आणि अशाप्रकारे थोडे बहुत लोक एकत्र करा आणि तुम्ही देवाचे वचन त्यांच्या समोर उघडू शकता. त्यांच्या अंधाऱ्या मनामध्ये वचनाचा प्रकाश पडेल अशाकडे लक्ष देत राहा. जे कोणी खरेच देवाला समर्पित झाले आहेत. त्यांना इतर आत्म्यांची कळकळे आहे. त्यांना देवाकडे आणण्याची धडपड ते करतात, कष्ट करतात. देवाच्या धार्मिक अंगणामध्ये तो अंधारातील आत्म्यांना देवाच्या प्रकाशात आणून सोडतो आणि ही संधी तो सोडत नाही. देव स्वत: त्याच्या बरोबर कार्य करीत असतो. म्हणून तुम्ही आपल्या शेजाऱ्याशी बोलण्याकडे दुर्लक्ष करु नका. आणि आपल्याला सामर्थ्याने होता होईल तेवढे चांगले करण्याचे प्रयत्न करा. मग नि:संशय तुम्ही काही आत्मे वाचवू शकता. आपण पवित्र आत्म्याचा शोध घ्यावा म्हणजे संत पौलासारखे घरोघरी लोकांना डोळ्यात पाणी आणून विनवणी करावी की त्यांनी पश्चात्ताप करुन देवाकडे वळावे. देवावरील आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवावा. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड १३ मार्च १८८८.ChSMar 147.3

    आमच्या शहरामध्ये कार्य करण्याचे असल्याची माहिती देवाने माझ्यासमोर मांडली. या शहरातील विश्वासू लोकांनी देवासाठी कार्य करायचे आहे. त्यांच्या घराजवळील शेजाऱ्यांकडे जाऊन त्यांना देवाविषयी सांगावे. शांतपणे व नम्रतेने त्यांच्यासाठी कार्य करायचे आहे. त्यांना स्वर्गीय वातावरणामध्ये घेऊन जायचे आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:१२८.ChSMar 148.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents