Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    रहदारीच्या प्रवासाचे प्रतिनिधीत्व

    जे कोणी धन्याच्या सेवेमध्ये त्याच्या पाचारणाला प्रतिसाद देतात ते त्याच्या पद्धतीचा चांगला अभ्यास करतात. त्याची कार्यपद्धत ती चांगलीच ओळखतात. त्याच्या या जगातील कार्यामध्ये रस्त्यावरील प्रवाशांनासुद्धा बोलण्याची संधी त्याने सोडली नाही. कफर्नहुम रस्त्यावर ही त्याच्या जाण्या येण्याच्या मार्गावर त्याच्या प्रवासामध्येही तारणाऱ्याने आपले कार्य केले आणि ते त्याचे स्वत:चे शहर आहे असे समजून आले. हे शहर तारणाऱ्याच्या कार्याचे मुख्य केंद्र असल्याचे ओळखून आले. राजमार्गापासून दिमस्कस ते यरुशलेम आणि मिसर ते भूमध्ये समुद्र या सर्व भागामधून जातात किंवा प्रवासामध्ये थकले असतील तर या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबतात. या ठिकाणी येशू सर्व राष्ट्र आणि सर्व थरातील लोकांना भेटत असे. सर्व प्रकारचे लोक म्हणजे श्रीमंत, गरीब, दीन, नम्र व उच्चभ्रू अशाप्रकारे ख्रिस्ताचा संदेश या लोकांकरवीच इतर राज्यांमध्येही प्रसरत असेल. भविष्यवाणीचे संशोधन अति उत्साही असते. आपले सर्व लक्ष तारणाऱ्याकडे असावे. त्याच्या कार्याकडे आणि त्याचे अनुकरण करणे जगाला त्याची ओळखत करुन द्यावे हे आपले ध्येय असावे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:१२१. ChSMar 159.1

    जगामध्ये आरोग्य सुधारण्याची अनेक केंद्रे आहेत. अनेक सुप्रसिद्ध ठिकाणे आहेत. प्रवासी ठिकाणे आणि इतर प्रसिद्ध रुग्णालये व प्रसिद्ध आरोग्य केंद्रे अशाप्रकारे हजारो लोक अशी आरोग्यदायी ठिकाणे शोधणारे आहेत. अशा ठिकाणांना भेटी देतात. अशाप्रकारे आनंद व भोगविलास शोधणाऱ्यांची गर्दीच असते. हजारांनी लोक मसाज केंद्रावर गर्दी करतात. अशा लोकांकडे लक्ष देऊन त्यांच्याशी भेट घेण्याची संधी शोधावी आणि त्यांना संदेश द्यावा व संधी मिळाल्यास त्यांची सभा घ्यावी. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याविषयी त्यांना सत्य सांगावे. बाप्तस्मिा करणाऱ्या योहानाने जो संदेश लोकांना सांगितला तो त्यांना सांगायला हवा. “पश्चात्ताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” मतय ३:२. देवाचे वचन हे स्पष्ट आणि सामर्थ्यवान आहे. ज्यांना कान आहेत त्यांनी हे सत्यवचन ऐकावे. ज्यांना ठाऊक नाही त्यांनी हे सत्य वचन ऐकावे. जे ही वचने ऐकतील त्यांना वर्तमानाची परिस्थिती समजेल आणि देवाचे वाचनातील सत्य ऐकून आपापल्या घरी ही वचने घेऊन जातील. जगाच्या कानाकोपऱ्यात देवाची वचने पोहाचतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:१२२.ChSMar 159.2

    “मिनिस्ट्री ऑफ हिलींग आणि ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसनस’ ही दोन पुस्तके प्रामुख्याने हौशी प्रवासी केंद्रावर लिहीली गेली आहेत. अशा या केंद्रावर मसाज केंद्रे चालतात. अशा ठिकाणी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाच्या हातात एक एक प्रत ठेवावी म्हणजे ते फावल्या वेळेमध्ये ते वाचू शकतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:८५.ChSMar 160.1

    विश्रांतीगृह आणि आरोग्य केंद्रे यांची स्थापना होणे आवश्यक आहे. आम्ही आपल्या कार्यामध्ये समुद्र किनारी असणाऱ्या विश्रांतीगृहांचा समावेश करावा. ज्याप्रकारे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा अस्वाद ऐकण्यात आला. “परमेश्वराचे मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा.” तेव्हा परतमेश्वराचा आवाज सर्व विश्रांतीगृह आणि हौशी प्रवासातील समुद्र किनारी असणारी ठिकाणे व अड्डे यावरील सर्व लोकांनी देवाचा संदेश ऐकावा. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:५५,५६.ChSMar 160.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents