Go to full page →

प्रकरण ३० वें - सुखी व यशस्वी भागीदारी CChMara 192

जे कोणी विवाहसंबंधात उतरतात त्यांच्यात संपूर्ण प्रीति व ऐक्य असावे अशी देवाची अधिकारयुक्त योजना आहे. देवाच्या अनुज्ञेप्रमाणे नवरा नवरीने परस्परावर प्रीति करण्याचे अभिवचन स्वर्गीय सृष्टीला साक्ष ठेवून एकमेकांस द्यावे. बायकोने आपल्या नवर्‍यचा आदर करून त्याला सन्मान द्यावा आणि नवर्‍यने तिच्यावर प्रीति करून प्रेमाने तिची काळजी घ्यावी. CChMara 192.1

विवाह जीवनाच्या प्रारंभींच स्त्री-पुरुषानी देवाला आपले जीवन समर्पित करावे. CChMara 192.2

कितीही काळजीपूर्वक आणि सूज्ञबुद्धीन विवाह-घटना केलेली असली तरी विवाह झाल्यावर क्वचितच जोडपी संपूर्णत: ऐक्याने राहातात. लग्न झाल्यावर खर्‍या ऐक्याचे कार्य केक वर्षांच्या अनुभवाने साध्य होतें. CChMara 192.3

नवीन दांपत्यांच्या चरित्रात गोंधळाचे व काळजीचे ओझे वाटू लागले म्हणजे विवाहपूर्वांचे जे काल्पनिक सुखस्वप्न असतें तें नाहीसे होऊ लागते. पूर्वी घडून आलेल्या सवासांत जे कळून येणें अशक्य होतें तें आता नवरा बायको आपल्या शीलसंबंधातून शिकू लागतात. त्यांच्या अनुभवांतील हा मोठा आणीबाणीचा प्रसंग असतो. आताच योग्य तरतूद करावयास पाहिजे. यावरच त्यांच्या भावी जीवनाचें सौख्य व त्याची उपयुक्तता अवलंबून राहिल. परस्परांमध्ये निश्चित असलेला उणेपणा व चुका त्यांना वारंवार दिसून येतात; परंतु प्रेमाने बद्ध झालेल्या अंत:करणांना आजवर दिसून आलें नाहीत असें सद्गुणच त्यांना आढळून येतात. चूक शोधीत बसण्यापेक्षा चांगुलपणाच सर्वांनी शोधीत राहावा. वारंवार असें घडून येते कीं, आमच्या स्वत:च्या मनोवृत्तीवरून व आसपासच्या परिस्थितीवरून दुसर्‍याच्या मनात काय असावे हे आपण ठरवून टाकतों. CChMara 192.4

प्रेमळपणा हा एक प्रकारचा उणेपणाच होय असें पुष्कळांना भासते व आपल्या मूकवृत्तीने तें इरांचा तिरस्कार करतात असल्या मनोविकाराने सहानुभूति खुटून जाते. सामाजिक व उदार भावना जर दडपून ठेवल्या तर त्या सुकून जातात व अंत:करण उदासीन व भावनाशून्य होऊन जाते. असली चूक होऊ नये म्हणून आम्ही सावधगिरी घ्यावी. आपल्या भावना व्यक्त न केल्यास प्रीति फार वेळ जीव धरू शकत नाही. जें अंत:करण तुम्हांशी जडलेले आहे त्याची कृपाळूपणाच्या सहानुभूतीच्या अभावामुळे उपासमार होऊं देऊं नका. CChMara 192.5

बळजबरीनें प्रीति घेण्यापेक्षा ती संतोषाने देण्यांत यावी. आपल्यात जे अति श्रेष्ठ आहे त्याचे संगोपन करा व परस्परात जे सद्गुण नांदतात तें चटकन ओळखून घ्या. गुणग्रहण करणारी न्यायबुद्धि अद्भुत प्रकारे उत्तेजक व समाधानदायी असतें. मोठमोठ्या गोष्टींच्या प्रयत्नांत सहानुभूतीकडून व आदरबुद्धीकडून उत्तेजन प्राप्त होतें आणि थोर उद्देशांसाठी उत्तेजन मिळत असतां प्रीति त्यांत प्रत्यक्षपणे भर टाकीत असते. CChMara 192.6