Go to full page →

दोन जीवनचरित्रांचा मिलाफ CChMara 193

अडचणी, भानगडी व निराशा जरी निर्माण झाल्या तरी त्यावरून आपले हें एकीकरण चकले कीं काय असें नवर्‍यनें अगर बायकोने मनात येऊ देऊ नये अगर निराश होऊन हातपाय गळं देऊ नयेत. एकमेकांसाठी शक्य तें करण्याचा त्यांनी निर्धार करावा. वेळीच याकडे लक्ष पुरविणे. चालूं ठेवा. जीवन-चरित्रांतील लढे जिंकण्यासाठी प्रत्येकाने एकमेकांस हरत-हेचे उत्तेजन देत राहावे. एकमेकांच्या सुखवृद्धीसाठी नजर कायम उघडी ठेवा. परस्परांची प्रीति व परस्परांविषयीची सहनशीलता राखीत चला. तरच मग विवाहाने प्रीतीचा अंत झाला असें वाटण्याऐवजी तिचा जणू काय प्रारंभच झाला असें वाटू लागल, प्रामाणिक मैत्रींतील जिव्हाळा आणि अंतर्यामाला बद्ध करणारी प्रीति ही स्वर्गीय आनंदाचा पूर्व उपभेागच होय. CChMara 193.1

सर्वांनी अंगच्या सहनशीलतेने सहनशीलतेची उभारणी करावी. दयाळू वृत्तीने आणि सहनशीलतेनें निर्भेळ प्रीति ही अंतर्यामी जिव्हाळ्याची होऊन जाते आणि परमेश्वराला पसंत पडतील असें सद्गुण वृद्धि पावतील. CChMara 193.2

वितंडवादाची एखादी बाब उद्भवली कीं सैतान तिचा फायदा घेण्यास सदा तयारच असतो. तक्रारीची बाब हातीं धरून नवरा-बायको कीं जे परमेश्वरासमोर केलेल्या गांभिर्ययुक्त करारामुळे एक झालेले असतात, त्यांच्या शीलांतील परंपरेने आलेल्या खतखोडी पुढे करून त्यांच्यामध्ये तो बुद्धिभ्रम निर्माण करितो. विवाहाच्या शपथविधीमध्ये बायकोने असें अभिवचन दिलेले असतें कीं मी आपल्या नवर्‍यवर प्रीति करून त्याच्या आज्ञेत राहीन; नवयाने असें वचने दिलेले असतें कीं, मी तिच्यावर प्रीति करून तिचा प्रेमाने प्रतिपाळ करीन. देवाच्या अनुज्ञेप्रमाणे राहिले तर त्या कुटुंब-क्षेत्रातून वितुष्टाचे भूत ठेविले जाईल. त्यांत ताटातूट होणार नाहीं आणि त्यांच्या गृहातील प्रेमळपणामध्ये बुद्धिभ्रष्टता शिरणार नाही. CChMara 193.3

आपलीं मनें, आपल्या सहानुभूति, आपली प्रीति आणि आत्म्याचे तारण करण्याचे एकमेकांचे परिश्रम हीं एकत्रित करण्यासाठी हीं उभयता तुम्हांसमोर उभी असतील. हा काळ त्यांच्या चरित्रांत महत्वाचा असतो. विवाहाच्या नातेसंबंधांत एक फार महत्वाचा पाऊल पुढे टाकण्यात आलेल असतो व तो म्हणजे दोघा चरित्राचा मिलाफ होय. देवाच्या कार्यासाठी आणि तें संपूर्णत: व पवित्रेत प्रगत ठेवण्यासाठी नवर्‍यने व बायकोने एकत्र व्हावे, हें ईश्वरी इच्छेचे धोरणच असतें व तें त्यांना करता येण्यासारखे आहे. (तें त्याना साध्य करता येईल.) CChMara 193.4

ज्या गृहात असले ऐक्य नांदते त्या गृहांत ईश्वरी आशीर्वाद स्वर्गीय दिव्य किरणाप्रत झळकत राहील, कारण पवित्र बंधनांत नवर्‍यने व बायकोने एक व्हावे, येशू ख्रिस्ताच्या कह्यांत चालावे आणि त्याच्या आत्म्याचे मार्गदर्शन घ्यावे अशी प्रभूची योजनाच असतें. (अशी प्रभूची ठराविक इच्छा असते.) CChMara 193.5

प्रत्यक्ष स्वर्गीय गृहाचा नमुनाच म्हणून पृथ्वीवर हें गृह अत्यंत सुखाचे स्थळ असावे. असें देवास वाटते. गृहांतील वैवाहिक जबाबदार्‍य वाहिल्याने, आपली मने ख्रिस्ताशी संलग्न ठेविल्यानें, त्याचा हस्त धरून त्याच्यावर विश्वासून राहिल्याने नवरा-बायकोला त्याच्या ऐक्याने प्राप्त होणारे सुख पाहून देवदूतसुद्धा त्यांची स्तुति करितील. (देवदूतसुद्धा त्यांची वाहवा करितील. 1 AH 101-107; CChMara 193.6