Go to full page →

मानवाच्या अन्नासाठी परमेश्वराची मूळयोजना CChMara 296

मानवाच्या पोषणासाठी परमेश्वराची जी मूळ योजना आहे त्यांतून उत्तम कोणती याचा आम्हीं अभ्यास केला पाहिजे. ज्याने आदामासाठीं अन्न नेमून ठेविले होतें. तो सागतो: “पाहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी हरएक वनस्पती.... व फळें देणारा प्रत्येक वृक्ष.... हीं तुमचें अन्न होतील.” (उत्पत्ति १:२९) एदेन बाग सोडल्यावर पापाच्या शापाखाली असतां त्यानें आमच्या पोषणार्थ जमिनीची मशागत करण्यास त्याला सांगितलें व म्हटले, “तू शेतातले पीक रख़ाशील.” (उत्पत्ति ३:१८.) CChMara 296.4

धान्यें, फळें, कठीण कवटीची फळें व भाजीपाला, हेच आमच्या उत्पन्नकत्त्याने आम्हांस दिलेले अन्न होय. साध्या आणि शक्य तितक्या सोप्या रीतीने तयार केलेली हीं अन्न्ने अत्यंत आरोग्यकारक व पोषक अशी आहेत. अधिक कटकटीची व चेतनादायी अन्नांना जे बळ देता येत नाहीं असले सहनतेचे सामर्थ्य आणि बौदिक उत्तेजन हीं या अन्नाला देता येतात. 2MH 295, 296; CChMara 297.1

प्रकृतिमान राखण्याकरितां चांगल्या व शक्तिवर्धक अन्नाची जरुरी असते. CChMara 297.2

जर आम्हीं चतुराईने योजना आखली तर आरोग्याला अत्यंत उपयुक्त असें अन्न आम्हांला बहुतेक प्रत्येक देशात मिळू शकेल. तांदळ गहू निरनिराळी धान्ये व ओट त्याच प्रकारे द्विदल धान्य व डाळी यांचे वेगवेगळे केलेले प्रकार परदेशी पाठविण्यात येतात. स्वदेशची व बाहेरून आलेली फळें आणि स्थानिक शेतांत वाढणाच्या भाज्या ह्यातून मांसाहारी अन्नाव्यतिरिक्त अन्नाची निवड करण्यास चांगला योग दिसून येईल. CChMara 297.3

बेदाणा, मनुके, सफरचंद, सप्ताळ आणि जर्दाळ असलीं सुकी फळें ज्या ज्या ठिकाणं माफक दरात मिळतील. त्याचा करितात त्यापेक्षा अन्नासारखा वापर करण्यांत यावा. ही सर्व प्रकारच्या कामगार लोकांना आरोग्यकारक व शक्तिवर्धक अशीं आढळून येतील. 3MH 299; CChMara 297.4