Go to full page →

पाकशास्त्र CChMara 297

स्वयंपाकाची शास्त्रांत गणना होत नसली तरी व्यवहारातील ती एक अत्यंत उपयुक्त बाब आहे. शास्त्र म्हणून सर्व स्त्रियांना तें शिकविण्यांत यावे व गरीब लोकांना तें फायदेशीर होईल असें तें शिकवावे. भूकसवर्धक, पौष्टिक व सहजकरिता होईल असें अन्न पकविण्याची एक कला आहे वे तो सहज साध्य आहे. आरोग्यकारक व साधे अन्न सहज रितीने कसे बनवावे हें स्वयंपाक करणारीला अवगत असले पाहिजे. त्यातील साधेपणामुळे तें अधिक चवदार व हितकारक होऊन जाईल. 4MH 302, 303; CChMara 297.5

अन्नांत साधेपणा आणण्यासाठी आम्हीं चतुराईने सुधारणा करुं या प्रकृतीच्या प्रगतीसाठी आवश्य लागणारा शक्तिबधक पुरवठा प्रत्येक देशात उत्पन्न होतो. हें एक ईश्वरी सूत्र आहे. यातून आरोग्यकारक व भूक प्रदिप्त करणारा स्वयंपाक करता येईल. 5CD 94; CChMara 297.6

स्वयंपाक करणे हें कांहीं आमचे काम नाही, असें पुष्कळ गृहिणींनी वाटते म्हणून चांगले जेवण करण्याचा प्रयत्न होत नाहीं. चर्बी, लोणी (तूप) अगर मांसाचे प्रकार सोडून दिल्यास जेवण साधे, आरोग्यकारक व सोप्या रितीने करता येईल. साधेपणातच चतुराई असली पाहिजे. यासाठी स्त्रियांनी वाचून अभ्यास करावा व वाचलेले व्यवहारात आणून दाखवावे. 61T 681; CChMara 297.7

फळें अन्नधान्ये, मसाला चर्बी अगर तेलकट द्रव्ये न घालता तयार केलेल्या भाज्या दुधासह व मलईसह घेतल्यास अत्यंत आरोग्यकारक जेवण तयार होतें. 7CH 115; CChMara 297.8

(*पशूची चर्बी, विशेषत: (कढविलेली) कसला तरी स्निग्ध तेलकट व चिकट पदार्थ अशी ग्रीसची व्याख्या करण्यांत आलेली आहे. ई जी. व्हाईटच्या लिखानात जैतुनाच्या तेलाची उपयुक्त अन्न म्हणून मोठी शिफारस केलेली आहे व तें लोणी अगर पशू-चर्बीच्या ठिकाणी अन्नासाठी वापरावे असें म्हटले आहे म्हणजेच स्निग्ध पदार्थ व वनस्पतीजन्य पदार्थ योग्य प्रकारे वापरल्यास तें योग्य असें अन्न होईल.) CChMara 297.9

चर्बीविरहित अन्नधान्यांचे व फळाचे अन्न शक्य तेवढ्या नैसर्गिक स्थितींत तयार केल्यास स्वर्गाकडे जाऊ म्हणणाच्या सर्व लोकासाठी तें खाण्यास योग्य असें होईल. 82T 352; CChMara 298.1

अन्नामध्यें वाजवीपेक्षा अधिक साखर घालण्यात येते. केक, गोड पुडिंग, पेस्ट्रीज, जेली व जॅम हीं अपचनाची नक्की व कारणें असतात. ज्या कस्टर्डस व पुडिंगमध्ये दुध, अंडी व साखर मुख्यत: घातलेली असतात तें तर विशेषत: अपायकारक असतात. साखरेसह दूध पुष्कळसे घेणें टाळण्यात यावे. 9MH 325; CChMara 298.2

अन्न तयार करतांना जितकी कमी साखर वापरण्यांत येईल तितकी उच्यतेच्या दिवसांत कमी उष्णता भासू लागेल. 10. CChMara 298.3

दुधाचा वापर करावयाचा असेल तर तें चागले उकळून घ्यावे. असल्या सावधगिरीने त्यातून होणार्‍य आजाराचा संपर्क कमी होईल. 11. CChMara 298.4

दुधाचा उपयोगच निर्धास्तीचा नाहीं अशी वेळ येण्याचा संभव आहे. परंतु दुभती जनावरे जर निरोगी असतील व दूध चांगले उकळलेले असेल तर त्रासाचा विचार आगाऊच करण्याची गरज नाहीं. 12. CChMara 298.5