Go to full page →

कार्यासाठी तयारी करणे. ChSMar 176

येशूचे अनुयायी देवाच्या इच्छेशी एक होणार नाहीत जर ते त्याच्या वचनाशी संबंधीत नसतील. कारण ते देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष कधीच करु शकत नाहीत. सर्वांनी बायबलचे विद्यार्थी होणे अति आवश्यक आहे. ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना आज्ञा केली “तुम्ही शास्तलेख शोधून पाहता, कारण त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. असे तुम्हाला वाटते आणि तेच माझ्या विषयी साक्ष देणारे आहे.’ परंतु पेत्र उत्तेजित होऊन म्हणतो, पवित्र देव तुमच्या हृदयात आहे आणि सर्वांना उत्तर देण्यासाठी तयार असतो आणि तुमची आशा आणि नम्रपणाचे कारण देतो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च २:६३३, ६३४. ChSMar 176.2

ज्यांचा खरेच पालट झाला आहे त्यांनी अधिक अन् अधिक वचनामध्ये चतुर व अभ्यासक असावे. म्हणजे जे कोणी अंधारात आहेत त्यांच्याकडे प्रकाश घेऊन जाणे व जे पापात आहेत त्यांना त्रासातून बाहेर काढणे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:१२१. ChSMar 176.3

आम्हाला देवाचा शेवटचा निरोप मानवाला द्यायचा आहे. तेव्हा बायबलचा अभ्यास करुन त्यांना शिकविणे हे आपले अति महत्त्वाचे कर्तव्य आहे. आपल्याला त्यांना प्रकाश द्यायचा आहे. प्रत्येक आत्म्याला प्रकाश मिळू द्या आणि त्यांच्याकरवी तो इतरांना विदित होऊ द्या. कामगारांनी घरोघर जाऊन लोकांना वचनाचा प्रकाश द्यावा. त्यांनी बायबल उघडून लोकांना वचनाचे शिक्षण द्यावे आणि त्यांना प्रकाशन वाचण्यासाठी द्यावे आणि त्यांना सांगावे की त्यांना प्रकाश मिळाल्यापासून भरपूर आर्शीवाद मिळाला आहे. - गॉस्पल वर्कर्स ३५३. ChSMar 176.4

कार्याचा योग्य समतोल जो राखला जातो तो बायबल स्कूलमध्ये शिकून तयार होईल. त्याची प्रगती होईल. सार्वजनिक सभा जेव्हा घेतल्या जातील. तेव्हा शिकावू विद्यार्थ्यांना तेव्हा सभा घेण्याचा किंवा शिकविण्याचा अनुभव येईल. शहरातील कामाचाही त्यांना अनुभव येईल. त्यांना खोल आध्यात्मिकतेचा सराव होईल. त्यांना समजून येईल की रोज बायबलचा अभ्यास कोण देऊ शकेल आणि पूर्ण मताने कोण एकत्र येतील आणि सार्वजनिक सभा कोण घेऊ शकतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:१११. ChSMar 177.1