Go to full page →

यशाचे रहस्य ChSMar 177

तुम्ही तुमच्या प्रार्थनेमध्ये उत्सुकता आणि तीव्रता आणा. आणि बायबल वाचनामध्येही तशीच उत्सुकता हवी. वचन इतरांना शिकविण्यामध्ये ही उत्सुकता दाखवावी. वचन जसे पवित्र आहे तसेच ते तुमच्या वागण्यामध्येही असावे याकडे दुर्लक्ष करु नये. त्या सत्यामध्ये तुम्हीही चालावे म्हणजे इतर त्यातील जिवंतपणा पाहतील. तुम्ही येशूसाठी जे काही कराल ते सर्व सामर्थ्याने करा. कळकळीने व आवडीने करा. तुम्हांला एखादा मोठा हुद्दा मिळाला आहे असे मुळीच समजू नका आणि म्हणून उंचीवर जाऊ नका. लोकांना सध्याचे सत्य सांगायचे हे मनात ठसवून ठेवा. हे तुमच्यावर कर्ज आहे असे समजा. बायबलमधील महत्त्वाचे भाग वाचून ठेवा व त्याचे शिक्षण इतरांना द्या व त्यांना बायबलकडे आकर्षित करा. त्यांना महत्त्वाचे भाग वाचून दाखवा व त्यांच्यामध्ये देवाचे आकर्षण निर्माण करो. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड २६ जुलै १८८७. ChSMar 177.2

केवळ बायबल वाचूनच देवाचे महान कार्य करता येते. लोकांसमोर केवळ वाचून दाखवा. देवाचे वचने घरोघरी जाऊन मनुष्यापर्यंत ते पोहोचवा. प्रत्येक मनुष्या समोर देवाच्या वचने घरोघरी जाऊन मनुष्यापर्यंत ते पोहोचवा. प्रत्येक मनुष्यासमोर देवाच्या योजना ठेवा. तारणाऱ्याच्या सर्व आज्ञा त्यांच्यासमोर सादर करा. “शास्त्र शोधून पाहा.” त्यांना बायबल घेण्याची ताकीद करा आणि ते वाचण्याची विनवणी करा. मग त्यांना ईश्वरी प्रकाश दिसे. त्यांनी त्या प्रकाशाचे प्रत्येक किरण आनंदाने स्वीकारावे. परिणामकारक त्यामध्ये राहावे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:३८८. ChSMar 177.3