Go to full page →

दुजाभावा विना प्रसिद्धी ChSMar 189

अनेक ठिकाणी अशी आहेत जेथे सुवार्तेचा शब्द ऐकला नाही. केवळ प्रकाशने पोहोचली आहेत आणि काही ठिकाणी तीही नाहीत. आमच्या प्रकाशनामध्ये पुस्तके, मासिके, पत्रिका या सर्वांमध्ये बायबलमधील सत्ये भरली आहेत. यांचा लोकांना गरज आहे. आमच्या साहित्याचे वितरण सर्वत्र होणे अति आवश्यक आहे. ही सत्ये पाण्याच्या कडेला पेरणे आवश्यक आहे. आपल्याला ठाऊक नसेल की कोणत्या क्षणी जास्त पिक घेता येईल. आपली चूक असेल की गैरसमज होईल ज्या ठिकाणी आपण साहित्याचे वाटप केले त्या ठिकाणी कदाचित काहीच हाती लागणार नाही, परंतु जेथे अविश्वासने दिले तेथेच जास्त प्रमाणात आत्मे मिळतील. कारण त्यांनी विश्वासाने सत्य स्वीकारले असेल. आपण कल्पनाही करु शकणार नाही की जेथून काही मिळण्याची अपेक्षा आपण करु शकत नाही तेथूनच सत्य वचनाचा स्वीकार करण्यात येईल. - द सदर्न वॉचमन ५ जानेवारी १९०४. ChSMar 189.1