Go to full page →

प्रत्येक तुकड्यामध्ये खजिना ChSMar 189

पाच भाकरी आणि दोन मासे हे पाच हजारांना पोट भरण्या इतके तृप्त करतात. हा चमत्कार ख्रिस्ताकडून येणाऱ्या अन्न पुरवठ्यामुळे केला जातो. अशाचप्रकारे आपणाकडून ख्रिस्ती साहित्याचे वितरण जे लाखो लोकापर्यंत पोहोचले जाते ते आशीवादित होऊन अनेक आत्मे देवाकडे येऊ शकतात. ख्रिस्ताच्या मार्गदर्शनामुळे त्याच्या शिष्यांनी सर्व जगभरात राज्याची सुवार्ता गाजविली. त्यामुळे अनेक आत्मे ख्रिस्ताच्या राज्यात आले. कोणाचाही नाश होऊ नये अशी देवाची इच्छा आहे. तसे यावेळीही सुवार्तेच्या प्रत्येक तुकड्यानीशी अनेक आत्मे देवाच्या राज्यामध्ये येऊ शकतात. एवढेच नाही परंतु देवाच्या वचनाच्या तुकड्याने सुद्धा सध्य युगातील प्रकाश लोकापर्यंत पुरविला जाऊन तिसऱ्या देवदूताच्या संदेशाने अनेक आत्मे देवाच्या राज्यात येऊ शकतात. जे सत्यशोधक आहे त्यांना सुवार्तेच्या पेपराचा एक तुकडाही पुरेसा आहे की त्यांचा देवाच्या राज्यामध्ये समावेश होऊ शकतो. - सदर्न वॉचमन ५ जानेवारी १९०४. ChSMar 189.2