Go to full page →

आधुनिक नेहम्याला पाचारण ChSMar 215

आज मंडळीमध्ये नेहम्याची गरज आहे. जे लोक केवळ प्रार्थना आणि भाषण करणारेच नसावेत, परंतु त्यांच्या प्रार्थना व भाषणे प्रभावी अर्थभरीत असाव्यात त्यामध्ये उत्सुकता आणि ठामपणा असावा. इब्री देशभक्ति प्रमाणे याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे तरच देवाच्या योजना यशस्वी होऊ शकतात. जे पुढारी आणि अधिकारी जे मंडळीला मार्गदर्शन करतात त्यांना अजूनही या गोष्टींचा अंगिकार करावा आणि अशाप्रकारच्या ते योजना तयार करतात त्यांनी त्या मंडळीपुढे सादर कराव्यात. त्या अशाप्रकारे सादर करण्यात की मंडळीने प्रभावित होऊन त्यांना तशाप्रकारे सहकार्य करुन त्यामध्ये आपी आत्मियता दाखवावी. लोकांनी ही योजना समजून घ्यावी आणि लोकांना सांगावी व आपल्या कामामध्ये अंमलात आणावी. यामुळे त्यांच्या कार्यामध्ये वापर होऊन कार्याची प्रगती होईल. नेहम्याच्या कष्टाने, प्रार्थनेने, विश्वासाने आणि चातुर्याने त्याला यश प्राप्ती झाली. त्याचे उत्साही कार्यरत सामर्थ्य या सर्वांमुळे त्याचे कार्य यशस्वीपणे पूर्ण झाले. जिवंत विश्वासाची प्रगती आणि सामर्थ्यशाली कार्यामुळे हे होऊ शकले. आत्मा अधिकाऱ्यांना जे प्रगट करतो ते महान प्रगत कार्य असते. लोकांवर ते प्रतिबिंबित होते, जर अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य समजले तर त्याचे महत्त्व आणि सत्य कळाले तर यावेळी जगाला त्याची चव द्यावी. लोकांमध्ये जर उत्साह व आवेश प्रगट झाला नाहीतर देवाच्या दिवशी त्याच्यासमोर उभे राहण्याची तयारी नसणार. कारण जग हे निष्काळजी, अविचारी आणि आपल्याच आनंदावर प्रीति करणारे असणार अशी अपेक्षा असणार. - द सदर्न वॉचमन २९ मार्च १९०४. ChSMar 215.1