Go to full page →

अध्याय १६ : मंडळी विस्तारीत चळवळीमध्ये ईश्वरी योजना ChSMar 216

देवाच्या लोकांनी एकाच ठिकाणी वसाहत करावी किंवा मोठ्या समाजामध्ये राहावे असा देवाचा हेतू नव्हता. येशूचे शिष्य या जगामध्ये त्याचे प्रतिनिधी होते आणि देवाने आपल्या योजनेप्रमाणे त्यांना जगभर सर्व देश, शहरे, नगर आणि खेडी या सर्व अंधाऱ्या ठिकाणी पसरविले हाते. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ८:२४४. ChSMar 216.1

वसाहतीची योजना किंवा वेगवेगळ्या स्थानातून दुसरीकडे जेथे थोडे सामर्थ्य किंवा एकाच ठिकाणी जर दैवी सामर्थ्य असेल तर त्या ठिकाणी कार्य करणे सोपे जाईल. अशा प्रकारे ठिकठिकाणी देवाच प्रकाश चमकत जाईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च २:६३३. ChSMar 216.2

ख्रिस्ताची मंडळी जर देवाचा हेतू साध्य करीत असेल तर जे अंधारामध्ये आहेत, ज्यांच्यावर मृत्युची सावली आहे त्यांच्यावर देवाचा प्रकाश चमकेल. सर्वांनी एकत्र जमण्याऐवजी वधस्तंभ घेऊन मंडळीच्या सर्व सभासदांनी सर्व भूमीवर पसरावे व ख्रिस्ताचा प्रकाश पसरावा कारण एकत्र राहिल्याने जबाबदारी टाळण्याची शक्यता असते. आत्म्यांच्या तारणासाठी ख्रिस्ताने जे केले, “देवाच्या राज्यासाठी त्यांनी कार्य करावे. अशाप्रकारे राज्याची सुवार्ता लवकरच वेगाने जगभर पसरेल. - आशीर्वादाच्या पहाडावरील विचारधारा ४२, ४३. ChSMar 216.3

बंधू आणि भगिनींनो, मंडळीमध्येच का घुटमळता ? हरवलेल्या मेंढराचा दाखला वाचा आणि खऱ्या मेंढपाळा सारखे बाहेर पडा. पापाच्या रानामध्ये हरवलेल्या मेंढरांचा शोध घ्या. नाशाकडे जाणाऱ्यांची सुटका करा. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड, १२ डिसेंबर १८९३. ChSMar 216.4

आपल्या मंडळीतील सामान्य सभासद जे देवाचे कार्य करतात ते एक दुर्लभ हितच असते. केवळ जगिक लाभासाठी नव्या ठिकाणी कोणी जाऊ नये, परंतु जेथे संधी आहे तेथे नक्कीच जावे. जेथे एक किंवा दोन कुटुंब आहेत तेथे जावे. जी कुटुंबे उपजिवीकेसाठी योग्य आहेत ती मिशनरी कार्य व्यवस्थित करतील. आत्म्यांसाठी ते कार्य करतील ते आत्म्यांवर प्रीति करतील आणि त्यांच्या ओझ्याची जाणीव असेल. तर त्यांनी हे आत्मे सत्यामध्ये कसे आणायचे याचा त्यांनी अभ्यास करावा. आपल्या प्रकाशन साहित्याचे वितरण या लोकांना करावे. ChSMar 216.5

हेतू पूर्ण केला नाही. कारण त्यांनी त्या प्रदेशाचा ताबा घेतला. विजय मिळविल्यावर त्यांनी केवळ विजयाचाच आनंद उपभोगला. त्यांचा अविश्वास आणि सौख्य समाधानाचे प्रेम यामुळे नवीन प्रदेशाकडे वाटचाल करुन तो जिंकण्याचा ऐवजी जे मिळाले त्यामध्येच त्यांनी समाधान मानले व आनंद उपभोगला. अशाप्रकारे ते देवापासून दूर गेले. त्यांचे पतन झाल्यामुळे देवाला त्याचा हेतु पूर्ण करणे अवघड होऊन बसले. त्यांना आशीर्वाद देण्याचे त्याचे वचन अशक्य होऊन बसले. आजची मंडळी अशीच वागत नाही का ? त्यांच्यासमोर सर्व जग आहे की ते सुवार्ता ऐकण्यासाठी तयार आहेत. देवाचे तज्ञ ख्रिस्ती लोक ते स्वत: बाहेर जाऊन देवाची सुवार्ता सांगून त्याच्या कार्याचा आनंद उपभोगू शकतात. कारण त्यांना ती संधी आहे. नवीन प्रदेश ताब्यात घेण्याची त्यांना गरज वाटत नाही. तिकडे जाऊन तारणाचा संदेश लोकांना देऊन ख्रिस्ताचे कार्य पूर्ण करण्याला ते नाकार देतात. “सर्व जगात जा व राज्याचीही सुवार्ता सर्व लोकांना सांगा.” यहूदी लोकांपेक्षा आताचे लोक कमी अपराधी आहेत काय ? - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ८:११९. ChSMar 217.1