Go to full page →

अध्याय २१ : होम मिशनरी ट्रेनिंग सेंटर ChSMar 241

मुलाची पहिली शाळा म्हणजे त्याचे घर आणि येथेच त्याचा पाया घातला जातो. त्याच्या जीवनातील सेवेची सुरुवात तेथेच होते. ChSMar 241.1

- द मिनिस्ट्री ऑफ हीलींग ४००. ChSMar 241.2

तुमच्या जीवनातील पहिला मोठा व्यवसाय म्हणजे कुटुंबातील मिशनरी कार्य. ChSMar 241.3

- टेस्टिमोनिज फॉर द चर्च ४:१३८. ChSMar 241.4

मानवतेची सुधारणा कुटूंबामधूनच होते. प्रत्येक कार्यामध्ये आईवडिलांचा हात असतो. समाज चांगला राहण्यासाची मंडळीची गरज आहे. राष्ट्राची प्रगती होण्यासाठी कुटूंब व्यवस्था चांगली पाहिजे. ChSMar 241.5

- मिनिस्ट्री ऑफ हीलींग ३४९. ChSMar 241.6

मुलांना सुरुवातीपासूनच मदत करण्याचे शिकविले पाहिजे. मुले चालतात, फिरतात, पाहतात व विचार करतात तसे त्यांच्या शक्तिचा विकास होतो. त्याला घरातील कामे सांगावित. आई वडीलांना सहाय्य करण्याची कामे द्यावीत. स्वतःची कामे स्वतः करावीत व स्वतःवर नियंत्रण करावे. स्वतःऐवजी इतरांना आनंद द्यावा. भाऊ व बहिणीला खेळण्यास मदत करावी. वृद्धांच्या आजारपणात त्यांची शुश्रुषा करावी. मुलांमध्ये अशा चांगल्या गोष्टींचा विकास करावा. अशाप्रकारे मुलांना स्वतःचा त्याग करून इतरांची सेवा करण्यामध्ये आनंद मानावा असे शिक्षण त्यांना कुटुंबातून द्यावे. ChSMar 241.7

- मिनिस्ट्री ऑफ हीलिंग ४०१. ChSMar 241.8

आई वडिलांनी हे विसरू नये की त्यांच्या कुटूंबामध्ये एक महान मिशनरी कार्य आहे. आपल्या मुलांचा विकास कसा व्हावा आणि देवाच्या कार्यामध्ये त्यांना कसे सहाय्य करावे हे मातेने जाणले पाहिजे. देव म्हणतो हा मुलगा ही मुलगी घे आणि त्यांना माझ्यासाठी तयार कर. त्यांचे गुण असे तयार करा की राजवाड्यातील मुलांसारखे त्यांनी अनुकरण करावे. म्हणजे ती देवाच्या अंगणात चमकतील. देवाचा प्रकाश त्याच्या आसनावरून त्यांच्यावर येईल. याशिवाय त्यांच्या आईचा देवावरील विश्वासामुळे ती आपल्या मुलांना तिच्या पात्रतेप्रमाणे देवाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करते. ChSMar 241.9

- टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:३७. ChSMar 241.10

ख्रिस्तासाठी असणारे आपले कार्य कुटुंबापासून सुरु होते, घरातून सुरु होते. मिशनरी कार्य या ठिकाणापेक्षा मोठे नाही. आज्ञा आणि उदाहरणाचा वापर करून मुलांचे शिक्षण पूर्ण करतात. मुलांना असे शिक्षण घ्यावे की त्यांच्यामध्ये लहानथोर व सर्व वर्गातील लोकांबद्दल दया असावी. गरीब त्रासलेले आणि आजारी लोकांना सहाय्य करण्याची तयारी असावी. मिशनरी कार्यामध्ये या या मुलांनी मेहनती असावे. ही सवय त्यांना बालपणापासून लावणे आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये स्वप्नकार आणि समर्पण असावे यांचा इतरांना उपयोग होईल. आणि ख्रिस्ताच्या कार्यामध्ये प्रगती होईल. कदाचिते ते देवाबरोबर कार्य करतील. ChSMar 242.1

- टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:४८९. ChSMar 242.2

आपल्या घरच्या लोकांनी कार्याचा योग्य क्रम लावावा. आणि कुटुंबातील सर्वांनी त्यावर मेहनत करून मिशनरी कार्यासाठी कष्टाने काम करावे. आपल्या मुलांनी इतर मुलांना सहाय्य करण्यासाठी स्वतःला गुंतवून ठेवावे याकडे लक्ष द्यावे. त्यांच्यामधून ख्रिस्ताची प्रीति दिसावी असे त्यांचे गुण दिसावेत. ChSMar 242.3

- द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड ४ जुलै १८९३. ChSMar 242.4