Go to full page →

देवदूतांची नोंदणी ChSMar 242

जर विवाहीत लोक कामाला जातात आपली मुले व पत्नी एकटे सोडून तेव्हा पत्नी व आई मुलांची काळजी घेतात तर घरातील स्त्रियासुद्धा पुरुष सारखेच मुलांचा सांभाळ करण्याचे महत्वाचे कार्य करीत असतात. एक जरी मिशनरी कार्यासाठी बाहेर असतात तर दुसरे मिशनरीही घरामध्ये महत्वाचे मिशनरी काम करतात. कारण पती बाहेर मिशनरी कार्यासाठी बाहेर गेल्यावर पत्नी घरामध्ये मुलांचे संगोपन करणे त्यांना योग्य वळण लावण्याचे कार्य करतात. पती आणि पित्यापेक्षाही घरी असणाऱ्या मातांची फार मोठी जबाबदारी असते त्या आपल्या मुलांना योग्य व व्यवस्थित वळण लावतात. तिचे ते कार्य पवित्र व महत्वाचे असते. त्या आपल्या मुलांच्या बुद्धीला योग्या साचात बसवून त्याप्रमाणे तयार करतात. त्यांचे भविष्य उज्वल आणि समाजाला उपयुक्त बनविण्यासाठी तशाप्रकारचे शिक्षण देते. त्या त्यांचे जीवन धार्मिकतेचे आणि समाज कल्याणासाठी योग्य असेच करते. पति समाजामध्ये व लोकांकडे जाऊन आत्म्यांचे परिवर्तन करून सन्मान मिळवू शकतात. परंतु मातांना घरामध्ये कितीही चांगले कार्य केले तरीही तिची वाहवा होत नाही की नाव होत नाही. परंतु ती मुलांना योग्य वळण लावून योग्य साच्यामध्ये तयार करते. ती अगदी मन लाऊन आपल्या कुटुंबासाठी काम करते. कसलीही अपेक्षा न ठेवता सुखी कुटुंब हेच तिचे समाधान. स्वर्गामध्ये देवदूत त्यांच्या नोंदणी पुस्तकामध्ये एक उत्तम मिशनरी कार्यकर्ती म्हणून या मातांची नावे लिहितात. देव केवळ पुरुषाचेच कार्य अतिउत्तम असल्याचे पाहत नाही. ChSMar 242.5

- टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:५९४. ChSMar 243.1