Go to full page →

सातत्य ChSMar 268

खरे ख्रिस्ती कार्य प्रेरणेने नव्हे तर तत्त्वाने, दिवसगणिक किंवा काही महिने नव्हे तर संपूर्ण जीवनभर असते. - कौन्सल्स टु पेरन्टस् टिचर्स अॅन्ड स्टूडन्स् - ५१८. ChSMar 268.1

आपला रक्षणकर्ता हा अथक काम करीतआहे. तो त्याचे कार्य घड्याळाच्या काट्यावर मोजत नाही. त्याची वेळ, त्याचे हृदय, त्याचे बळ, मानवतेच्या कल्याणासाठी कामकऱ्याच्या हाती देण्यात आलेले आहेत. सर्व दिवस या श्रमाकरिता अर्पण केलेले सर्व रात्री प्रार्थनेमध्ये घालवले आहे. कारण त्याला सैतानाशी आणि त्याच्या भ्रामक कार्याशी दोन हात करावयाचे आहेत व मानसीय उन्नती व मानवते पुनर्स्थापित करण्याच्या कार्यासाठी बळकटी आणावयाची आहे. जो परमेश्वरावर प्रेम करतो तो आठ तासाच्या कार्यकाळ प्रणाली नूसार त्याच्या कार्याचे मुल्यमापन करत नाही. तो सर्वकाळ कार्यमग्न असतो. तो सुट्टी घेत नाही. संधी मिळताच तो सर्व क्षेम कार्य करतो. सर्वकाळ व सर्व ठिकाणी. तो परमेश्वराच्या कार्यासाठी संधी शोधतो. तो जेथे जातो आपल्या कार्याचा सुगंध पसरवितो. TFTC - ९:४५. ChSMar 268.2

जो आपल्या बेसावध कृतिने परमेश्वराच्या कार्याची नींदा करतो ना आपल्या सहकाऱ्यांना दुर्बळ बनवितो. तो आपल्या चारित्र्यावर सहजी न पूसला जाणारा डाग लावून घेतो आणि त्याच्या भावी उपयोगीत्वावर अडखळण लावतो. - प्रोफेटस् अॅन्ड किंग्ज ६५९. ChSMar 268.3

‘तुम्ही माझे जू आपल्यावर घ्या’ असे येशु म्हणतो. जू हे कार्याचे साधन आहे. गुरांना क्षमासाठी जू लावतात ते अशासाठी की त्यांनी परिणामपूर्वक कामकरावे. या स्पष्टिकरणातून ख्रिस्त आपणास शिकवितो की आपण त्याच्या कार्यासाठी सर्वकाळचे कामकरी व्हावे. आपण आपल्यावर त्याचे जू घेवू यात जेणेकरुन आपण त्याचे सहकर्मी बनू. - द डिझायर ऑफ एजेस ३२९. ChSMar 268.4