Go to full page →

रणनिती ChSMar 267

ज्यांनी स्वत:ला परमेश्वराला समर्पण केले आहे. प्रार्थनायुक्त प्रामाणिकपणे व पवित्र रणनितीने कार्यारंभ करावा. - द सायन्स ऑफ द टाईम्स - मे २९, १८९३. ChSMar 267.2

जर, माणसाकडे योग्य रणनिती, मेहनत व उत्साह असेल तर तो ऐहिक गोष्टीवर मात करेल आणि हेच गुण जे परमेश्वराच्या पवित्र कार्यास गरजेचे आहेत अगदी अनेक पटीत कार्यक्षम बनवितील कारण दैवी शक्ति, मानवी प्रयत्नांशी जोडली जाईल. TFTC - ५:२७६. ChSMar 267.3

आत्मे जिंकण्यासाठी, पवित रणनिती व शहाणपण गरजेचं आहे. आपल्या तारणकर्त्याने ‘सत्य’ केव्हाच दडपले नाही तर नेहमीच प्रीतियुक्ततेने ते सांगितले. त्याच्या इतरांशी असलेल्या परस्पर संबंधातून त्याने पवित्र रणनितीचा अभ्यास केला. कारण तो नेहमीच दयाळु व विवेकी आहे. तो उद्दाम नव्हता. कारणाशिवाय त्याने तीव्र शब्द वापरले नाहीत, भावना प्रधान मनाला अकारण दुःख दिले नाही. मानवी अशक्तपणाचा कधी धिक्कार केला नाही. दांभिकपणा, अविश्वासू, अधर्म यांचा निर्भीडपणे धिक्कार केला. तो कठोर फटकारासह बोलला. त्याने ‘सत्य’ क्रूर, विभत्स केले नाही. त्या उलट मानवते विषयी कोमलता व्यक्त केली. प्रत्येक आत्मा त्याच्यासाठी मौल्यवान आहे. दैवी गौरवात त्याने स्वत:ला दृष्य केले. तरीही मेडळीतील प्रत्येकासाठी तो सहानुभूतिपूर्वक नम्र झाला. ज्यांचे तारण व्हावे अशी त्याची इच्छा होती त्याकडे त्याने लक्ष दिले. - गॉस्पल विज्डम - ११७. ChSMar 267.4

काही अविचारी व आवेषी परंतु प्रामाणिक लोक (आत्मे) प्रवचनानंतर, जे आपल्याला सहमत नाहीत त्यांना अचानक दठावतात आणि जे ‘सत’ त्यांनी स्विकारावे असे आपल्याला वाटते ते त्याचा तिरस्कार करु लागतात. “या जगाची लेकर त्यांच्या वंशामधले, प्रकाशाच्या लेकरापेक्षा ज्ञानी आहेत.” व्यापारी व राजकारणी सभ्यता, शिष्टाचारचा अभ्यास करतात. नेव्हड म्हणून आकर्षक दिसता येईल हेच त्याचे धोरण असत. लोकांवर जास्तीत जास्त प्रभाव पडण्यासाठी ते भाषण शैली व शिष्टाचार याचा अभ्यास करतात. ध्येय साध्य करण्यासाठी ते त्याच्या ज्ञानाचा व क्षमतेचा कौशल्याने उपयोग करतात. TFTC - ९:२४३. ChSMar 267.5