Go to full page →

अभिषेक ChSMar 272

परमेश्वराच्या कार्यासाठीचे पावित्र्य संपूर्णतेमध्ये आहे. ख्रिस्ती जीवनाची हीच एक अट आहे. काही हातचे न ठेवता समग्र त्याला द्यावे असे त्याची इच्छा असते. म्हणजेच अखंड सेवा. ‘हृदय, मन, आत्मा व बळ ! हे सर्व त्याच्या कार्यासाठी हवे आहे. येथे मीपणा प्रेमाने जपला जात नाही. जो स्वत:साठी जगतो तो ख्रिस्ती नव्हे. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स ४८, ४९. ChSMar 272.1

ज्यांना परमेश्वरासोबत काम करावयाचे आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ‘स्व’ ला फाटा देणे जेणेकरुन ते ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्त्वाशी समरुप होतील. हे अद्ययावत ज्ञानसंस्थाच्या शिक्षणातून साध्य होत नाही. हे फक्त एकाच दिव्य गुरु तर्फे मिळणारे शहाणपणाचे फळ आहे. - द डिझायर ऑफ एजेस २४९, २५०. ChSMar 272.2

असा कोणताच ठोस पुरावा नाही की एखादा मनुष्य खरा ख्रिस्ती आहे. कारण तो असा ..... परिस्थितीमध्ये ही आत्मिक परमानंद व्यक्त करतो म्हणून. पावित्र्य म्हणजे परमानंद नव्हे तर संपूर्णतः परमेश्वराला शरण जाणे होय. परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दास जागणे तसेच आपल्या स्वर्गिय पित्याच्या इच्छेप्रमाणे कर्म करणे, म्हणजे ‘पावित्र्य’ आहे. अपयशात ही त्याच्या वरचा विश्वास, अंधार वा प्रकाश ह्या दोन्हीतही त्यावरचा विश्वास हे विश्वासाने केलेले मार्गक्रमण आहे, दृष्टिने नव्हे. कोणतीही शंका न घेता विश्वासाने त्याच्यावर अवलंबून राहणे आणि त्याच्या प्रितीमध्ये विश्रांती घेणे... हे सर्व म्हणजे पावित्र्य ! - द अॅक्टस् ऑफ ऑपोस्टल्स - ३१. ChSMar 272.3