Go to full page →

हिस्सेदारी ChSMar 278

जो पावेतो तारणारा आपल्यामध्ये होता त्याने गरीबांच्या दुःखात भागीदारी केली. त्याला अनुभवानुसार त्यांच्या कष्टाची जाणीव होती आणि तो त्या नम्र कामकऱ्यांचे सांत्वन करुन त्यांना धीर देत असे. ज्यांना त्याच्या जीवनातील शिकवणीची खरी जाण आहे. त्यांना गरीब, श्रीमंत असा भेद करण्यास काहीच स्वारस्य नव्हते आणि ते असे ही मानत नव्हते की गरीबापेक्षा श्रीमंत प्रथम सन्मानित होतील. - द डिझायर ऑफ एजेस - ७३. ChSMar 278.4

जेव्हा तुम्ही दुर्बल व अनाकर्षक त्यांना नजरेआड करता, तेव्हा तुमच्या लक्षात येते का की ज्यासाठी ख्रिस्त प्रयत्न करीत आहे त्यांनाच तुम्ही नाकारत आहात ? ज्यावेळी तुम्ही त्यांना नजरेआड करीत असता, न जाणो तेव्हा त्यांना तुमच्या सहानुभूतिची अत्यंत गरज असेल. प्रत्येक मंडळीमध्ये प्रत्येक उपासनेमध्ये अशा प्रकारचे आत्मे सौख्य व शांतीच्या प्रतिक्षेत असतात. वरवर पाहता ते फार बिनधास्त आयुष्य जगत असतील, परंतु पवित्र आत्म्याच्या प्रभावा संबंधी ते अगदीच अनभिज्ञ नसतील. त्या पैकी कित्येक आत्मे आपण ख्रिस्त करिता जिंकु शकतो. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स १९१. ChSMar 278.5

सुवार्ता प्रसाराच आमंत्रण सिमीत ठेवू नका आणि फक्त मोजक्यांनाच ज्याबद्दल तुम्हाला खात्री आहे ! संदेश संर्वांसाठी द्यावा. जन जाणो कोण आपले हृदय सुवार्तेस होकार देईल. ख्रिस्त लगेच त्यांना मार्गदर्शन करेन. - द डिझायर ऑफ एजेस १९४. ChSMar 279.1