Go to full page →

काळजी-मुक्ति ChSMar 280

असंस्कृत कामकऱ्यामुळे चूका होतात, कार्य बिघडते. कदाचित हे वाचून तुम्हाला फार वाईट वाटेल, परंतु काळजी करु नका. कारण सर्व कार्य हे आपला परमेश्वर, गुरु याच्या देखरेखीखाली होत असते. त्याला फक्त हे हवे आहे की आपण परमेश्वराकडे त्याच्या आज्ञा जाणून घेण्यास व मार्गदर्शन घेण्यास जावे. प्रत्येकाने... मंडळीने, शब्बाथ शाळेने संस्थानी, या सर्वांनी त्याने सांगितल्या प्रमाणे कार्य करावे. मग काळजी कशाची ? प्रभूच्या इच्छेनुसार मंडळी कशी प्रकाशीत असते हे परमेश्वरांवरील पूर्ण विश्वासाने जाणावे. - द रिव्ह्यू अॅन्ड हेरॉल्ड - नोव्हेंबर १४, १८९३. ChSMar 280.2

आपली हृदय परमेश्वराकडे सोपवा व निर्धास्त रहा. त्याच्यावरील विश्वासा योग्य तो सर्व ठिक करेल. त्याचा पवित्र वेदिसमोर आपले रडणे व तक्रार करणे त्याला आवडत नाही. प्रभूचा धन्यवाद करण्यासाठी आपल्याकडे पुष्कळ काही आहे. जरी तुम्ही एखाद्या आत्मा जिंकू शकला नाहीत तरीही. तुमच्या हृदयात त्याची असीम शांती असू द्यात. तुमची चांगली कृत्ये अशीच वाढत जातील जर तुम्ही पुढे मार्गक्रमण कराल आणि तुम्ही स्वत:च डोक वापरुन काही तडजोड करणार नाही तर. परमेश्वराला आपले हृदय सोपवा व नेहमी कृतज्ञ रहा. त्याच्या कार्याला वाव द्या. त्याच्या मार्गात खोडे घालू नका. आपण तसे केले तर प्रभू निश्चितच कार्य करु शकतो व करेलही. TFTC - ९:१३६. ChSMar 280.3