Go to full page →

निकाल परमेश्वरावर सोपवणे ChSMar 303

अकार्यशील, स्वार्थी, ऐहिक हृदयात चांगले बीज काही काळ दूर्लक्षित असते, ज्याच्या रुजन्याचा काहीही पूरावानसतो, परंतु परमेश्वर त्या हृदयावर फुकर घालतो आणि ते अंकुरते. मोठे होते व परमेश्वराच्या स्तुति करिता फळ देते आपल्या आयुष्यात, आपल्या हृदयात अशी अनेक बिजे आहेत त्यातले कोणते फळ देणारे, कोणते नाही हे आपणास ठावूक नाही. आपल्याला याच्याशी काहीही देणेघेणे नाही. आपल्याला सोपवलेले कार्य आपण करत रहावयाचे आहे, त्याचा निष्कर्ष परमेश्वरावर सोपवावा, “पहाटे तुझे बी पेर आणि सायंकाळीही आपला हात आवरु नकोस.’ कारण परमेश्वराचा पवित्र करार सांगतो की जो पर्यंत पृथ्वी अस्तित्वात आहे तो पर्यंत पेरणी व हंगाम कधीच नष्ट होणार नाहीत व या वचनाद्वारे विश्वासाने कामकरी पेरणी, मशागत करणे आणि त्याच विश्वासाने आपण आध्यात्मिक बिजारोपण करतो. त्याने आपल्याला भरोसा दिला आहे तो म्हणतो “माझ्या मुखातून बाहेर पडलेले वचन रिकामे कधीच परत येणार नाही’ मात्र मला जस हवं तसे ते परिपूर्ण होईल आणि जेथे कोठे मी ते पाठवेन तेथे ते भरभराटीने वाढेल. जो हे बीज घेवून विलाप करीत पुढे जाईल तो सचितपणे आणि आनंदाने परत येईल. स्वत:बरोबर भरपूर उपज घेवून. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स - ६५. ChSMar 303.2