Go to full page →

आध्यात्मिक सामर्थ्य अंधूक होत आहे ChSMar 57

केवळ जगामध्येच देवाच्या कार्याकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम दिसूनल येणार नाहीत. या दुर्लक्षपणामुळे जगातील मंडळ्यांमध्ये निस्तेजपणा आला आहे. यामुळे मंडळीमध्ये पावित्र्यपणा राहिला नाही. आणि सभासदांमध्ये देवाचे कार्य करण्यासाठी कोणी तयार होत नाही. मंडळ्यांमध्ये गुणदोष आणि कडवटपणाचे आत्मे उतरले आहेत. अनेकां मधील निर्णय घेण्याचे सामर्थ्य ही निस्तेज झाले आहेत. या कारणामुळेच ख्रिस्तात येण्याची संख्या रोडावली आहे आणि ख्रिस्ताचे मोठे नुकसान झाले आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:२९७. ChSMar 57.2

आपल्या लोकांची अवस्थे विषयी विचार मनात आल्यास माझे मन अति दुःखी होते. देवाने आमच्यासाठी स्वर्ग बंद केला नाही, परंतु आम्ही स्वत: असा शाप ओढवून घेतला आहे की देवापासून आम्ही वेगळे झालो आहोत. गर्व, लोभ व जगीक प्रेम हे आम्ही आमच्या हृदयामध्ये वागवित आहोत. तेही देवाची भीती न बाळगता. भयंकर आणि मगरुर पाप आमच्यामध्ये वास करीत आहे. आणि तरीही सर्वसामान्य मत असे आहे की आमची मंडळी भरभराटीची आहे, आमच्या मंडळीमध्ये सर्व काही ठीक आहे. आध्यात्मिक वाढ आहे. मंडळी ही ख्रिस्ताचे अनुकरण करण्यापासून मागे वळली आहे. मंडळीचे अधिकारी मिसरी लोकांप्रमाणे वागू लागली आहेत. ते लोकांनी दिलेल्या साक्षीवरही विश्वास ठेवित नाहीत. ते त्यावर संशय घेतात. पवित्र आत्म्याचे सामर्थ्य मान्य करीत नाहीत. सैतानाची तीच इच्छा आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ५:२१७. ChSMar 57.3