Go to full page →

आध्यात्मिक अशक्तपणाची दशा ChSMar 58

देवाच्या लोकांवर प्रकाश एकवटलेला दाखविला गेला. परंतु अनेकांनी या प्रकाशाकडे दुर्लक्ष केले. या कारणानेच त्यांची दशा आध्यात्मिक अशक्तपणाची झाली आहे. असे नाही की कमी शिक्षणामुळे लोक शिक्षा भोगीत आहेत. त्यांना मार्ग ठाऊक नाही म्हणूनही ते दोषी ठरणार नाहीत. त्यांना सत्य ठाऊक नाही म्हणून ही ते दोषी ठरणार नाहीत. सत्य त्यांच्या बुद्धीमत्ते पर्यंत पोहोचले. ज्या आत्म्यापर्यंत प्रकाश पोहोचला आहे आणि त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले ते दोषी ठरतील. ज्यांच्याकडे तकार करण्यासाठी प्रकाशच नाही ते दोषी ठरविले जाणार नाहीत. देवाच्या द्राक्ष मळ्यात आणखी काय करायचे होते ? प्रकाश, मौल्यवान प्रकाश देवाच्या लोकांवर प्रकाशित होतो परंतु त्यामुळे ते वाचणार नाहीत जोपर्यंत ते इतरांना त्याची तारणासाठी अनुमति देत नाहीत त्यांचे पूर्ण जीवन त्या प्रकाशात राहात नाही आणि जे अंधारात आहेत त्यांच्यावर तो प्रकाश पडत नाही. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. २:१२३. ChSMar 58.1